महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

अमृतसर सुवर्ण मंदिरात खलिस्तान झिंदाबाद घोषणा

07:00 AM Jun 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

ऑपरेशन ब्लू स्टारच्या 40व्या वर्धापनदिनानिमित्त झळकले भिंद्रनवालेचे पोस्टर

Advertisement

वृत्तसंस्था /अमृतसर

Advertisement

ऑपरेशन ब्लू स्टारच्या 40 व्या वर्धापनदिनानिमित्त अमृतसरमध्ये शीख समुदायाच्या लोकांनी खलिस्तान झिंदाबादच्या घोषणा दिल्या. तसेच श्री अकाल तख्त साहिबबाहेरही तलवारी फडकवण्यात आल्या. खलिस्तानच्या समर्थनार्थ घोषणा देण्याबरोबरच लोकांनी जर्नेलसिंग भिंद्रनवाले यांचे छायाचित्र असलेले पोस्टरही झळकवण्यात आले. दुसरीकडे, ऑपरेशन ब्लू स्टारच्या वर्षपूर्तीनिमित्त श्री हरी मंदिर साहिबपासून संपूर्ण शहरात सुरक्षा व्यवस्था कडक करण्यात आली आहे. श्री हरी मंदिर साहिब येथे साध्या वेशातील पोलीस तैनात करण्यात आले होते. सुरक्षा दलाच्या तैनातीसह बॅरिकेडिंग करून कोणत्याही अनुचित प्रकारावर लक्ष ठेवण्यात आले होते. ऑपरेशन ब्लू स्टारच्या वर्धापनदिनानिमित्त श्री अकाल तख्त साहिब येथे ऑपरेशनमध्ये मारल्या गेलेल्या शीखांना श्र्रद्धांजली वाहण्यात आली. श्री अखंडपाठ अर्पण केल्यानंतर आयोजित केलेल्या अरदासमध्ये 1984 मध्ये तत्कालीन सरकारने त्यांच्यावर केलेल्या कारवाईचा काँग्रेस पक्षाकडून निषेध करण्यात आला. शीख समुदाय ही घटना कधीही विसरू शकत नाही, असे अरदासमध्ये म्हटले आहे.

खासदार झाल्याबद्दल अमृतपाल सिंग यांचे अभिनंदन

लोकसभा निवडणुकीत अमृतपाल सिंग यांना खासदार झाल्याबद्दल अभिनंदन करताना सरबजीत सिंग म्हणाले की, आता राज्य सरकारनेच अमृतपालच्या सुटकेसाठी पुढाकार घ्यावा. दिब्रुगड आणि इतर तुऊंगात बंदिस्त असलेल्या शीखांचीही सुटका करण्यात यावी. आपण शीख समाजाचा आवाज बनून बंदिवान शीखांची सुटका आणि इतर सांप्रदायिक प्रश्नांवर संसदेत आवाज उठवणार असल्याचे त्यांनी सांगितले. तऊणांनी डोक्मयावरचे केस कापू नयेत, असे आवाहनही त्यांनी केले आहे.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article