For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खाऊकट्ट्याच्या गैरकारभाराचा होणार पर्दाफाश

11:20 AM Nov 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
खाऊकट्ट्याच्या गैरकारभाराचा होणार पर्दाफाश
Advertisement

चौकशी सुरू असतानाच गाळ्यांमधील क्युआर कोड गायब : खरा रंग चौकशीनंतर उघड होणार असल्याचा राजकुमार टोपण्णावर यांना विश्वास

Advertisement

बेळगाव : गोवावेस बसवेश्वर चौकाजवळील खाऊकट्टा गाळे वितरणामध्ये सरकारी नियमांचे उल्लंघन करण्यात आले आहे. सरकारी मालमत्तेचा गैरवापर करण्यात येत आहे. आता चौकशी सुरू असल्याने अनेकांचे धाबे दणाणले आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांकडून या गैरकारभाराची चौकशी सुरू असून सरकारी मालमत्ता हडप करण्याचा प्रयत्न चालविणाऱ्यांचा पर्दाफाश होणार आहे, असे राजकुमार टोप्पण्णावर यांनी प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकाद्वारे सांगितले. खाऊकट्ट्याचे बांधकाम नियमांचे उल्लंघन करून करण्यात आले आहे. नाल्याच्या शेजारी बांधकाम करण्यास न्यायालयाचा आक्षेप आहे. न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करून हे बांधकाम करण्यात आले आहे. याठिकाणी निर्माण करण्यात आलेले गाळे भाजप कार्यकर्त्यांनाच वितरित करण्यात आले आहेत. गाळेधारकांकडून भाडे कोण वसूल करत आहे? कोणाला गाळे मंजूर झाले आहेत, त्यामध्ये दुकान कोण चालवत आहे? हे बेळगावच्या जनतेला लवकरच समजणार आहे.

खाऊकट्ट्याच्या गैरकारभाराबाबत अधिकाऱ्यांकडून चौकशी सुरू असताना तेथील क्युआर कोड गायब करण्यात आले आहेत. यामध्ये कोणाचा हात आहे? हे बेळगावच्या जनतेला माहीत आहे, असे टोपण्णावर यांनी म्हटले आहे. या प्रकरणाची चौकशी सुरू असताना गाळ्यांमधील क्युआर कोड गायब करण्यात आले आहेत. क्युआर कोड असते तर गाळा कोणाच्या नावाने आहे, दुकान कोण चालवत आहे?, मंजुरीपत्र कोणाला मिळाले आहे, याची माहिती मिळाली असती. हे उघड होणार असल्याचे माहीत झाल्यानेच क्युआर कोड गायब करण्यात आले आहेत, असा आरोप टोपण्णावर यांनी केला आहे.

Advertisement

जय किसान भाजी मार्केटला विरोध कोणी केला, तेच आता जय किसान मार्केटच्या बाजूने उभे राहिले आहेत. ही हास्यास्पद बाब आहे. सरकारी मालमत्तेच्या दुरुपयोगातून स्वत:चा लाभ करून घेतला जात आहे. नागरिकांना शहाणपणा सांगितला जात आहे, ही हास्यास्पद बाब असल्याचे टोपण्णावर यांनी सांगितले. राणी चन्नभैरादेवी असे नाव ठेवताना आपल्या जिल्ह्यातील अनेक हिंदुत्ववादी नेत्यांची नावे आठवली नाहीत का? असा प्रश्न उपस्थित केला आहे. खाऊकट्ट्याच्या ठिकाणी वितरित करण्यात आलेल्या गाळ्यांमध्ये किती दीन-दलित, विधवा, गोरगरीब नागरिकांना गाळे देण्यात आले आहेत? हे दाखवून द्यावे. चौकशीनंतर खरा रंग उघड होणार आहे, असा विश्वास टोपण्णावर यांनी व्यक्त केला आहे.

Advertisement
Tags :

.