महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

जखमी इंजिनियरची खर्गे अन् गेहलोतांनी घेतली भेट

05:11 AM Nov 20, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काँग्रेस अध्यक्ष मल्लिकार्जुन खर्गे आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यानी जयपूर येथील रुग्णालयात जात इंजिनियर हर्षाधिपति वाल्मिकीची भेट घेतली आहे. हर्षाधिपति हे मागील वर्षी काँग्रेस आमदाराच्या मारहाणीत जखमी झाले होते. आमदाराच्या मारहाणीत हर्षाधिपति जखमी होणे ही गंभी घटना होती. तरीही  भाजपने याच आमदाराला (गिर्राज सिंह मलिंगा) पक्षात सामील करून उमेदवारी दिली आहे. सत्ता मिळविण्यासाठी भाजपने खालची पातळी गाठल्याची टीका गेहलोत यांनी केली आहे. या घटनेच्या चौकशीनंतर राहुल गांधींसोबत मिळून मी निर्णय घेतला आहे. दलित व्यक्तीवर अत्याचार करणाऱ्या नेत्याला उमेदवारी न देण्याचा निर्णय घेतला असल्याचा दावा खर्गे यांनी केला.

Advertisement

बाडीचे आमदार गिर्राज सिंह मलिंगा आणि त्यांच्या समर्थकांनी कथित स्वरुपात हर्षाधिपति यांना मारहाण केली होती. मलिंगा यांना भाजपने बाडी मतदारसंघाची उमेदवारी दिली.

Advertisement

मारहाणीच्या प्रकारामुळे काँग्रेसने मलिंगा यांना उमेदवारी नाकारली आणि ते भाजपमध्ये सामील झाले आणि त्याचदिवशी भाजपकडून त्यांना उमेदवारी जाहीर झाली असल्याचे खर्गे यांनी म्हटले आहे.

मलिंगा आणि अन्य नेत्यांच्या विरोधात मागील वर्षी मार्च महिन्यात बाडीमधील वीज कार्यालयात 2 इंजिनियर्सवर हल्ला करण्याचा आरोप झाला होता.

 

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#social media
Next Article