For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खजाना राशिभविष्य

06:10 AM Jul 02, 2025 IST | Tarun Bharat Portal
खजाना राशिभविष्य
Advertisement

मूलांक 6 ((Venus/Megke´ शुक्र) - मूलांक 6 चे लोक सौंदर्यप्रिय, कलाप्रेमी आणि प्रेमळ स्वभावाचे असतात. त्यांना संगीत, अभिनय, पॅशन आणि सजावट यात रस असतो. सौम्य, नम्र आणि आकर्षक व्यक्तिमत्त्व हे यांचे वैशिष्ट्या. हे लोक नेहमी ऐशआराम आणि आलिशान जीवनशैलीसाठी प्रयत्नशील राहतात. प्रेमसंबंधात अतिशय भावनिक आणि प्रामाणिक असतात. कुटुंबासाठी त्याग करायला हे कधीही मागेपुढे पहात नाहीत. पैशाची किंमत जाणणारे आणि सामाजिक प्रतिष्ठा जोपासणारे असतात. काहीवेळा अति प्रेम आणि ऐषोरामाच्या आहारी जाऊ शकतात. अनुकूल अंक : 6, 15, 24 आणि शुभ रंग : पांढरा, सिल्व्हर, फिकट निळा.

Advertisement

मूलांक 7 (Ketu//केतू) मूलांक 7 असलेले लोक गूढ, आध्यात्मिक आणि तत्त्वज्ञानात रस घेणारे असतात. अत्यंत विचारशील, अंतर्मुख आणि काहीसा मितभाषी स्वभाव असतो. हे लोक स्वत:च्या विचारविश्वात रममाण होतात. नवनवीन गोष्टींचा शोध घेणे, गूढविद्या, ध्यानधारणा यात यांना रस असतो. अकल्पित निर्णय घेण्याची सवय असते. प्रेमसंबंधात स्थैर्य कमी पण भावना प्रामाणिक असतात. हे लोक जास्त मित्र करत नाहीत, पण एकदा जोडले की आयुष्यभर साथ देतात. परिस्थितीशी जुळवून घेणारे पण स्वत:ची तत्त्वे कायम राखणारे असतात. अनुकूल अंक : 7, 16, 25 आणि शुभ रंग : राखाडी, निळसर, पिवळसर करडा.

मूलांक 8 (Saturn//शनी) मूलांक 8 चे लोक गंभीर, शिस्तप्रिय आणि अत्यंत संयमी असतात. मेहनत आणि चिकाटी हे यांचे मुख्य गुण. सुऊवातीला संघर्ष करणारे पण हळूहळू मोठे यश मिळवणारे. न्यायप्रिय, प्रामाणिक आणि जबाबदारीने जगणारे. हे लोक नेहमी सरळ मार्गाने चालणारे आणि अनुशासनप्रिय असतात. कधी कधी थोडे हट्टी आणि भावनांकडे दुर्लक्ष करणारे. प्रेमात विश्वासू, पण भावना व्यक्त करण्यात संकोच करणारे. आयुष्यात उशिरा पण भक्कम स्थैर्य मिळवणारे. अनुकूल अंक : 8, 17, 26 आणि शुभ रंग : काळा, गडद निळा, करडा.

Advertisement

मूलांक 9 (Mars/मंगळ) मूलांक 9 असलेले लोक धाडसी, संघर्षशील आणि नेतृत्वगुण असणारे असतात. कोणतीही गोष्ट धैर्याने आणि आत्मविश्वासाने पूर्ण करतात. संकटातही खचून न जाता अधिक बळकट होणारे हे लोक स्वभावाने थोडे आक्रमक पण अंत:करणाने प्रेमळ असतात. साहसी कामे, लष्कर, पोलीस, खेळ, राजकारण यामध्ये हे यशस्वी होतात. नात्यात प्रामाणिकपणा, कधी कधी चिडचिडे होतात. स्पर्धा आणि नेतृत्वात नेहमी पुढे असतात. जोडीदारासाठी अत्यंत प्रेमळ आणि संवेदनशील. अनुकूल अंक : 9, 18, 27 आणि शुभ रंग : लाल, मरून, केशरी.

जन्मतारखेच्या पूर्ण बेरजेतून  Life Path Number काढून व्यक्तीच्या आयुष्यातील महत्त्वाचे भाग्यदायक अंक ओळखले जातात. यामध्ये Master Numbers म्हणजे 11, 22, 33 यांना विशेष महत्त्व दिले जाते. पाश्चात्य अंकशास्त्र प्रामुख्याने व्यक्तीच्या व्यक्तिमत्त्व विकासावर आणि जीवनातील विशेष घटनांवर भर देते. भारतीय अंकशास्त्रात मूलांक (Birth Number), भाग्यांक Destiny Number), नामांक (Name Number) या संकल्पनांचा वापर करून भविष्यवाणी केली जाते. एक महत्त्वाचा फरक म्हणजे पाश्चात्य अंकशास्त्रात अंगभूत ऊर्जा व व्यक्तिमत्त्व यावर भर दिला जातो तर भारतीय अंकशास्त्रात कर्म, ग्रहबळ आणि आयुष्यातील नशिबाचा प्रभाव या बाबतीत अधिक सखोल विचार केला जातो. तसेच, भारतीय अंकशास्त्रात उपाय, रत्न, यंत्र आणि जप-स्तोत्र याचा वापर करून दोष निवारण केले जाते, तर पाश्चात्य पद्धतीत स्वभाव बदल, सकारात्मक दृष्टिकोन आणि योग्य दिशा निवडण्यावर भर दिला जातो. थोडक्मयात सांगायचे झाले तर, दोन्ही पद्धती अंकांवर आधारित असूनही त्यांचा अधिष्ठान, विश्लेषणाची पद्धत, ग्रहसंबंध आणि उपाययोजना यामध्ये मूलभूत फरक आहे. त्यामुळे ज्याला ज्याचा विश्वास व प्रामाणिकता वाटते, तो त्या पद्धतीचा आधार घेऊ शकतो. दोन्ही पद्धती आपापल्या परीने व्यक्तीच्या जीवनात सकारात्मक दिशा देण्यासाठी उपयुक्तच आहेत. पाश्चात्त्य अंकशास्त्र (Western Numerology)) ही जगभरात सर्वात लोकप्रिय व सर्वसामान्य वापरली जाणारी अंकविद्या आहे. या शास्त्राचा पाया प्राचीन ग्रीक तत्त्वज्ञ पायथागोरस यांनी घातला. पायथागोरसच्या मते, प्रत्येक अंक विशिष्ट ऊर्जा आणि कंपन घेऊन येतो, ज्याचा मानवी स्वभाव, भविष्य आणि आयुष्यातील घडामोडींवर प्रभाव पडतो. या पद्धतीमध्ये मुख्यत: 1 ते 9 या अंकांचा वापर केला जातो आणि नावातील अक्षरांनाही अंकात्मक मूल्य दिले जाते. पाश्चात्य अंकशास्त्रात काही खास पद्धती वापरल्या जातात, ज्या खाली दिल्या आहेत. सर्वात महत्त्वाची पद्धत म्हणजे Life Path Number काढण्याची. यात व्यक्तीच्या जन्मतारखेतील दिवस, महिना आणि वर्ष यांची बेरीज केली जाते आणि त्या बेरीजीतून एक अंक तयार होतो. तो अंक त्या व्यक्तीच्या संपूर्ण आयुष्याचा मार्गदर्शक असतो. उदाहरणार्थ, जर एखाद्याचा जन्म 15-08-1995 रोजी झाला असेल, तर 1+5+0+8+1+9+9+5 = 38 आणि 3+8 = 11, 1+1 =2.  तExpression Numberr हा 2 आहे. दुसरी महत्त्वाची पद्धत म्हणजे Life Path Number  किंवा Destiny Number. ही संख्या व्यक्तीच्या नावातून काढली जाते. यासाठी नावातील प्रत्येक इंग्रजी अक्षराला 1 ते 9 पर्यंतचे अंक दिले जातात.

मेष

मंगळ-केतू संयोग सिंह राशीत. तुमची ऊर्जा आणि संकल्पशक्ती प्रबल राहील. कार्यसमर्थता वाढेल, आव्हानांना तोंड देण्याची क्षमता वाढेल. कारकिर्दीत नवनवीन संधी प्राप्त होतील. आर्थिक स्थिती सुधारण्याची अपेक्षा. प्रेम व कुटुंबात सामंजस्य राहील, पण अहंकार टाळा. आरोग्यासाठी संयमित आहार व व्यायाम गरजेचा. प्रवास लाभदायक ठरू शकतो.

उपाय : रविवारी सूर्यनमस्कार करा.

वृषभ 

शुक्र वृषभ राशीत मालव्य योग-आर्थिक बाबींमध्ये वाढ आणि प्रतिष्ठा मिळेल. व्यवसायात सुवर्णसंधी प्राप्त होतील. कौटुंबिक नात्यांना नवे सौख्य लाभेल. प्रेमाच्या विषयात नवीन गोडवा वाढेल. घराच्या वातावरणात समृद्धी राहील. स्वास्थ्यात उन्नती, पण अति तामसिक आहारात सावधगिरी. मित्रपरिवारात आदर आणि सहाय्य मिळू शकते. योग-ध्यानासाठी गुऊवारी वेळ द्या.

उपाय : गुरुवारी पिवळ्या वस्त्रात बेसनाचे लाडू देवाला भोग म्हणून द्या.

मिथुन

बुधादित्य राजयोगामुळे बुद्धीक्षमता वाढणार. संवादात पारंगता येईल. कामात नवे विचार व सर्जनशीलता सामावेल. आर्थिक दिशेने चांगली प्रगती दिसेल. कार्यक्षेत्रात मान व प्रतिष्ठा मिळेल. शिक्षण व प्रवासातील नवे योग निर्माण होतील. आरोग्यावर लक्ष देऊन संतुलन ठेवणे आवश्यक. नोकरी मिळण्याची शक्मयता दिसून येईल. कुटुंबात समजुती वाढतील.

उपाय : बुधवारी हिरव्या भाज्या दान करा.

कर्क

बुधादित्य राजयोगामुळे आर्थिक शांतता व नियंत्रण वाढणार. आर्थिक परिस्थिती स्थिर राहणार. आवक आणि खर्चात समतोल कायम. घरात शांतता आणि सुख मिळेल. मनात स्थैर्य निर्माण होईल. प्रेम-संबंधात गोडव्याचा योग. काही गुप्त माहिती प्राप्त होऊ शकते. आरोग्य चांगले, पण विश्र्रांती घ्या. भावनात्मक निर्णय घेण्याचा योग आहे. प्रवासात लाभ, पण साधकपणे नियोजन करा.

उपाय : सोमवारी दूध-अभिषेक शिवलिंगावर करा.

सिंह

मंगळ-केतू संयोगामुळे ऊर्जा व आत्मगौरव वाढणार. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. परिस्थिती नियंत्रण करून प्रगती शक्मय. कुटुंबात स्नेह व आदर वाढतील. प्रेमात आकर्षण व गोडवा वाढेल. स्वास्थ्य उत्तम, पण काळजी घ्या. प्रेरणा व स्वावलंबन वाढेल. मार्गदर्शन लाभेल.

उपाय : रविवारी खारका जाळा.

कन्या

गुऊ-ज्येष्ठ योगामुळे विचारशक्ती व आत्मनिरीक्षण वाढणार. अंतर्निरीक्षणाचा योग मिळेल. अध्ययनाची स्फूर्ती येईल. कार्यक्षेत्रात सूक्ष्मता महत्त्वाची ठरेल. आर्थिक बाबींमध्ये घरून पाऊल उचलता येईल. प्रेमात गूढ संवादाचे अनुभव. आरोग्यासाठी संतुलित आहार आवश्यक. योग-ध्यानाने मानसिक संतुलन. कौटुंबिक वातावरणात समज आणि सहकार्य. शिक्षण किंवा परीक्षा क्षेत्रात प्रगती.

उपाय : गुरुवारी पंचामृत देवाला अर्पण करा.

तुळ

सौंदर्य, ऐषआरामाकडे मन ओढले जाईल. आर्थिक स्थिरता व सौख्य वाढेल. आकर्षण व सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. कुटुंबात सामंजस्य वाढेल. प्रेमात ताज्या घटना गोडवा वाढवतील. कामात संतुलित निर्णय शक्मय. कायदेशीर बाबीमध्ये यशाची शक्मयता. आरोग्यासाठी सौंदर्य व स्वास्थ्य हे दोन्ही आवश्यक. मित्रपरिवारातून साहाय्य मिळेल. सामाजिक कार्यक्रमात सहभागी व्हा.

उपाय : शुक्रवारी गुलाबी/पांढरे अत्तर व दूध दान करा.

वृश्चिक 

बुधादित्य योग व मंगळ-केतू योग. आर्थिक स्तरावर उन्नती. कामात परिवर्तनाची हवा. आत्मविश्वास व साहस वाढेल. राजकीय/प्रशासकीय मान्यता प्राप्त होईल. प्रेमात गूढ नाते निर्माण होईल. स्वास्थ्य चांगले, पण मानसिक ताण जाणवेल. सामाजिक प्रतिष्ठेत वृद्धी. ध्येयांना योग्य दिशा मिळेल. निवेशात सावधगिरी आवश्यक.

उपाय : शनिवारी काळे तीळ वाहत्या पाण्यात सोडा.

धनु

धार्मिक व आर्थिक लाभ. धार्मिक कृतीत संघटन वाढेल. आर्थिक स्तरावर वृद्धीची शक्मयता. शिक्षणात प्रगती व यात्रा लाभदायक. प्रेमात ताजे प्रसंग. प्रशासनात मान वाढेल. स्वास्थ्य चांगले, परंतु संयम आवश्यक. कुटुंबात सौहार्द. नियोजन व अनुशासन भरपूर. नवनिर्माण व क्रियाशीलता वाढेल. आर्थिक व आध्यात्मिक दोन्ही बाजू मजबूत असतील.

उपाय : गुरुवारी पिवळे फळ, बेसन लाडू दान करा.

मकर

सातत्याने स्थिरता व अधिकार वाढणार. व्यावसायिक रूपात उन्नती व प्रतिष्ठा वाढेल. आर्थिक स्थिरता व संवेदनशील निर्णय शक्मय. कुटुंबात बळकट आधार मिळेल. प्रेमात निष्ठा व सोबत राहील. आयुष्यात शिस्त वाढेल. आरोग्यासाठी व्यायाम व संतुलित आहार गरजेचा. कर्मचारी किंवा सहयोगात स्थिरता. नेतृत्वगुण प्रगल्भ होतील. सतर्क निर्णय घ्या, अहंकाराला तडे द्या.

उपाय : शनिवारी काळे उडीद-तीळ दान करा,

कुंभ

शनी व गुऊ यांचे संतुलन आणि परिवर्तन. व्यावसायात नवे प्रयोग व संधी. डिजिटल/ह्युमॅनिटेरियन क्षेत्रात मान सन्मान. आर्थिक स्तरावर वृद्धी. सार्वजनिक व मनोगत संवेदनशीलता वाढेल. प्रेमात नवीन रूप. स्वास्थ्य साधारण. प्रवास व संचारात संधी. शिस्त व अभ्यास वाढेल. टीम व सहवासात बळ निर्माण. डिजिटल उपक्रम शक्तिशाली होतील. सामाजिक कार्यात सहभाग वाढेल.

उपाय : बुधवारी हिरव्या वस्त्रात मूग दान करा.

मीन 

शनी व नेपच्यून वक्री योगामुळे अंतर्मुखता व आत्मशोधन. आध्यात्मिक उन्नतीची शक्मयता. आर्थिक गुंतवणुकीत सावधगिरी बाळगा. स्वास्थ्य सुधारण्याची दिशा मिळेल. कुटुंबात शांती व संयम. योग-ध्यानात रस वाढेल. लेखन, संशोधन, तत्त्वज्ञानात कार्यक्षमता. प्रवासात आध्यात्मिक अर्थ साधला जाईल. आर्थिक निर्णयांची योग्य दिशा मिळेल. मानसिक शांती मिळेल.

उपाय : गुरुवारी तुळशीला जल अर्पण करा.

Advertisement
Tags :

.