For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

जपानमध्ये फैलावला मांस खाणारा घातक बॅक्टेरिया

06:32 AM Jun 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
जपानमध्ये फैलावला मांस खाणारा घातक बॅक्टेरिया
Advertisement

केवळ 2 दिवसांत घेऊ शकतो जीव

Advertisement

जपानमध्ये एक दुर्लभ ‘मांस खाणाऱ्या बॅक्टेरिया’मुळे होणारा आजार फैलावत आहे. हा बॅक्टेरिया 48 तासांच्या आत लोकांचा जीव घेऊ शकतो. हा आजार जपानमध्ये कोरोना-काळातील निर्बंध शिथिल करण्यात आल्यावर फैलावत आहे. नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ इन्फेक्शियस डिसिजनुसार स्ट्रप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोम (एटीएसएस) एक आक्रमक आजार असून तो संक्रमणाच्या 48 तासांच्या आत घातक होऊ शकतो.

नॅशनल इन्स्टीट्यूट ऑफ इंफेक्शियस डिसिजनुसार यंदा 2 जूनपर्यंत जपानमध्ये एसटीएसएसचे 977 रुग्ण सापडले असून हे प्रमाण मागील वर्षी नोंदविण्यात आलेल्या 941 पेक्षा अधिक आहे. ही संस्था 1999 पासून या आजाराच्या रुग्णसंख्येवर नजर ठेवून आहे.

Advertisement

आजाराची लक्षणे

ग्रूप ए स्ट्रप्टोकोकस (जीएएस) सर्वसाधारणपणे मुलांच्या गळ्यात सूज आणि इंफक्sशन निर्माण करतो, ज्याला स्ट्रेप थ्रोट म्हणून ओळखले जाते. काही प्रकारच्या बॅक्टेरियांमुळे लक्षणे वेगाने विकसित होऊ शकतात, यात अंगदुखी आणि सूज, ताप, कमी रक्तदाब सामील आहे, ज्यानंतर नेक्रोसिस, श्वसनावेळी समसया, अवयव निकामी होणे आणि मृत्यू देखील होऊ शकतो. बहुतांश मृत्यू 48 तासांच्या आत होत आहेत. रुग्णाला सकाळी पायावर सूज दिसून येते, दुपारपर्यंत ही सूज गुडघ्यापर्यंत फैलावते आणि 48 तासांच्या आत त्यांचा मृत्यू होऊ शकतो असे टोकियो विद्यापीठातील संक्रामक रोगांचे तज्ञ केन किकुची यांनी सांगितले आहे.

30 टक्क्यांपर्यंत मृत्युदर

50 पेक्षा अधिक वयाच्या लोकांमध्ये या आजाराचा धोका अधिक असतो. संक्रमणाच्या वर्तमान दरानुसार जपानमध्ये याच्या रुग्णांची संख्या 2500 पर्यंत पोहोचू शकते आणि मृत्युदर 30 टक्क्यांपर्यंत पोहोचू शकतो असे किकुची यांनी सांगितले आहे. लोकांना हात स्वच्छ ठेवणे आणि कुठल्याही जखमेवर उपचार करण्याचे आवाहन केले आहे. रुग्णांच्या आतड्यांमध्ये ग्रूप ए स्ट्रेप्टोकोकस असू शकतो, जो मलाद्वारे हातांना दूषित करू शकतो.

जपानसोबत आणखी अनेक देशांमध्ये अलिकडेच स्ट्रेप्टोकोकल टॉक्सिक शॉक सिंड्रोमचे रुग्ण आढळून आले आहेत. 2022 च्या अखेरीस किमान 5 युरोपीय देशांनी जागतिक आरोग्य संघटनेला इनवेसिव ग्रूप ए स्ट्रेप्टोकोकस आजाराच्या रुग्णांमध्ये होत असलेल्या वाढीसंबंधी माहिती दिली होती.

Advertisement
Tags :

.