For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

किरण चौधरी यांची भाजपमध्ये एंट्री

06:54 AM Jun 20, 2024 IST | Tarun Bharat Portal
किरण चौधरी यांची भाजपमध्ये एंट्री
Advertisement

हरियाणाच्या ‘तिन्ही लालां’चे वारस भाजपमध्ये

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

हरियाणाचे माजी मुख्यमंत्री चौधरी बन्सीलाल यांच्या पुत्रवधू आणि भिवानीच्या तोशाम येथील आमदार किरण चौधरी आणि त्यांच्या कन्या माजी खासदार श्रुती चौधरी यांनी काँग्रेसला रामराम ठोकला आहे. किरण चौधरी आणि श्रुती यांनी बुधवारी भाजपमध्ये प्रवेश केला आहे. याचबरोबर हरियाणाच्या राजकारणातील ‘तिन्ही लाल’ यांचा राजकीय वारसा आता भाजपच्या झेंड्याखाली एकवटला आहे. हरियाणा राज्याच्या स्थापनेनंतर दीर्घकाळापर्यंत सत्तेवर राहिलेले तिन्ही लाल देवीलाल, बन्सीलाल आणि भजनलाल यांच्या भोवतालीच राजकारण केंद्रीत राहिले होते. आता या परिवारांचे वारस स्वत:चे राजकीय भविष्य सावरण्यासाठी भाजपमध्ये दाखल झाले आहेत.

Advertisement

यापूर्वी भजनलाल यांचे पुत्र कुलदीप बिश्नोई आणि देवीलाल यांचे पुत्र रंजीत सिंह चौताला यांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता. याचबरोबर चौधरी देवीलाल यांचे नातू अजय सिंह चौताला आणि पणतू दुष्यंत चौताला स्वत:च्या जननायक जनता पक्षाद्वारे भाजपला समर्थन देत राज्यातील सत्तेत भागीदार राहिले होते. लोकसभा निवडणुकीपूर्वी ही आघाडी संपुष्टात आली होती. आता किरण चौधरी आणि त्यांच्या कन्या श्रुती यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत स्वत:चे राजकीय अस्तित्व टिकविण्यासाठी भाजपचे सदस्यत्व स्वीकारले आहे.

भजनलाल परिवाराचे सदस्य बिश्नोई

हरियाणाच्या राजकारणात एचडी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या भजनलाल यांच्या परिवाराचे वारस कुलदीप बिश्नोई आणि नातू भव्य बिश्नोई हे काँग्रेसमध्ये यापूर्वी कार्यरत होते. कुलदीप हे दोनवेळा खासदार आणि चारवेळा आमदार राहिल आहेत. तर त्यांच्या पत्नी रेणुका बिश्नोई दोनवेळा आमदार राहिल्या आहेत. काँग्रेसबद्दल अपेक्षाभंग झाल्यावर त्यांनी हरियाणा जनहित काँग्रेस नावाचा पक्ष स्थापन केला होता, परंतु यश न मिळाल्याने 2022 मध्ये कुलदीप आणि रेणुका यांनी भाजपमध्ये प्रवेश केला.

रणजीत चौतालांना भाजपकडून संजीवनी

चौधरी देवीलाल यांचे पुत्र रणजीत सिंह चौताला हे राजकारणात एकाकी पडले हेते. ओमप्रकाश चौताला परिवाराकडून त्यांना महत्त्व देण्यात आले नव्हते. अपक्ष म्हणून सिरसाचे आमदार म्हणून निवडून आलेल्या रणजीत सिंह यांनी भाजपला समर्थन दिले. तर अलिकडेच त्यांनी भाजपच्या तिकिटावर हिसार लोकसभा मतदारसंघात निवडणूक लढविली होती, परंतु त्यांना पराभव पत्करावा लागला होता. पण त्यांनी भाजपमध्sय प्रवेश करत स्वत:चे राजकीय भविष्य सुरक्षित केले आहे.

बन्सीलाल यांचा परिवार

हरियाणाच्या राजकारणात बन्सीलाल यांना विकास पुरुष नावाने ओळखले जाते. त्यांच्या सून किरण आणि नात श्रुती चौधरी आता स्वत:चे राजकीय अस्तित्व राखण्यासाठी भाजपमध्ये दाखल झाल्या आहेत. काँग्रेस नेते आणि माजी मुख्यमंत्री भूपेंद्र सिंह हु•ा यांच्यासोबत त्यांचे कधीच पटले नाही. स्वत:च्या राजीनाम्यासाठी त्यांनी हु•ांनाच जबाबदार ठरविले आहे.

Advertisement
Tags :

.