किया कॅरेन्स क्लॅविस इलेट्रिक कारचा शुभारंभ
बेळगावच्या किया मिरॅक्युलम किया शोरुममध्ये उपलब्ध
बेळगाव : किया इंडियाने मेड इन इंडिया इलेक्ट्रिक वाहनांतर्गत ‘द कॅरेन्स क्लॅविस ईव्ही’ वाहनाचा बेळगावमध्ये मिरॅक्युलम कियामध्ये शुभारंभ केला. कॅनरा बँकेचे विभागीय व्यवस्थापक के. एस. एस. भगवान, रिटेल असिस्टंट व्यवस्थापक नीरज तिवारी, डिलर अभय जोशी, विक्री व्यवस्थापक सतीश प्रभू यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. कॅरेन्स क्लॅविस या इलेट्रिक वाहनामध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञानाचा वापर केला आहे. त्यामुळे प्रवास अत्यंत आरामदायी होणार आहे. भारतीय जीवनशैलीचा विचार करून कारमध्ये अनेक फिचर्स देण्यात आले आहेत. 51.4 केडब्ल्यूएच बॅटरी दिली आहे. प्रवाशांच्या सुरक्षेचा सर्वाधिक विचार केला आहे.
एकूण 6 रंगांमध्ये कार उपलब्ध करून दिली आहे. लव्हरी, सिल्व्हर मॅटे, फ्युटर ऑलिव्ह, इम्पेरिअल ब्ल्यू, अरोरा ब्लॅक पर्ल यासह इतर रंगांमध्ये कार विक्रीसाठी दाखल झाली आहे. 17 लाख 99 हजारांपासून किंमत असल्याने परवडणाऱ्या दरात मध्यमवर्गीयांना ही कार मिळणार आहे. बुकिंगसाठी 9090979761 या क्रमांकाशी संपर्क साधण्याचे आवाहन केले आहे. प्रत्यक्ष कार पाहण्यासाठी पिरनवाडी सर्कल, ब्रम्हनगर व बुद्धनगर गेट, कागवाड रोड, चिकोडी येथील किया शोरुममध्ये उपलब्ध केली आहे.