कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

किदांबी, राजावत विजयी, सिंधू पराभूत

06:00 AM Mar 21, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/बेसील (स्वीस)

Advertisement

विश्व बॅडमिंटन फेडरेशनच्या येथे सुरू असलेल्या स्वीस खुल्या सुपर 300 आंतरराष्ट्रीय बॅडमिंटन स्पर्धेत पुरुष एकेरीत किदांबी श्रीकांतने शेवटच्या 16 खेळाडूंत स्थान मिळविले तर प्रियांशू राजावत आणि मुथुस्वामी यांनी विजयी सलामी दिली. मात्र महिला एकेरीत भारताच्या पी. व्ही. सिंधूचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले. पुरुष एकेरीच्या सामन्यात किदांबी श्रीकांतने आपल्याच देशाच्या एच. एस. प्रणॉयचा 23-21, 23-21 अशा सरळ गेम्समध्ये पराभव करत उपउपांत्य फेरीत प्रवेश केला. अन्य एका सामन्यात भारताच्या 35 व्या मानांकित प्रियांशू राजावतने कुनेझीचा केवळ 29 मिनिटांत 21-10, 21-11 असा फडशा पाडत दुसरी फेरी गाठली. राजावतचा पुढील फेरीतील सामना फ्रान्सच्या ज्युनियर पोपोव्हशी होणार आहे. भारताच्या  एस. शंकर मुथुस्वामीने डेन्मार्कच्या मॅग्नस जोहानसेनवर 21-5, 21-16 अशी मात करत दुसरी फेरी गाठली. आता मुथुस्वामीचा पुढील फेरीतील सामना डेन्मार्कच्या

Advertisement

अॅन्टोन्सेनशी होणार आहे. डेन्मार्कच्या गिमेकीने भारताच्या किरण जॉर्जचा 18-21, 21-17, 21-10 असा पराभव करत दुसऱ्याफेरीत प्रवेश मिळविला. पुरुष एकेरीतील अन्य एका सामन्यात जपानच्या निशीमोटोने भारताच्या आयुष शेट्टीचा 21-15, 21-19 असा पराभव केला. महिला एकेरीच्या पहिल्या फेरीतील सामन्यात भारताच्या पी. व्ही. सिंधूने निराशा केली. दोनवेळा ऑलिम्पिकपदक मिळविणाऱ्या सिंधूला पहिल्याच फेरीत डेन्मार्कच्या ज्युली जेकॉबसेनने पराभूत केले. या सामन्यात जेकॉबसेनने सिंधूवर 21-17, 21-19 अशी मात करत पुढील फेरीत प्रवेश केला. हा सामना 61 मिनिटे चालला होता. 2025 च्या टेनिस हंगामातील गेल्या तीन स्पर्धांमध्ये सिंधूला पहिल्याच फेरीत पराभवाला सामोरे जावे लागले आहे. इंडोनेशिया मास्टर्स, अखिल इंग्लंड बॅडमिंटन

चॅम्पियनशिप आणि स्वीस ओपन या स्पर्धांमध्ये सिंधूचे आव्हान पहिल्याच फेरीत संपुष्टात आले आहे. महिला एकेरीच्या अन्य एका सामन्यात भारताच्या इशारानी बारुआने आपल्याच देशाच्या आकर्षी काश्यपचा 21-18, 17-21, 22-20 असा पराभव केला. मालविका बनसोडला पहिल्याच फेरीत कॅनडाच्या मिचेली लीने 20-22, 21-14, 21-19 असे पराभूत केले. अनुपमा उपाध्यायने आपल्याच देशाच्या अनमोल खर्बचा 21-14, 21-13 असा पराभव करत दुसरी फेरी गाठली. मिश्र दुहेरीत भारताच्या आयुष अगरवाल आणि श्रुती मिश्रा यांचे आव्हान पहिल्याच फेरीत थायलंडच्या टी. पेकापोन आणि एम. फेताईमेस यांनी 18-21, 9-21 असे संपुष्टात आणले. त्याचप्रमाणे भारताच्या ए. सुर्या आणि अमृता पी. यांना पहिल्याच फेरीत पराभव पत्करावा लागला.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article