किलाउआ ज्वालामुखीचा विस्फोट
सैतानाच्या शिंगांप्रमाणे निघाल्या 1500 फूट उंच लाव्हारसाच्या दोन धारा
हवाई बेटावरील किलाउथ ज्वालामुखी जगातील सर्वात सक्रीय ज्वालामुखींपैकी एक आहे. मागील वर्षाच्या अखेरपासून हा ज्वालामुखी सातत्याने लाव्हारस ओकत आहे. प्रत्येक काही दिवसांमध्ये हा लाल-चमकदार तप्त दगडांचे फवारे सोडत आहे, जे स्थानिक लोक, पर्यटक आणि ऑनलाइन प्रेक्षकांना खूश करत आहेत. हा लावा एका आगीच्या नळीप्रमाणे बाहेर पडतो, यावेळी लाव्हारसाचे दोन धार असे निघाले, जसे एखाद्या सैतानाच्या डोक्यावर दोन शिंग.
किलाउआने डिसेंबरपासून आतापर्यंत स्वत:चा 34 वा विस्फोट केला. हे सर्व विस्फोट एकाच मोठ्या विस्फोटाचा हिस्सा आहेत. मॅग्मा (ज्वालामुखीतील तप्त वितळणारा दगड) एकाच मार्गाने पृष्ठभागावर येत आहे. यावेळी दक्षिणेकडील छिद्राने लावाचे फवारे 1300 फूट उंचीपर्यंत पोहोचल्याचे वैज्ञानिकांनी सांगितले. ही उंची न्यूयॉर्कच्या एम्पायर स्टेट बिल्डिंगपेक्षाही अधिक आहे. ही इमारत 100 मजली आहे.
विस्फोट सुमारे 6 तास चालला आणि मग शांत झाला. लाव्हारस हवाई वोल्केनो नॅशनल पार्कच्या आतील व्रेटरमध्येच राहिला. यामुळे कुठलीही नागरी इमारत आणि नागरी वस्तीला धोका नाही. पार्कमध्ये फिरणारे लोक याला थेट पाहू शकतात, तर अमेरिकेच्या भूवैज्ञानिक सर्वेक्षणाचे लाइव्ह स्ट्रीमही पाहता येते. यात तीन वेगवेगळ्या पॅमेऱ्यांद्वारे दृश्य दिसून येतात. किलाउआ हवाई बेटावर असून ते बेटसमुहातील सर्वात मोठे आहे. हे प्रांतातील सर्वात मोठे शहर होनोलूलूपासून सुमारे 320 किलोमीटर अंतरावर आहे.
लाव्हारसाचे फवारे
किलाउआचे दृश्य एखाद्या जादूप्रमाणे वाटते, परंतु यामागे विज्ञान आहे. हलेमाऊमाऊ क्रेटरखाली एक मॅग्मा कक्ष आहे. हा पृथ्वीच्या आत दर सेकंड 5 क्यूबिक यार्ड मॅग्मा घेत आहे. हा कक्ष बलूनप्रमाणे फुगतो, वरच्या कक्षात मॅग्माला ढकलतो, मग हा भेगांमधून पृष्ठभागावर पोहोचतो. डिसेंबरपासून अनेक विस्फोटांमध्ये लाव्हारस हवेत उंचपर्यंत फेकला गेला आहे. कधीकधी हा 1 हजार फूट उंच टॉवरतयार करतो. मॅग्मामध्ये गॅस भरलेले असल्याने हे घडत असते. आम्ही मुंग्यांप्रमाणे हत्तींवर चढून त्याचे काम करण्याचे रहस्य समजून घेण्याचा प्रयत्न करत आहोत असे हवाई वोल्केनो ऑब्जर्वेटरीचे वैज्ञानिक केन हॉन यांनी सांगितले. वैज्ञानिक सेंसर्सद्वारे मॅग्माविषयी कधी लाव्हारस उत्सर्जित होणार याचा अनुमान लावतात. कधी फवारे छोटे असतात, कारण छिद्र रुंद होते आणि दबाव कमी होतो.
200 वर्षांमध्ये चौथा असा पॅटर्न
मागील 200 वर्षांमध्ये किलाउआने अशा लाव्हारसाच्या फवाऱ्यांचे सत्र चौथ्यांदा दाखविले आहे. यापूर्वी 1959 आणि 1969 मध्ये घडले होते. तिसऱ्यांदा 1983 मध्ये सुरू झाले होते, ज्यात 44 एपिसोड्स होते आणि तीन वर्षांपर्यंत चालले. 1983 चा विस्फोट 35 वर्षे चालला आणि 2018 मध्ये समाप्त झाला.