महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खानापूर ताराराणी हायस्कूलला राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत कास्यपदक

10:27 AM Nov 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

खानापूर : नुकताच म्हैसूर पुनमपेठ येथे झालेल्या माध्यमिक विद्यालयाच्या राज्यस्तरीय हॉकी स्पर्धेत खानापूर येथील ताराराणी मुलींच्या संघाला कास्यपदक मिळाले. या यशाबद्दल  ताराराणी विद्यालयात संघाचे अभिनंदन करण्यात आले. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संचालक शिवाजी पाटील होते. विजयी संघाचे नेतृत्व कॅप्टन मयुरी कंग्राळकर हिने केले. या संघाचे बलस्थान म्हणजे तगडा गोलकीपर नेत्रा गुरव ही असून कुमारी साक्षी पाटील, राधिका पाटील, साक्षी चौगुले, सविता चिक्कदीनकोप, आयेशा शेख, प्रीती नांदुडकर, ममता कुंभार, सानिका पाटील, श्रेया पाटील, अनुराधा मयेकर, श्रेया गोंधळी, वैष्णवी इटनाळ, सेजल भावी, तनुश्री गावडे, निशा दोडमनी, भूमी लटकन, वैष्णवी नाईक या खेळाडूंचा समावेश होता. या खेळाडूंना मराठा मंडळ संस्थेच्या अध्यक्षा राजश्री नागराजू व संचालक  शिवाजीराव पाटील, परशुराम गुरव, मुख्याध्यापक राहुल एन. जाधव यांचे प्रोत्साहन मिळत आहे. तर शाळेच्या क्रीडा शिक्षिका अश्विनी टी. पाटील, प्राचार्य अरविंद पाटील यांच्यासह बेळगाव हॉकी फेडरेशन सेक्रेटरी सुधाकर चाळके, कोच उत्तम शिंदे, संतोष दरेकर, गणपत गावडे, सदस्य नामदेव सावंत, मनोहर पाटील यांचे मार्गदर्शन लाभले आहे. यशस्वी संघाचे कौतुक होत असून तालुक्यासह जिल्ह्यातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

Advertisement

Advertisement
Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article