महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

वेगाचा बादशाह टी 20 वर्ल्डकपचा ब्रँड अॅम्बेसिडर

06:31 AM Apr 25, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आयसीसीकडून घोषणा

Advertisement

वृत्तसंस्था/ पोर्ट ऑफ स्पेन,

Advertisement

वेस्ट इंडिजयंदाचा टी 20 वर्ल्डकप वेस्ट इंडिज आणि अमेरिका येथे खेळवण्यात येणार आहे. स्पर्धेत तब्बल 20 संघ सहभागी होणार असून या स्पर्धेला 1 जूनपासून सुरुवात होईल, तर 29 जूनला अंतिम सामना होणार आहे. या स्पर्धेसाठी वेगाचा बादशाह समजला जाणाऱ्या जमैकाचा धावपटू उसेन बोल्टला ब्रँड अँम्बेसिडर बनवले आहे. बोल्टने ऑलिम्पिकमध्ये विक्रमी 8 वेळा सुवर्णपदक जिंकले आहे. आयसीसीने बुधवारी याबाबतची घोषणा केली.

आगामी टी 20 वर्ल्डकपसाठी मी अॅम्बेसिडर झाल्याबद्दल आनंद आहे. मी कॅरेबियन बेटांमधील आहे, जिथे क्रिकेट आयुष्याचा एक भाग आहे. टी20 वर्ल्डकपसारख्या प्रतिष्ठीत सामन्याचा भाग बनणे ही अभिमानाची गोष्ट आहे. वर्ल्डकपमध्ये मी उत्साहाने सहभागी होत जगभरात क्रिकेटच्या विकासात योगदान देण्यासाठी उत्सुक असल्याची प्रतिक्रिया बोल्टने यावेळी दिली. दरम्यान, बोल्ट टी 20 विश्वचषकाचा अॅम्बेसिडर म्हणून स्पर्धेचा प्रचार करण्यात महत्त्वाची भूमिका बजावेल. तो वेस्ट इंडिजमध्ये होणाऱ्या वर्ल्डकपमधील सामन्यांना उपस्थित राहणार आहे. याशिवाय, अमेरिकेत क्रिकेटच्या प्रसारासाठी होणाऱ्या कार्यक्रमात देखील तो उपस्थित राहणार आहे

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article