For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खजाना राशिभविष्य

06:10 AM Jun 11, 2025 IST | Tarun Bharat Portal
खजाना राशिभविष्य
Advertisement

बुधवार दि. 11 ते मंगळवार दि. 17 जून 2025 पर्यंत

Advertisement

अंकशास्त्राचा ((Numerology) व्यावहारिक उपयोग

(गुरुचे गोचर : कुंभ- पंचमस्थानातून गुऊचे गोचर होणार आहे. संतती इच्छुक दाम्पत्यांना संतती होईल. विद्येचा लाभ. शिक्षणात यश. वैवाहिक जीवनात आनंद. प्रेम प्रकरण वाढेल. तीर्थयात्रेच्या संधी. उपासना वाढेल. वाहन खरेदी, वास्तू खरेदी होईल. सर्व प्रकारचे चांगले लाभ मिळणार आहेत. आर्थिक प्रगती होईल.  महत्त्वाकांक्षा पूर्ण होतील.)

Advertisement

अजय देवगणने आपले नाव Ajay Devgan बदलून Ajay Devgn (मधला a गायब केला!) का केले असेल? राणी मुखर्जी, सुनील शेट्टी, विवेक ओबेरोय, करिश्मा कपूर, राजकुमार राव, जिम्मी शेरगिल यांनीही आपापल्या नावात अक्षरे का बदलली असतील? करण जोहर, एकता कपूर यांना ‘क’ पासूनच सिनेमे का काढायचे असतात? हे झाले सिनेमाचे, कित्येक मोठ्या मोठ्या कंपन्यांचा लोगो विशिष्ठ आकाराचा का असतो? नाव विचित्र का असते? वोरन बुफे एकदा म्हणाला होता की, लखपती लोक ज्योतिषावर विश्वास ठेवत नाहीत, अरबपती लोक ठेवतात! यातच सगळे आले, नाही का? या लेखाचा हेतू तुम्हाला स्वत:ला आपला लकी नंबर कसा काढायचा, आपल्या नावात काय आणि कसा बदल करायचा आणि याच बरोबर या शास्त्राचा उगम-इतिहास काय आहे, हे सांगणे हा आहे. मानवजातीच्या प्रगतीचा इतिहास पाहिला, तर आपल्याला आकड्यांचे (संख्या) महत्त्व सहज लक्षात येते. आज आपण दररोज ज्या संख्यांचा वापर करतो-गणना, व्यापार, तंत्रज्ञान, शिक्षण, वेळ मोजणे, तारीख आणि विज्ञान या प्रत्येक क्षेत्रात त्यांचा इतिहास हजारो वर्षे जुना आहे. प्राचीन काळात माणसाने गरजेनुसार संख्यांची निर्मिती केली आणि हळूहळू त्याचा विकास आजच्या आधुनिक अंकपद्धतीपर्यंत झाला. पूर्वीच्या मानवाला आपल्या सोबत असलेल्या वस्तू, प्राणी, अन्नाचे प्रमाण मोजायचे होते. यासाठी तो खडा, लाकडी काठीवर रेघा किंवा गाठी बांधण्याचा उपाय वापरीत असे. ही गणना पद्धती अतिशय प्राथमिक होती. पण जसजशी मानवाची बुद्धी विकसित झाली आणि व्यापार, शेती, वास्तुशास्त्र, खगोलशास्त्र यांचा विकास झाला, तसतशी आकड्यांची गरज वाढू लागली. संख्यांचा वापर सुमारे 5000 वर्षांपूर्वी प्राचीन बाबिलोनियन, मायन, इजिप्शियन आणि भारतीय संस्कृतींमध्ये आढळतो. बाबिलोनियन लोकांनी 60 संख्यापद्धतींचा वापर केला, ज्याचा प्रभाव आजही 60 मिनिटांचा तास आणि 360 अंशांचे वर्तुळ यात पहायला मिळतो. इजिप्तमध्ये पिरॅमिड बांधताना संख्या व भूमितीचा वापर करण्यात आला. भारताने ‘शून्य’ (0) ही कल्पना जगाला दिली. आर्यभट्ट आणि ब्रह्मगुप्त यांनी याचा विकास केला. आजही भारतीय अंकपद्धतीला जागतिक गणितात विशेष मान आहे. शून्याचा शोध हा मानवाच्या इतिहासातील क्रांतिकारी टप्पा मानला जातो.

इ.स. 5 व्या शतकात भारतीय गणिततज्ञ आर्यभट्ट यांनी शून्याचा वापर मांडला. यानंतर ब्रह्मगुप्त यांनी शून्यावर नियम निश्चित केले. यामुळे संख्यांचे मोजमाप सोपे झाले आणि गणिताचे नवीन दालन खुले झाले. आज आपण जी 0 ते 9 या अंकांची दशमलव पद्धत वापरतो, ती प्रामुख्याने भारतीय आणि अरबी पद्धतीवर आधारित आहे. ही पद्धत युरोपमध्ये अरबी गणिततज्ञांमार्फत पोहोचली. यामुळे प्राचीन रोमन पद्धतीला मागे टाकत आजची सोपी व सर्वमान्य दशमलव पद्धत प्रचलित झाली. भारतीय संस्कृतीमध्ये वेद, ज्योतिषशास्त्र, वास्तुशास्त्र यासारख्या विविध प्राचीन विद्यांसोबतच अंकशास्त्र (ऱ्ल्सदत्दुब्) या शास्त्रालाही विशेष स्थान आहे. जन्मतारीख, नाव, ग्रहस्थिती आणि संख्यांच्या आधारावर व्यक्तीचा स्वभाव, नशीब, आयुष्याची दिशा आणि भविष्यातील घटनांचा अंदाज घेणे, हे या शास्त्राचे मुख्य काम आहे. भारतीय अंकशास्त्राची मुळे वेदकाळात असून याचा उल्लेख ऋग्वेद, अथर्ववेद आणि बृहज्जातकसारख्या प्राचीन ग्रंथांमध्ये सापडतो. या शास्त्राला अंकविज्ञान किंवा अंकतत्त्व, असेही म्हटले जाते. भारतीय अंकशास्त्रात 1 ते 9 या अंकांचा संबंध नवग्रहांशी जोडला आहे. प्रत्येक ग्रहाची ऊर्जा विशिष्ट अंकाशी निगडित असते आणि त्या ग्रहाचा प्रभाव त्या अंकावरून व्यक्तीच्या आयुष्यावर होतो, असा विश्वास आहे. भारतीय अंकशास्त्रात प्रत्येक अंकाचा स्वत:चा विशेष अर्थ आणि स्वभाव आहे. जन्मतारीख आणि नावाच्या अक्षरांचे अंक संकलित करून त्या व्यक्तीच्या स्वभावाची आणि नशिबाची माहिती घेतली जाते.

महा उपाय : कपडे परिधान करताना : मेष, वृश्चिक (मंगळ वाले), मकर, कुंभ (शनी वाले) या राशींच्या स्त्राrपुऊष जातकांनी मंगळवारी/शनिवारी-गडद काळे, राखाडी, तांबडे, गुलाबी कपडे परिधान करू नयेत. वृषभ, तूळ (शुक्र वाले) कर्क (चंद्र), सिंह (सूर्य) या राशीच्या लोकांनी गुऊवारी पिवळसर, गोल्डन कलर व व्हाईट कलरचे कपडे घालू नये. धनु, मीन, मिथुन, कन्या या राशीच्या जातकांनी हिरवे, जांभळे, तपकिरी कपडे घालू नयेत.

सोपी वास्तू टिप : काचेचा पंख पसारलेला गरूड ईशान्य दिशेला ठेवल्यास प्रगती आणि आर्थिक सुबत्तेचे मार्ग खुले होतात.

मेष 

या आठवड्याच्या सुऊवातीला नव्या संधीचे दरवाजे उघडतील. व्यवसायात प्रगती होईल आणि आर्थिक लाभ संभवतो. कुटुंबातील संबंध सुधारतील, परंतु आरोग्याची काळजी घ्या. प्रवासाचे योग आहेत, जे लाभदायक ठरतील. मित्रांशी संबंध दृढ होतील. नवीन प्रकल्प सुरू करण्यास अनुकूल काळ आहे. आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय क्षमता सुधारेल.

उपाय : कपिला गाईची सेवा करा.

वृषभ

सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. प्रेमसंबंधात स्थिरता येईल. आर्थिक स्थैर्य मिळेल. व्यवसायात यश मिळेल आणि नवीन संधी मिळतील. कौटुंबिक जीवन थोडे संघर्षपूर्ण असेल. आरोग्य उत्तम राहील, परंतु आहारावर नियंत्रण ठेवा. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. जुने मित्र भेटतील आणि आनंददायक क्षण घडतील. प्रवासाचे योग आहेत, जे लाभदायक ठरतील.

उपाय : 5 बदाम मंदिरात ठेवा.

मिथुन

नवीन गुंतवणुकीसाठी योग्य काळ आहे. प्रेमसंबंधात नवीन सुऊवात होईल. व्यवसायात नवीन संधी मिळतील. आर्थिक लाभ संभवतो. कुटुंबातील संबंध सुधारतील. आरोग्याची विशेष काळजी घ्या. प्रवासाचे योग आहेत, पण कटू अनुभव येऊ शकतात. नवीन प्रकल्प सुरू करण्यास अनुकूल काळ आहे. आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय क्षमता सुधारेल.

उपाय : चिमुट भर मीठ पाण्यात घालून आंघोळ करा.

कर्क 

सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. हितशत्रू वाढतील. कुटुंबातील संबंध सुधारतील. आर्थिक लाभ संभवतो. व्यवसायात यश मिळेल. आरोग्य सांभाळा. सामाजिक क्षेत्रात प्रतिष्ठा वाढेल. जुने मित्र भेटतील आणि आनंददायक क्षण घडतील. गुंतवणुकीसाठी योग्य काळ आहे पण सल्ला मसलत करूनच करावे. प्रेमसंबंधात दुरावा येऊ शकतो. मित्रांवर अवलंबून राहू नका.

उपाय : गोमय वापरावे.

सिंह 

व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक लाभ संभवतो. कुटुंबातील संबंध सुधारतील पण थोडी अनबन असेल. आरोग्य नाजूक असेल, आहारावर नियंत्रण ठेवा. सामाजिक जबाबदारी वाढेल. मित्र ऐनवेळी दगा देतील. प्रवास घडेल. लाभदायक गुंतवणूक कराल. प्रेमसंबंधात हट्टीपणा जाणवेल. गुऊ-आदित्य योग प्रभाव लाभदायक ठरेल. निर्णयावर ठाम रहा.

उपाय : पिंपळाची पूजा करा.

कन्या

व्यवसायात नवीन संधी मिळतील. आर्थिक लाभ संभवतो. कुटुंबातील संबंध सुधारतील. आरोग्याची विशेष काळजी घ्या. प्रवासाचे योग आहेत. नवीन प्रकल्प सुरू करण्यास अनुकूल काळ आहे. आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय क्षमता सुधारेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. प्रेमसंबंधात स्थिरता येईल. गुऊ-आदित्य राजयोगाचा लाभ कामाच्या ठिकाणी मिळेल.

उपाय : वहाणा दान करा.

तूळ

नवीन संधी मिळतील. कौटुंबिक जीवन सुखद राहील. आरोग्य ठीक राहील, परंतु संसर्गजन्य आजारापासून सावध रहा. सामाजिक क्षेत्रात मित्र भेटतील आणि आनंददायक क्षण घडतील. प्रवास शक्मयतो टाळा. नवीन गुंतवणुकीसाठी योग्य काळ आहे पण त्यामध्ये निर्णय चुकू देऊ नका. प्रेमसंबंधात नवीन सुऊवात होईल. राजयोगाचा प्रभाव लाभदायक ठरेल.

उपाय : मांसाहार टाळा.

वृश्चिक 

आरोग्याची विशेष काळजी घ्या. निर्णय क्षमता सुधारेल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. प्रेमसंबंधात स्थिरता येईल. नवीन कामाकरता अशा लोकांची मदत घ्यावी लागेल जे नंतर त्रासदायक ठरू शकतात. व्यवसाय वाढीकरता केलेले प्रयत्न यशस्वी होतील. अति विश्वास घातक ठरेल. पैसे वसूल करताना नैराश्य येण्याची शक्मयता आहे. घरातील लहान व्यक्तींबद्दल चिंता असेल.

उपाय : न फाटलेले पिंपळपान जवळ ठेवा.

धनु

आर्थिक लाभ संभवतो. कुटुंबातील संबंध सुधारण्याकरता प्रयत्न कराल. आरोग्य चिंतादायक असेल. कामानिमित्त प्रवासाचे आयोजन कराल. जे कराल त्यात यश मिळेल. मित्रांचा सहवास आनंददायी ठरेल. व्यसनांपासून दूर रहा नाहीतर गंभीर आजारपण येऊ शकते किंवा सामजिक प्रतिष्ठा गमावू शकता. जवळच्या व्यक्तीला मानसिक आधार द्यावा लागेल.

उपाय : हळकुंड जवळ ठेवा.

मकर

आरोग्याची काळजी घ्यावी लागेल. तुमच्या मनातील हेतू साध्य होईल. प्रवासात नुकसान होण्याचे योग आहेत. आत्मविश्वास वाढेल आणि निर्णय क्षमता सुधारेल. कामाच्या ठिकाणी राजकारण वाढत आहे, सावध रहा. धार्मिक कार्यक्रमात भाग घ्याल. नोकरीत बदल करण्याचे मनोगत असेल तर योग्य वेळ आहे. वरिष्ठांकडून मानहानी होऊ नये, याची काळजी घ्या.

उपाय : विहिरीत नाणे टाका.

कुंभ

व्यवसायात यश मिळेल आणि नवीन संधी मिळतील. कौटुंबिक जीवन सुखद राहील. आरोग्य उत्तम राहील, परंतु आहारावर नियंत्रण ठेवा. आनंददायक घटना घडतील. जवळच्या नातेवाईकांच्या भेटीगाठी होण्याची शक्मयता आहे. आर्थिक बाबतीत सावध रहा. दिलेले पैसे परत मिळण्याची शक्मयता कमी आहे. कर्ज घेणे टाळा. गुऊवारी अचानक समस्या येईल.

उपाय : एक नाणे स्मशानात टाका.

मीन

कुटुंबातील संबंध सुधारतील. जागा बदलामुळे त्रास होण्याची शक्मयता आहे. घरातील व्यक्तींसाठी खर्च करावा लागेल. जुने मित्र कामी येतील. ज्येष्ठ व्यक्तीच्या आरोग्यासंबंधी चिंता आणि धावपळ करावी लागू शकते. जमेल तितके शांतपणे वागण्याचा प्रयत्न करा कारण काही प्रसंगात अति राग येऊ शकतो. आपण बरे की, आपले काम बरे हे धोरण ठेवा.

उपाय : चांदीच्या पेल्यातून दूध प्यावे.

Advertisement
Tags :

.