‘लवयापा’मध्ये खुशी कपूर
आमिर खानच्या पुत्रासोबत झळकणार
आमिर खानचा पुत्र जुनैद आणि जान्हवी कपूरची बहिण खुशी एका रोमँटिक ड्रामा चित्रपटात एकत्र दिसून येणार आहेत. खुशी कपूरचा हा थिएट्रिकल डेब्यू असेल. यापूर्वी दोघांनीही वेगवेगळ्या चित्रपटांद्वारे ओटीटीवर पदार्पण केले आहे.
नव्या चित्रपटाचे नाव ‘लवयापा’ असून याचे पोस्टर जारी करण्यात आले आहे. हा चित्रपट 7 फेब्रुवारी रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन अद्वैत चंदन यांनी केले आहे. या चित्रपटाद्वारे दोन्ही स्टार किड पहिल्यांदाच एकत्र दिसून येणार आहेत.
या चित्रपटाचे चित्रिकरण मुंबई तसेच दिल्लीत पार पडले आहे. लवयापा हा एका मॉडर्न रोमान्सची कहाणी दर्शविणार असून यात प्रेम आणि त्यातील गुंतागुंत दाखविण्यात येणार आहे.
लवयापा हा चित्रपट 2022 मध्ये प्रदर्शित तमिळ चित्रपट ‘लव टुडे’चा हिंदी रिमेक असणार आहे. तमिळ चित्रपटाचे दिग्दर्शन प्रदीप रंगनाथन यांनी केले होते. तर जुनैद यापूर्वी महाराज या चित्रपटात दिसून आला होता, यात त्याच्यासोबत शालिनी पांडे आणि जयदीप अहलावत हे कलाकार होते. तर खुशी ही जोया अख्तरच्या द आर्चीजमधून झळकली होती. यात तिच्यासोबत सुहाना खान, अगस्त्य नंदा आणि अन्य कलाकार होते.