For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

दक्षिण कोरियाच्या सीमेत घुसले किमचे सैनिक

06:43 AM Jun 12, 2024 IST | Tarun Bharat Portal
दक्षिण कोरियाच्या सीमेत घुसले किमचे सैनिक
Advertisement

दक्षिण कोरियाच्या इशारावजा गोळीबारानंतर माघार

Advertisement

  वृत्तसंस्था/ सोल

दक्षिण कोरियाने शेजारी देश उत्तर कोरियाच्या सीमेनजीक  गोळीबार केला आहे. प्रत्यक्षात उत्तर कोरियाच्या सुमारे 20-30 सैनिकांनी डीमिलिट्रिलाइज्ड झोन (डीएमझेड)वर दोन्ही देशांची सीमा ओलांडली होती. यानंतर त्यांना इशारा देण्यासाठी दक्षिण कोरियाच्या सैन्याने गोळीबार केला होता.

Advertisement

ही घटना रविवारी दुपारी घडली असली तरीही त्याची माहिती आता समोर आली आहे. गोळीबारानंतर उत्तर कोरियाचे सैनिक स्वत:च्या देशाच्या हद्दीत परतले. उत्तर कोरियाच्या सैनिकांकडे बांधकामासाठीची सामग्री होती आणि काही शस्त्रास्त्रsही होती. दक्षिण कोरियाच्या सीमेच्या 50 मीटर आतपर्यंत ते दाखल झाले होते अशी माहिती दक्षिण कोरियाच्या जॉइंट चीफ ऑफ स्टाफने दिली आहे.

उत्तर कोरियाकडुन याप्रकरणी अद्याप कुठलेही वक्तव्य करण्यात आलेले नाही. उत्तर कोरियाचे सैनिक चुकून सीमेत दाखल झाले असावेत अशी शक्यता दक्षिण कोरियाच्या सैन्याने चौकशीनंतर व्यक्त केली आहे. दोन्ही देशांच्या सीमेला वेगळे करणाऱ्या रेषेवर कुठलेही फलक नसल्याने हा गोंधळ उडू शकतो असे म्हटले गेले.

सर्वाधिक शस्त्रास्त्रs तैनात

उत्तर आणि दक्षिण कोरियादरम्यान डीएमझेड जगातील सर्वाधिक शस्त्रास्त्रs तैनात असणारी सीमा आहे. सीमेच्या आत आणि आसपास 20 लाख भुसुरुंग पेरण्यात आले आहेत. याचबरोबर सीमेच्या दोन्ही बाजूला काटेरी कुंपण, रणगाड्यांचे कवच आणि सैनिकही तैनात असतात. 1950 ते 1953 पर्यंत चाललेल्या कोरियन युद्धाला संपविण्यासाठी झालेल्या कराराच्या अंतर्गत ही सीमा निश्चित करण्यात आली होती.

Advertisement
Tags :

.