Sangli Crime : विट्यात धारदार शस्त्राने हल्ला करून तरुणाचा खून
साई सदावर्ते यांचा खून; तोंडाला फडके बांधलेले हल्लेखोर पसार
विटा : कोयत्यासारख्या धरधार शस्त्राने सपासप वार करून विट्यात युवकाचा निघृण खून केला. साईं गजानन सदावर्ते (३५, साळशिंगे रोड, आयटीआय समोर, बिटा) असे मयत तरुणाचे नाव आहे. ही घटना शनिवारी रात्री साडेआठ वाजण्याच्या सुमारास येथिल साळशिंग रस्त्यावर घडली. दोन दुचाकीवरून आलेल्या तोंडाला फडके बांधलेले मास्कधारी तीन ते चार हल्लेखोर वार करून सुसाट वेगाने दुचाकीवरून पसार झाल्याची माहिती पोलिसांनी दिली. याप्रकरणी अमीर नजीर फौजदार रा. मिरज या संशयितास ताब्यात घेण्यात आले.
याबाबत पोलिसातून मिळालेली माहिती अशी, साई गजानन सदावर्ते हा येथील शासकीय रस्त्यावरील आयटीआय नजिक राहण्यास आहे. शनिवारी रात्री साडेआठ बाजण्याच्या सुमारास तो येतील साळशिंगे रस्त्यावर असताना दोन दुचाकी वरून तीन ते चार तोंड बांधलेले मास्कधारी युवक त्या ठिकाणी आले. त्यांनी सदावर्ते याच्यावर कोणत्या सारख्या धारदार शस्त्राने जोरदार हल्ला चढविला. यामध्ये सदावर्ते याच्या मानेवर पाठीमागील बाजूस झालेला वार वर्मी बसला. मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव झाल्याने तो गंभीर जखमी झाला. यावेळी झालेला आरडाओरडा ऐकून परिसरातील नागरिक जमा झाले. त्यांनी तातडीने जखमी सदाबर त्याला येथील खाजगी रुग्णालयात दाखल केले. त्याच्यावर तातडीने उपचार सुरू करण्यात आले. मात्र घाव वर्मी बसलेला असल्याने मोठ्या प्रमाणात रक्तस्त्राव होऊन सदावर्ते चा मृत्यू झाल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
याबाबत माहिती मिळताच घटनास्थळी बघ्यांची मोठी गर्दी झाली होती. पोलीस निरीक्षक धनंजय फडतरे यांच्यासह पथकाने तातडीने घटनास्थळी धाव घेतली. हा खून अनैतिक संबंधातून झाला असावा असा प्राथमिक अंदाज आहे, असे पोलिसांनी सांगितले. घटनेनंतर सदावर्ते यांना दाखल केलेल्या दवाखान्यात देखील नागरिकांची गर्दी झाली होती. पोलिसांनी तात्काळ सूत्रे हलवली. उपविभागीय पोलीस अधिकारी विपुल पाटील यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. पोलिसांची पथके संशयितांच्या मागावर असून लवकरच घटनेचा छडा लावला जाईल. दोन ते तीन ठिकाणचे सीसीटीव्हीचे फुटेज पोलिसांच्या हाती लागले आहे. संशयित अमीर फौजदार यास ताब्यात घेतले आहे.