महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खर्गे यांची सभेत फजिती

05:49 AM Nov 22, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

राहुल गांधींनी देशासाठी बलिदान केल्याचे वक्तव्य

Advertisement

राजस्थान निवडणुकीदरम्यान काँग्रेसचे अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे यांचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. खर्गे यांनी काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनाच शहीद संबोधिले आहे. खर्गे यांच्या या टिप्पणीवर आता भाजप उपरोधिक प्रतिक्रिया देत आहे.

Advertisement

देशाच्या एकतेसाठी राहुल गांधींसारख्या नेत्यांनी स्वत:चा जीव दिला असल्याचे खर्गे यांनी प्रचारसभेत बोलताना म्हटले आहे. खर्गे यांना स्वत:कडून झालेल्या चुकीची जाणीव झाल्यावर त्यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. परंतु भाजपने खर्गे यांच्या या टिप्पणीचा व्हिडिओ पोस्ट केला असून सोशल मीडियावर  काँग्रेसला ट्रोल केले जात आहे.

मल्लिकार्जुन खर्गे हे हनुमानगढ आणि अनूपगढच्या दौऱ्यावर होते. या देशाच्या एकतेसाठी राहुल गांधींसारख्या नेत्यांनी स्वत:चा जीव त्यागला असल्याचे खर्गे यांनी म्हणताच व्यासपीठावर उपस्थित काँग्रेस नेत्यांमध्ये चलबिचल सुरू झाली. अशा स्थितीत स्वत:च्या चुकीची जाणीव झालेल्या खर्गे यांनी माफी मागितली. चुकून राजीव यांच्याऐवजी राहुल गांधींचे नाव घेतल्याचे सांगितले आहे.

खर्गे यांच्या या भाषणाचा व्हिडिओ भाजपने सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. ‘हे कधी घडले’ अशी कॅप्शन भाजपने या व्हिडिओला दिली. यापूर्वी काँग्रेस उमेदवार बाबूलाल नागर यांचीही सभेत जीभ घसरली होती. सभेत बोलताना नागर यांनी केवळ अशोक गेहलोत जिंदाबाद आणि राहुल गांधी मुर्दाबाद अशा घोषणा दिल्या जाव्यात असे म्हटले होते. याचा व्हिडिओ समोर आल्यावर काँग्रेसची चांगलीच फजिती झाली.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article