महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

शतकांचा बादशाह विराट कोहलीचे विश्वविक्रमी 50 वे शतक

06:55 AM Nov 16, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ मुंबई

Advertisement

भारताचा स्टार फलंदाज विराट कोहली जेव्हा फलंदाजीस मैदानात उतरतो तेव्हा कोणता ना कोणता विक्रम मोडित निघणार हे ठरलेलेच असते. वर्ल्ड कपच्या उपांत्य सामन्यातही त्याने सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विक्रम मागे टाकत वनडे क्रिकेटच्या इतिहासात सर्वाधिक 50 शतके बनविणारा पहिला फलंदाज होण्याचा नवा विश्वविक्रम नोंदवला. याचबरोबर त्याने वनडेमध्ये सर्वाधिक धावा जमविणाऱ्यांच्या यादीत ऑस्ट्रेलियाच्या रिकी पाँटिंगला मागे टाकत तिसरे स्थान मिळविले आहे. बुधवारी वर्ल्ड कपमधील न्यूझीलंडविरुद्धच्या उपांत्य लढतीत त्याने 113 चेंडूत 117 धावा जमवित अनेक विक्रम मागे टाकले. त्याच्या खेळीत 9 चौकार, 2 षटकारांचा समावेश होता. या वर्ल्ड कपमधील त्याचे हे तिसरे शतक असून त्याने पाच अर्धशतकेही नोंदवली आहेत.

Advertisement

वनडे क्रिकेटमध्ये 50 शतके बनविणारा कोहली हा पहिला फलंदाज बनला आहे. त्याचा हा विक्रम अनेक वर्षे अबाधित राहण्याची शक्यता आहे. पन्नासावे शतक नोंदवत त्याने त्याचा आयडॉल सचिन तेंडुलकरचा 49 शतकांचा विक्रम मागे टाकला. शतक पूर्ण झाल्यानंतर त्याने मैदानात उपस्थित असलेल्या सचिन तेंडुलकरच्या दिशेने झुकत त्याला मानवंदना दिली. याच स्पर्धेत कोहलीने त्याच्या विक्रमाशी बरोबरी केली, तेव्हा 50 वे शतक गाठण्यास फार विलंब करू नकोस, असे सचिनने म्हटले होते. कोहलीने त्याची पूर्तता लगेचच, तेही सचिनच्या घरच्या मैदानावरच केल्यामुळे सचिनही संतुष्ट झाला आहे. विशेष म्हणजे, 15 नोव्हेंबर रोजीच सचिनने शेवटचा आंतरराष्ट्रीय सामना खेळला होता. 2013 मध्ये त्याने विंडीजविरुद्ध शेवटची 200 वी कसोटी वानखेडेवरच खेळली होती.

कोहलीने या सामन्यात सर्वाधिक वनडे धावा जमविणाऱ्या फलंदाजांत पाँटिंगलाही मागे टाकत तिसरे स्थान घेतले आहे. पाँटिंगने 13,704 धावा जमविल्या होत्या तर कोहलीच्या नावावर आता 13,794 धावा नोंदल्या गेल्या आहेत. सर्वाधिक 18,426 धावा जमवित सचिन अग्रस्थानी आहे तर लंकेचा कुमार संगकारा 14,234 धावांसह दुसऱ्या स्थानावर आहे.

धावा                   117

चेंडू            113

चौकार      09

षटकार     02

स्ट्राईक रेट       103.53

या सामन्यात नोंदवलेले विक्रम

- विराट कोहलीने 50 वे वनडे शतक नोंदवत सचिन तेंडुलकरचा विक्रम मागे टाकला.

-विश्वचषक स्पर्धेत पाचवे शतक नोंदवत कुमार संगकारा व रिकी पाँटिंगशी बरोबरी. 7 शतकांसह रोहित शर्मा आघाडीवर

- चालू वर्ल्ड कपमध्ये सर्वाधिक 711 धावा जमवित तेंडुलकरचा 673 धावांचा  विक्रम मागे

- वर्ल्डकपमध्ये सातशेहून अधिक धावा जमविणारा कोहली हा एकमेव फलंदाज बनला आहे.

- एकाच वर्ल्डकपमध्ये एकाच संघाच्या तीन फलंदाजांनी (कोहली, श्रेयस, रोहित) 500 हून अधिक धावा जमविण्याची पहिलीच वेळ.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#Sport
Next Article