‘किंगडम ऑफ द प्लॅनेट’चा ट्रेलर जारी
माकड अन् माणसांदरम्यान होणार युद्ध
‘किंगडम ऑफ द प्लॅनेट ऑफ द एप्स’ हॉलिवूडच्या बहुप्रतीक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाचा हिंदी ट्रेलर प्रदर्शित करण्यात आला आहे. ट्वेंटीएथ सेंच्युरी स्टुडिओजकडून निर्मित या चित्रपटात अत्यंत नवे अॅक्शन आणि अॅडव्हेंचर दिसून येणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन वेस बॉल यांनी केले असून त्यांनी माकडांच्या ग्रहाचे साम्राज्य आणि माणसांमधील संघर्ष उत्तमप्रकारे मांडला आहे.
चित्रपटाच्या ट्रेलरला प्रेक्षकांची मोठी पसंती मिळत आहे. किंगडम ऑफ द प्लॅनेटमध्ये ओवेन टीग, फ्रेया एलन आणि केविन डूरंड यांचा अभिनय पहायला मिळणार आहे. चित्रपटाची कहाणी जोश फ्रीडमॅन, रिक जाफा, अमांडा सिल्वर आणि पॅट्रिक ऐसन यांनी लिहिली आहे. हा चित्रपट 10 मे रोजी इंग्रजी, हिंदी, तमिळ आणि तेलगूमध्ये प्रदर्शित होणार आहे.
भूतकाळात वानर आणि माणूस एकत्र राहत असल्याचे आणि वानर माणसांप्रमाणे बोलू शकत असल्याचे ट्रेलरच्या प्रारंभी दाखविण्यात आले आहे. परंतु एका क्रूर वानराने स्वत:च्या साम्राज्याची निर्मिती करताच तो माणसांना गुलाम करू लागते, सूड उगविण्यासाठी माणसांवर अत्याचार करत असतो. यानंतर वानर आणि माणसांदरम्यान युद्ध सुरू होत असल्याचे दाखविण्यात आले आहे.