महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खलिस्तानी शूटर्सची दिल्ली पोलिसांची चकमक

06:42 AM Nov 28, 2023 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

‘अर्श डल्ला’ टोळीतील दोन बंदुकधारी अटकेत 

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली, जालंधर

Advertisement

दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलने सोमवारी कारवाई करत खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप उर्फ अर्श डल्लाच्या दोन शूटर्सला अटक केली आहे. पॅनडास्थित खलिस्तानी दहशतवादी अर्शदीप डल्ला याच्या टोळीच्या सदस्यांसोबत पोलिसांची चकमक रविवारी आणि सोमवारी मध्यरात्री दिल्लीतील मयूर विहार भागात झाली. पॅरोल संपल्यानंतर दोन्ही शूटर फरार झाले होते. पंजाबी गायक एली मंगत याच्यावर हल्ला करण्याचा कट त्यांनी रचला होता. चकमकीदरम्यान शार्पशूटरने पाच गोळ्या झाडल्याचे पोलिसांनी सांगितले.

अटक केलेले दोन्ही आरोपी पंजाबमधील एका खटल्यात पॅरोलवर बाहेर पडल्यानंतर फरार झाले होते. दिल्लीत रविवारी रात्री उशिरा दिल्ली पोलिसांचा स्पेशल सेल आणि खलिस्तानी दहशतवाद्यांमध्ये चकमक झाली. चकमकीत एका गुन्हेगाराच्या पायाला गोळी लागली. पोलिसांनी त्याला ताब्यात घेऊन उपचारासाठी ऊग्णालयात दाखल केले. चकमकीदरम्यान आरोपींकडून दोन बंदुका आणि 13 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली आहेत. याशिवाय चोरीची दुचाकीही जप्त करण्यात आली आहे. दिल्ली पोलिसांनी विविध कलमान्वये गुन्हा दाखल केला आहे.

पोलिसांना गुप्त माहिती मिळाल्यानंतर गँगस्टर अर्शदीप सिंग डल्ला याच्या टोळीतील राजप्रीत सिंग राजा आणि वीरेंद्र सिंग विम्मी या दोघांना अटक करण्यात आली आहे. चकमकीनंतर या दोघांना अक्षरधाम मंदिर रोडवरील मयूर विहार येथील समाचार अपार्टमेंटजवळ अटक करण्यात आली. चकमकीदरम्यान शार्पशूटरने पाच वेळा गोळीबार केला. त्यापैकी एका पोलीस कर्मचाऱ्याला दोन गोळ्या लागल्याचे पोलिसांनी सांगितले. प्रत्युत्तरादाखल पोलिसांच्या पथकाने सहा राऊंड गोळीबार केला. या चकमकीत शार्पशूटर वीरेंद्र सिंगच्या उजव्या पायाला गोळी लागल्यामुळे तो जखमी झाला. चकमकीनंतर दोन्ही आरोपींना एलबीएस ऊग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

पंजाबी गायक एली मंगट शूटर्सच्या निशाण्यावर

दोन्ही गुन्हेगारांना अर्शदीपने पंजाबी गायक एली मंगटचा खून करण्याचे काम सोपवले होते. यापूर्वी गायकाच्या हत्येसाठी त्यांनी भटिंडा येथे प्रयत्न केला परंतु अचूक लक्ष्य न मिळाल्याने ते अयशस्वी झाले. तसेच आताची मोहीम दिल्ली पोलिसांच्या योग्य नियोजनामुळे फसली आहे. एकंदर पंजाबी गायक मंगट निशाण्यावर असलेल्या दोन्ही मोहिमा यशस्वी झाल्या नाहीत.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article