For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खुशी कपूरला मिळाला चित्रपट

06:30 AM Dec 24, 2023 IST | Tarun Bharat Portal
खुशी कपूरला मिळाला चित्रपट
Advertisement

स्टारकिडसोबत रोमांस करताना दिसून येणार

Advertisement

अभिनेत्री श्रीदेवीची मुलगी खुशी कपूरने अलिकडेच ‘द आर्चीज’द्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले आहे. खुशीचा हा चित्रपट ओटीटीवर प्रदर्शित झाला आहे. याचदरम्यान खुशी आता सारा अली खानचा भाऊ इब्राहिम अली खानसोबत एका चित्रपटात रोमान्स करताना दिसून येणार आहे. या रोम-कॉम चित्रपटाची निर्मिती करण जौहरकडून करण्यात येणार आहे.

इब्राहिम आणि खुशीने या चित्रपटाच्या करारावर स्वाक्षरी केली असून याचे चित्रिकरण पुढील वर्षी सुरू होणार आहे. हा चित्रपट थेट ओटीटीवर प्रदर्शित होणार असल्याचे सांगण्यात येत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन शाउना गौतम करणार आहे. शाउनाने यापुर्वी अनेक बिगबजेट चित्रपटांसाठी सहाय्यक दिग्दर्शिका म्हणून काम केले आहे. ‘संजू’ आणि रॉकी और रानी की प्रेम कहानी’ या चित्रपटाशी ती जोडली गेली होती.

Advertisement

इब्राहिम काजोलसोबत एका चित्रपटात काम करत आहे. इब्राहिम या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. तर खुशी ही द आर्चीज या चित्रपटाला मिळालेल्या यशामुळे आनंदी आहे. या चित्रपटात तिच्यासोबत सुहाना खान, अगस्त्य नंदा हे देखील दिसून आले होते. खुशीची इन्स्टाग्रामवर मोठी फॅन फॉलोइंग आहे.

Advertisement
Tags :

.