कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खो-खो विश्वचषकाला शानदार रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाने सुरवात

06:09 AM Jan 14, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांच्या हस्ते विश्वचषक स्पर्धेचे उद्घाटन

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

भारताच्या राजधानीतील इंदिरा गांधी इनडोअर स्टेडियममध्ये खो-खो विश्वचषकाला शानदार रंगारंग सांस्कृतिक कार्यक्रमाने सुरवात झाली. उपराष्ट्रपती जगदीश धनकड यांच्या हस्ते विश्वचषक स्पर्धेचे उद्घाटन झाले. याप्रसंगी केंद्रीय क्रीडा मंत्री डॉ. मनसुख मांडविया व क्रीडा राज्य मंत्री रक्षा खडसे, ऑलिम्पिक असोसिएशनच्या अध्यक्षा पीटी उषा उपस्थित होत्या. या स्पर्धेत 23 देशांतील 39 संघांनी सहभाग नोंदवला आहे. स्पर्धेतील 20 पुरुष आणि 19 महिला संघांनी उद्घाटन प्रसंगी संचालनात भाग घेतला व संपूर्ण मैदानाला फेरी मारून उत्साह वाढवण्याफग प्रेक्षकांचे आभार मानले. या संचालनात भारतीय महिला खेळाडूंनी साडी परिधान करून आपल्या देशाची परंपरा व संस्कृती जपत एक वेगळा संदेश दिला. यावेळी भारताचे कर्णधार प्रतिक वाईकर व प्रियांका इंगळे यांनी शपथ घेतली त्यावेळी इतर देशांचे कर्णधार त्यांच्या मागे उभे राहून शपथ घेतली.

आज होणारे सामने :

पुरुष (सकाळी 10.30 पासून) : दक्षिण आफ्रिका-घाना, बांगलादेश-श्रीलंका, इंग्लंड-जर्मनी, घाना-नेदरलँडस, पेरू-भूतान, अर्जेंटिना-इराण, दक्षिण कोरिया- पोलंड, मलेशिया-केनिया, दक्षिण आफ्रिका-नेदरलँडस, बांगलादेश-अमेरिका, इंग्लंड ऑस्ट्रेलिया, नेपाळ-पेरू, घाना-अर्जेंटिना, भारत-ब्राझील (रात्री 8.15).

महिला (सकाळी 11.45 पासून) : इंग्लंड-ऑस्ट्रेलिया, नेपाळ-भूतान, दक्षिण आफ्रिका-न्यूझीलंड, श्रीलंका-बांगलादेश, केनिया-नेदरलँडस, इंग्लंड-युगांडा, भारत-दक्षिण कोरिया (रात्री 7 वा.), दक्षिण आफ्रिका-पेरू, नेपाळ-जर्मनी, इराण-मलेशिया (रात्री 7.45).

 

 

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article