महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खानापूर तालुका पातळीवर शिक्षकदिन उत्साहात

11:15 AM Sep 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

आदर्श शाळा-आदर्श शिक्षक पुरस्कारांचे वितरण : शैक्षणिक क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती : शिक्षकांविषयी मान्यवरांकडून गौरवोद्गार

Advertisement

वार्ताहर/कणकुंबी

Advertisement

समाजाची व्यवस्थित जडणघडण करणारे शिक्षकच आहेत. शिक्षक  समाजातील अतिशय प्रामाणिक व्यक्ती आहेत. त्यामुळे शिक्षकांनी  आपल्या शिक्षकी पेशाला शोभेल असेच काम केले पाहिजे. शिक्षकी पेशाच्या प्रवाहातून जात असताना शिक्षकांनी नवीन बदल स्वीकारले पाहिजेत. शिक्षकांनी आधुनिक ज्ञान आत्मसात करून परिस्थितीनुसार अपडेट राहिले पाहिजे. शिक्षकांना माझी विनंती आहे की, ‘शाळा वाचवा’. शाळा वाचल्या’ तरच नोकऱ्या टिकतील, असे मनोगत  आमदार विठ्ठल हलगेकर यांनी येथील शुभम गार्डनमध्ये आयोजित  तालुकास्तरीय शिक्षक दिन कार्यक्रमात अध्यक्षपदावरून बोलताना व्यक्त केले.

सर्वप्रथम माजी राष्ट्रपती डॉ. सर्वपल्ली राधाकृष्णन यांच्या प्रतिमेचे पूजन झाल्यानंतर आमदार विठ्ठल हलगेकर, तहसीलदार प्रकाश गायकवाड, क्षेत्र शिक्षणाधिकारी राजेश्वरी कुडची व मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले. त्यानंतर क्षेत्र समन्वय अधिकारी ए. आर. अंबगी यांनी स्वागत केले. बीईओ राजेश्वरी कुडची यांनी प्रास्ताविक भाषणात शिक्षक दिनाबद्दल व शिक्षकांच्या कर्तव्यांबद्दल तसेच तालुक्यातील शैक्षणिक कार्याविषयी महत्त्वपूर्ण विचार व्यक्त केले. अवरोळी मठाचे स्वामी चन्नबसव देवरू तसेच तहसीलदार प्रकाश गायकवाड, तालुका पंचायत कार्यनिर्वाहक अधिकारी विलासराज व प्रमुख वक्त्या श्रीदेवी यांनी आपले मनोगत व्यक्त करून शिक्षकांना शिक्षक दिनाच्या शुभेच्छा दिल्या.

...तर शिक्षकी सेवा आदर्श  

या कार्यक्रमाला प्रमुख वत्ते म्हणून लाभलेले खानापूर येथील ताराराणी पदवीपूर्व महाविद्यालयाचे प्राचार्य अरविंद पाटील यांनी सांगितले की, या देशाचे चारित्र्य शिक्षकांच्या हाती आहे. शिक्षकांची ओळख ही त्यांच्या ज्ञानातून झाली पाहिजे. आज-काल काही शिक्षक आपली नोकरी सांभाळण्याबरोबरच इतरही व्यवसायांकडे वळले आहेत. त्यामुळे त्यांचे शिक्षकी पेशाकडे दुर्लक्ष होत आहे. शिक्षकाने आपली सेवा प्रामाणिकपणे बजावावी, जेणेकरून देशाची आदर्श पिढी व आदर्श नागरिक घडविण्याची क्षमता त्यांच्यात आहे हे दिसून येईल. शिक्षकांनी आपल्या जीवनात काही पथ्ये पाळून ज्ञानार्जनाचे कार्य प्रामाणिकपणे केल्यास शिक्षकी सेवा ही आदर्श ठरेल, असे मत व्यक्त केले.

पुरस्कार प्रदान-निवृत्त शिक्षकांचा सन्मान

यावेळी तालुका पातळीवरील आदर्श शाळा व आदर्श शिक्षक पुरस्कार प्रदान करण्यात आले. तसेच प्राथमिक आणि माध्यमिक शाळांमधून निवृत्त झालेल्या शिक्षकांचा सन्मान करण्यात आला. आदर्श शाळा म्हणून एमएचपीएस चिखले, अबनाळी, कुप्पटगिरी, पारिश्वाड, केएचपीएस नंदगड, कक्केरी व कडतन बागेवाडी या सात शाळांची निवड करण्यात आली. तालुका पातळीवर प्राथमिक विभागातून आदर्श शिक्षक म्हणून श्रीमती एम. आर. पाटील-मोदेकोप, विलास सावंत- खानापूर, टी. आर. गुरव- नंदगड, श्रीमती राहत मणियार- उर्दू शाळा नंदगड, सुधा विजापूर- करविनकोप्प, यु. आर. कडेमणी- हिंडलगी आणि सी. बी. यलमक्कानवर- मांगिनहाळ या शिक्षकांना गौरविण्यात आले आहे. तसेच माध्यमिक विभागातून एस. एम. मुतगी-एमएमएचएस खानापूर व आर. बी. चन्ननवर सरकारी हायस्कूल सुरपूर-केरवाड यांना मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article