कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राशिभविष्य खजाना

06:00 AM Aug 25, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

भविष्यवेध : सकारात्मक जीवनाची दिशा

Advertisement

बुधवार दि. 27 ऑगस्ट ते मंगळवार दि. 2 सप्टेंबर 2025 पर्यंत 

Advertisement

ऋतं वदामि सत्यं वदामि

ज्योतिष आणि कर्मकांड हे आपल्या इथे बेमालूम मिसळलेले आहेत की, त्यांना वेगवेगळ्या स्वरूपात बघणेही आपल्याला मान्य नाही! मुळात काही विद्वानांचे म्हणणेच असे आहे की, होम-हवन यासारख्या कर्मकांडाकरता मुहूर्त काढण्याकरता ज्योतिषशास्त्राची निर्मिती झाली (जे अर्धसत्य आहे). असो. सनातन हिंदू धर्मात अनेक उपासना पंथ आहेत आणि त्यातील एक अत्यंत प्राचीन व प्रभावी पंथ म्हणजे गाणपत्य पंथ. इथे हे ही लक्षात ठेवले पाहिजे की, गणपतीला ‘विघ्नहर्ता’ म्हणून देखील संबोधिले आहे. या पंथात गणपतीला केवळ विघ्नहर्ता किंवा बुद्धीचा देव मानले जात नाही, तर तो परब्रह्म, सर्वश्रेष्ठ देवता आणि सृष्टिकर्ता म्हणून पूजला जातो. या लेखामध्ये आपण गाणपत्य पंथाची ऐतिहासिक पार्श्वभूमी, तत्त्वज्ञान, उपासना पद्धती, वर्तणूकशैली आणि आधुनिक काळातील महत्त्व यांचा सविस्तर अभ्यास करू.

  1. गाणपत्यपंथाची ऐतिहासिक पार्श्वभूमी : गणेश उपासनेचा इतिहास वैदिक काळापासून आहे. ऋग्वेद, यजुर्वेद व अथर्ववेद यामध्ये गणपतीचे प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्ष उल्लेख सापडतात. गाणपत्य पंथाची स्थापना इसवी सनाच्या पहिल्या सहा शतकात झाल्याचा अंदाज आहे. पुढे शंकराचार्यांनी शण्मत: पंथांची रचना केली, त्यात गाणपत्य पंथाचाही समावेश होता. यामुळे या पंथाला शास्त्रशुद्ध अधिष्ठान मिळाले. महाराष्ट्र, कर्नाटक, गुजरात आणि दक्षिण भारतात या पंथाचा प्रभाव विशेषत: दिसतो.
  2. गणेश- परब्रह्मस्वरूप : गाणपत्य पंथानुसार गणेश म्हणजे सगुण ब्रह्माचा मूर्तरूप आहे. तो सर्व तत्त्वांचा अधिष्ठाता आहे. त्याच्या रूपातील विविध प्रतीकांना दैवी अर्थ आहे. मोठे डोके - ज्ञान व विवेक, मोठे कान - ऐकण्याची व समजून घेण्याची क्षमता, सोंड - लवचिकता व अडथळे पार करण्याची क्षमता, उंदरावर स्वार - इच्छाशक्तीवर नियंत्रण. गणेश हा भक्ताला केवळ भौतिकच नव्हे तर आध्यात्मिक लाभ देणारा देव आहे.
  3. तत्त्वज्ञानवआध्यात्मिक दृष्टिकोन : गाणपत्य पंथानुसार ब्रह्म हे एकच आहे व ते गणेशरूप आहे. या पंथात अद्वैतवादाची छाया असून, ज्ञानयोग, भक्तियोग व कर्मयोगाचा समन्वय आहे. गणेश हा सगुण ब्रह्म असून त्याच्यातून निर्गुण ब्रह्माची प्राप्ती होते, असा दृष्टिकोन आहे. गाणपत्य संप्रदायामध्ये ज्ञानाची प्राप्ती ही ध्यान, जप, पूजा व उपासना यामार्फत होते. यामध्ये मूलमंत्र, बीजमंत्र, यंत्र व होमविधी यांचे विशेष स्थान आहे.
  4. प्रमुखग्रंथ- गणपती अथर्वशीर्ष : गाणपत्य संप्रदायातील सर्वात पवित्र ग्रंथ. यात गणेशाच्या ब्रह्मस्वरूपाचे वर्णन आहे. “त्वं ब्रह्मा त्वं विष्णुस्त्वं ऊद्र:” असे मंत्र यात आहेत. मुद्गल पुराण - गणेशाच्या आठ स्वरूपांचा उल्लेख. (वक्रतुंड, एकदंत, महोदर) गणेश पुराण - अत्यंत विस्तृत ग्रंथ. यात गणेशाच्या विविध लीलांच्या कथा आहेत.
  5. गणपतीउपासनाव साधना : गाणपत्य पंथात उपासना तांत्रिक पद्धतीने केली जाते. मंत्रजप, यंत्रपूजन, होम व विशेष गणेश यज्ञ केले जातात. काही उपासक एकाक्षरी मंत्र ‘गं’, तर काही “ॐ गं गणपतये नम:” या मंत्राचा जप करतात. गणेश यंत्र - विशेषत: गाणपत्य साधक यंत्र ध्यानासाठी वापरतात. गणहोम - नित्य हवन, गणपती अथर्वशीर्ष पठण याला महत्त्व आहे. व्रते - गणेश चतुर्थी, संकष्ट चतुर्थीला उपासना विशेष महत्त्वाची.
  6. गाणपत्यसंप्रदायातीलसंत व गुरु परंपरा : या पंथात गुरुशिष्य परंपरा आहे. महागणपती उपासक, तांत्रिक गुरु, तसेच सिद्ध पुरुष वेगवेगळ्या काळात कार्यरत होते. काही प्राचीन गाणपत्य मठ आजही महाराष्ट्रात कार्यरत आहेत.
  7. प्रमुखगाणपत्यपीठे : गुजरात - मयूरगिरी मठ, एक प्रमुख गाणपत्य मठ, अष्टविनायक मंदिरे. महाराष्ट्र - मोरगाव, सिद्धटेक, पाळे. गणेश मंदिरांचा समूह, कणिपक्कम गणेश मंदिर. आंध्र प्रदेश - स्वयंभू गणेशमूर्ती, टोक गणपती. तामिळनाडू -तांत्रिक गणेश उपासनेचे प्रमुख केंद्र.
  8. आधुनिककाळातीलगाणपत्य पंथ : आजही गाणपत्य पंथ भारतात अस्तित्वात आहे, विशेषत: महाराष्ट्रात. गणेश चतुर्थीला सामाजिक व धार्मिक स्तरावर विशेष पूजन केले जाते. लोकमान्य टिळकांनी सार्वजनिक गणेशोत्सव सुरू करून गाणपत्य उपासनेला जनआंदोलनाचे रूप दिले. यासोबतच, अनेक तांत्रिक साधक आजही गणपतीच्या विविध स्वरूपांची उपासना करून सिद्धी प्राप्त करतात, आध्यात्मिक उन्नतीचा मार्ग साधतात. गाणपत्य पंथ हा केवळ एक उपासना पंथ नाही, तर एक जीवनमार्ग आहे. या पंथाच्या माध्यमातून भक्ताला केवळ भौतिक सुखच नाही, तर ब्रह्मज्ञान, मुक्ती व आत्मसाक्षात्काराचा मार्ग मिळतो. गणेश म्हणजे सर्व तत्त्वांचे संपूर्ण रूप. त्याचे स्मरण हेच सिद्धी व बुद्धीचे रहस्य आहे.

मेष

ग्रहस्थिती अनुकूल आहे. कार्यक्षेत्रात मेहनतीचे चांगले फळ मिळेल. वरिष्ठांचा सल्ला लाभदायक ठरेल. व्यवसायात नवीन करार होण्याची शक्मयता आहे. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. नवा उत्पन्नाचा स्रोत मिळू शकतो. घरगुती वाद मिटण्याची शक्मयता. प्रवासात काळजी घेणे आवश्यक. आरोग्यात थोडे चढ-उतार संभवतात.

उपाय : मंगळवारी हनुमान मंदिरात लाल चोळा अर्पण करा.

वृषभ

नोकरीत बदल किंवा नवीन संधी मिळू शकते. आर्थिक स्थिती थोडीशी अस्थिर राहू शकते, घरात काही तणाव निर्माण होऊ शकतो. प्रेमसंबंधात स्पष्ट संवाद आवश्यक. जुने मित्र भेटतील. कामाच्या ठिकाणी संयम आवश्यक. वरिष्ठांकडून अपेक्षित मदत मिळेल. आरोग्याच्या बाबतीत विशेष दक्षता घ्या. मानसिक ताण जाणवेल.

उपाय : शुक्रवारी पांढऱ्या फुलांनी लक्ष्मी देवीची पूजा करा.

मिथुन

जुनी अपूर्ण कामे पूर्ण होतील. व्यवसायात यश व नफा संभवतो. नोकरीत पदोन्नतीची शक्मयता आहे. महत्त्वाचे निर्णय घेण्यासाठी योग्य वेळ. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रेमसंबंधात पुढचा टप्पा गाठाल. विद्यार्थ्यांना अभ्यासात चांगले फळ मिळेल. सामाजिक कार्यात सहभाग मिळेल. बुद्धीचा योग्य वापर करा.

उपाय : बुधवारी गणपतीला दूर्वा अर्पण करा व मोदकाचा नैवेद्य द्या.

कर्क

सुरुवात काहीशी गोंधळात होऊ शकते. मनातील संभ्रम दूर करा. कामात विलंब जाणवेल. घरात अस्थिरता निर्माण होऊ शकते. आर्थिक बाबतीत विशेष काळजी घ्या. आरोग्याच्या बाबतीत पचनसंस्थेची तक्रार संभवते. मानसिक ताण कमी करण्यासाठी ध्यानधारणा करा. एखादी जुनी गोष्ट त्रासदायक ठरू शकते.

उपाय : सोमवारी शिवपिंडीवर बेलपत्र व पाणी अर्पण करा.

सिंह

संधी उपलब्ध होतील. कामात वरिष्ठांकडून प्रोत्साहन मिळेल. आर्थिक लाभ संभवतो. जुने गुंतवणुकीचे फळ मिळेल. कुटुंबात आनंदाचे वातावरण. दाम्पत्य जीवनात गोडवा वाढेल. प्रिय व्यक्तीशी जवळीक निर्माण होईल. सामाजिक मान मिळेल. शारीरिक आणि मानसिक ताजेपणा जाणवेल. प्रवासात यश मिळेल. बुद्धिमत्तेचा वापर करा.

उपाय : रविवारी सूर्याला अर्घ्य द्या.

कन्या

संयमाने वागण्याची गरज आहे. कामाच्या ठिकाणी दबाव जाणवेल पण चिकाटीने काम केल्यास यश मिळेल. आर्थिकदृष्ट्या संयम राखणे आवश्यक आहे. कुटुंबीयांशी संवाद सुधारावा लागेल. विद्यार्थ्यांना अभ्यासात अडथळे येऊ शकतात. आरोग्याच्या बाबतीत विशेषत: पचनक्रियेची काळजी घ्या.

उपाय : बुधवारी तुळशीला पाणी द्या.

तुळ

कार्यस्थळी तुमच्या कलागुणांना वाव मिळेल. वरिष्ठ व सहकाऱ्यांचे सहकार्य लाभेल. आर्थिक उत्पन्नात वाढ होण्याची शक्मयता. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रेमसंबंधांमध्ये नवीन उभारी येईल. आरोग्य चांगले राहील, पण थोडा थकवा जाणवू शकतो. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. व्यावसायिकांसाठी नव्या संधी उघडतील.

उपाय : शुक्रवारी दही-साखरेचा नैवेद्य अर्पण करून माता लक्ष्मीची पूजा करा.

वृश्चिक

आरोग्यावर विशेष लक्ष देणे आवश्यक आहे. कामात अनपेक्षित अडचणी येऊ शकतात. संयम व धैर्याची कसोटी लागेल. कुटुंबात मतभेद संभवतात. आर्थिक व्यवहारात सतर्क रहा. नवीन व्यवहार करताना काळजी घ्या. जुन्या मित्रांकडून मदत होऊ शकते. प्रवास शक्यतो टाळा. आध्यात्मिक उपाय फायदेशीर ठरतील.

उपाय : मंगळवारी रुद्राभिषेक करा.

धनु

आर्थिक लाभ प्राप्त होईल. कुटुंबात प्रेम व समजूत वाढेल. आरोग्य उत्तम राहील. जुनी योजना पूर्ण करण्याचा प्रयत्न सफल होईल. शिक्षण, संशोधन किंवा अध्यापन क्षेत्रात काम करणाऱ्यांना यश मिळेल. सामाजिक कामात सहभाग वाढेल. मन प्रसन्न राहील. प्रवास शुभ ठरेल. विद्यार्थ्यांना चांगले फळ मिळेल.

उपाय : गुरुवारी हरभरा दान करा.

मकर

आपले ध्येय स्पष्ट ठेवणे आवश्यक आहे. कार्यालयात नवा प्रकल्प सुरू करण्याची संधी मिळेल. वरिष्ठांचे मार्गदर्शन लाभेल. आर्थिक व्यवहारात काळजी घ्या. कुटुंबात सुसंवाद साधा. आरोग्याच्या बाबतीत थोडेसे सावध रहा. मनावर थोडा ताण जाणवेल. जुने नातेसंबंध सुधारू शकतात. विरोधकांची बोलणी घ्यावी लागू शकतात. संयमाने वागा.

उपाय : शनिवारी शनिदेवाची पूजा करा.

कुंभ

नवे संबंध उपयोगी ठरतील. आर्थिक व्यवहार यशस्वी होतील. जुने कर्ज फेडण्याची शक्यता. प्रवासात फायदा होईल. आरोग्य चांगले राहील. भावनांवर नियंत्रण ठेवा. कामात सातत्य ठेवा. घरात शुभकार्याची योजना होईल. विद्यार्थ्यांनी अधिक प्रयत्न करावेत. दाम्पत्य जीवनात संवाद आवश्यक. वरिष्ठांकडून प्रशंसा मिळेल.

उपाय : शनिवारी काळे उडीद आणि लोखंड दान करा.

मीन

हा आठवडा मध्यम स्वरूपाचा असेल. कार्यक्षेत्रात नवीन जबाबदारी येईल. संयमामुळे अडचणींवर मात कराल. आर्थिक लाभ होईल पण खर्चातही वाढ होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने पचनसंस्था व त्वचेसंबंधी त्रास संभवतो. नवी संधी योग्य नियोजन करून वापरा. आध्यात्मिक प्रगतीस उत्तम वेळ. विद्यार्थ्यांना उत्तम प्रगती होईल.

उपाय : गुरुवारी नारळ आणि केळी दान करा.

 

-प्रा. पं. तेजराज किंकर

Advertisement
Tags :
#horoscope#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article