For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.
Advertisement

स्वत:च्या अस्वच्छ पायांची छायाचित्रे विकण्याचा प्रकार

07:00 AM Mar 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
स्वत च्या अस्वच्छ पायांची छायाचित्रे विकण्याचा प्रकार

3 वर्षांपासून घातली नाहीत पादत्राणे

Advertisement

मुलांना कधीकधी जमिनीवर किंवा गवतावर अनवाणी पायांनी चालायला लावावे, असे बोलले जाते. यामुळे मुलांचा शारीरिक विकास चांगल्याप्रकारे होतो. परंतु सध्या लोक बूट-चप्पल उतरविणे पसंतच करत नाहीत. लोक घरात देखील पादत्राणे वापरु लागले आहेत. परंतु एका विदेशी व्यक्तीने पादत्राणांना कायमस्वरुपी निरोप दिला आहे. हा व्यक्ती आता स्वत:च्या अस्वच्छ पायांची छायाचित्रे सोशल मीडियावर विकून पैसे कमावत आहे. जॉर्ज वुडविलेने 2021 पासून पादत्राणे परिधान केलेली नाहीत. तो पादत्राणांशिवाय सर्व ठिकाणी जात असतो. आता तो एका सब्सक्रिप्शन साइटवर स्वत:च्या अस्वच्छ पायांची छायाचित्रे अपलोड करतो आणि त्याचे पाय पाहण्यासाठी लोक पैसे खर्च करून त्याच्या अकौंटला सब्सक्राइब करत असतात. 21 वर्षीय जॉर्जने पादत्राणे न वापरता सर्वत्र जाण्याची ही लाइफस्टाइल स्वीकारली आणि याच्याच माध्यमातून त्याला प्रेयसी देखील मिळाली आहे. जॉर्ज अनेक प्रकारच्या मानसिक समस्यांना सामोरा जात होता. त्याला वेगळ्या प्रकारच्या भावनेला तोंड द्यायचे होते. याचमुळे त्याने स्वत:च्या सर्व पादत्राणांना फेकून दिले होते. तेव्हा कुटुंबीयांना त्याला वेड लागल्याचे वाटले होते. परंतु आता तो स्वत:च्या पायांनी पैसे कमावत आहे. आता तो पायांची छायाचित्रे पोस्ट करत दर महिन्याला 1 लाख रुपयांपर्यंत कमाई करत आहे. त्याची बहुतांश छायाचित्रे सार्वजनिक ठिकाणावरील असतात. याचदरम्यान त्याची 20 वर्षीय रोजिएन या युवतीशी भेट झाली. दोघेही पाहताक्षणी परस्परांच्या प्रेमात पडले होते दोघांनीही डेटिंग सुरू केले, त्यानंतर काही महिन्यांनी दोघांनी अनवाणी राहण्यास सुरुवात केली. अनेकदा दोघांना वैद्यकीय स्थितीमुळे अनवाणी राहत असल्याची थाप मारावी लागते.

Advertisement
Advertisement
Tags :
×

.