महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

उत्तरेत खलप, दक्षिणेत व्हिरियतो

11:14 AM Apr 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

काँग्रेस पक्षातच एकमेकांच्या उमेदवारीला विरोध करण्याचे खेळ सुरूच

Advertisement

पणजी : लोकसभा निवडणुकीच्या गोव्यातील मतदानास एक महिना बाकी राहिला असला तरी काँग्रेस पक्षाचे अधिकृत उमेदवार अजूनही जाहीर होत नसल्याने आश्चर्य व्यक्त करण्यात येत आहे. दरम्यान प्राप्त माहितीनुसार अखिल भारतीय काँग्रेस समितीने उत्तर गोव्यासाठी रमाकांत खलप यांच्या नावावर शिक्कामोर्तब केले आहे. दक्षिण गोव्याचा तिढा मात्र रात्री उशिरापर्यंत सुटला नव्हता. व्हिरियतो फर्नांडिस यांचे नाव तेथे आघाडीवर होते. गेले जवळजवळ 15 ते 20 दिवस गोव्यातील काँग्रेसच्या उमेदवारीबाबत गोंधळच चालू आहे. गोव्यातील केवळ 2 जागांचे उमेदवार ठरवण्यासाठी काँग्रेस पक्षाला अजूनही यश येत नाही. याबाबत पक्षातच नाराजी असून पक्षाचे नेते, आमदार, पदाधिकारी यांनीही त्याबाबत फारसे काही गांभीर्याने घेतल्याचे दिसून येत नाही. काँग्रेस पक्षातच एकमेकांच्या उमेदवारीला विरोध करण्याचे खेळ चालू असल्यामुळे हा उशीर होत असल्याचे समोर आले आहे. काँग्रेसमध्ये उमेदवार हिंदू असावा, उमेदवार ख्रिश्चन असावा, या चर्चेलाच अधिक महत्व दिले जात आहे. त्यामुळे उमेवारी जाहीर करण्यात उशीर होत असल्याचे सूत्रांनी सांगितले. एकंदरीत या वेळकाढू धेरणाला काँग्रेसचे कार्यकर्ते तसेच काँग्रेसचे मित्रपक्ष देखील आता कंटाळले आहेत. गोव्याचे लोकसभा उमेदवार ठरविण्यासाठी अखिल भारतीय काँग्रेस समितीची बैठक काल शुक्रवारी पार पडली. त्यासाठी विरोधी पक्षनेते युरी आलेमाव आणि गोवा प्रदेश काँग्रेस अध्यक्ष अमित पाटकर हे उपस्थित होते. बैठकीत रमाकांत खलप यांच्या नावावर शिक्कामोर्तब झाले आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article