महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राशिभविष्य

06:15 AM Nov 06, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

अर्तक्मय... अद्भूत... अविश्वसनीय...चमत्कारीक...पण सत्य!

Advertisement

(भाग 1 : नमनाला घडा भर तेल!)

Advertisement

वर्षाचा शेवट सुरू झालेला आहे आणि 2025 च्या स्वागताकरिता आपण तयार आहोत. या महिन्याच्या सुऊवातीपासून जानेवारीच्या शेवटपर्यंत, एक अशी विद्या, एक अशी कला, एक असे ज्ञान जे ज्योतिष शास्त्राच्या सगळ्या सीमांना आपल्यामध्ये सामावून घेऊन आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक अडचणींवर तोडगा देऊ शकते, ज्याच्यामुळे आत्मविश्वास जागृत होऊन स्वार्थापासून परमार्थापर्यंत सगळे काही साधता येते, असे ज्ञान जे केवळ गुऊकृपेने प्राप्त झालेले आहे आणि मुक्तहस्ताने कोणतीही गोष्ट न दडवता, प्रॅक्टिकली उपयोग कसा करायचा हे समजावून सांगून ऋणातून मुक्त होण्याचा माझा हा एक छोटासा प्रयत्न आहे.

त्याचबरोबर श्र्रद्धा-अश्र्रद्धा, विश्वास-अविश्वास, मानणे-न मानणे याच्या पलीकडे जाऊन रोजच्या दैनंदिन आयुष्यात उपयोगाला येईल, अशी माहिती तुम्हाला देण्याचा हा एक छोटासा प्रयत्नदेखील आहे.

समजा तुम्ही एखाद्या ठिकाणी कामाकरता जाणार आहात तर ते काम होईल का? काही अडचणी येतील का? त्या अडचणींवर मात कशी करता येईल? आरोग्याच्या बाबतीमध्ये काही त्रास असेल तर तो त्रास किती दिवस टिकेल? त्यावर उपाय काय असेल? कोणाच्या मार्फत हा त्रास कमी होईल? व्यवसाय करत असताना कोणती काळजी घेतली पाहिजे?  आजच्या दिवसात आपण असे काय करावे ज्याने आपल्याला फायदा होईल? आणि हा फायदा केवळ आर्थिक नसून त्यातून समाधानही प्राप्त होईल का, आजचे वैद्यकशास्त्र अत्यंत प्रगत आहे यात शंकाच नाही आणि त्याची प्रगती होत आहे यामध्येसुद्धा वाद नाही. पण या ज्ञानाच्या आधारे रोग चिकित्सा संभव आहे का? आपल्या आयुष्यात सगळ्याच गोष्टी शुभ आणि सगळ्या गोष्टी अशुभ नसतात, मग शुभ कोणत्या आणि अशुभ कोणत्या? कित्येक वेळेला आपण एखाद्या व्यक्तीची वाट बघत असतो, मग या ज्ञानाच्या आधारे ती व्यक्ती सकुशल आहे ना? कुठे आहे? आजचा दिवस कसा जाईल? येणारे वर्ष कसे जाईल? ज्योतिष शास्त्रातील नक्षत्रे आणि या ज्ञानाचा काय संबंध आहे? या ज्ञानाच्या आधारे भविष्याचा मागोवा घेता येतो का? काही वेळेला आपण नकळत एखादी गोष्ट बोलून जातो आणि ती सत्य होते, हे कसे? इत्यादी गोष्टींचा ऊहापोह करणार आहोत.

सगळ्यात पहिल्यांदा ही लेखमाला कुणाकरता नाही ते सांगतो. जर तुम्ही संत असाल, कुठल्याही प्रकारचा मोह तुम्हाला नसेल, संसाराबद्दल तुम्हाला जराही आसक्ती वाटत नसेल, सगळ्या प्रकारच्या मोहमायेतून तुम्ही मुक्त झाला असाल, ‘आता उरलो उपकारापुरता’ अशी जर तुमची वृत्ती असेल, चांगले घडले काय किंवा वाईट घडले काय याचा तुम्हाला काहीही फरक पडत नसेल. तर हा लेख तुमच्याकरता नाही.

मग ही लेखमाला कोणासाठी आहे तर तुम्हाला जर वाटत असेल की आपल्या आयुष्यात पॉझिटिव्ह गोष्टी घडाव्यात, पुढे काय होणार आहे हे आपल्याला अगोदरच कळावे, आपण करत असलेल्या कामांमध्ये यश मिळणार की अपयश येणार हे आपल्यालापण कळावे. ज्यांना संसाराबद्दल आसक्ती आहे, ज्यांना घरदार आहे, ज्यांना यश मिळावे असे वाटते, ज्यांना प्रत्येक कामामध्ये अडचणी न येता कामे पूर्ण व्हावीत असे वाटते, त्यांना आपल्या संततीबद्दल चिंता आहे, काळजी आहे, आपल्या घरातील अडीअडचणींचा सामना कसा करावा याबद्दल ज्यांना माहिती करून घ्यायची आहे. या संपूर्ण विश्वात, एखाद्या जीवाने शरीर धारण करताच त्याच्या नाकपुड्यांमधून श्वासाची हालचाल सुरू होते. पण काही लोकांच्याच लक्षात येते की, अखंड श्वास एकाच वेळी दोन्ही नाकपुड्यांमधून वाहत नसून, ठरलेल्या वेळेनुसार तो दोन्ही नाकपुड्यांमधून एकामागून एक वाहतो. एका नाकपुडीची वेळ संपली की ती आपोआप दुसऱ्या नाकपुडीतून फिरू लागते आणि त्या हालचालीच्या एका नाकपुडीतून दुसऱ्या नाकपुडीकडे जाणाऱ्या हालचालीला त्याचा उदय म्हणतात, त्यामुळे श्वास आणि उच्छवास या प्रक्रियेला ‘स्वरोदय’ म्हणतात, असे म्हटले जाते. स्वागत आहे या अर्तक्मय... अद्भूत... अविश्वसनीय... चमत्कारिक... पण सत्य विश्वात. (क्रमश:)

मेष

हा काळ मध्यम असेल, निश्चित धोरणाने काम केल्याने तुम्हाला तुमच्या इच्छेनुसार यश मिळेल. हितचिंतकांचे योग्य मार्गदर्शन राहील. व्यस्त असूनही तुम्ही स्वत:साठीही थोडा वेळ काढाल. गुंतवणुकीसंबंधी कोणताही निर्णय घेऊ शकता.  जास्त जबाबदाऱ्यांमुळे थोडा खराब राहू शकतो. पण इतरांकडून अपेक्षा ठेवणे हाही तुमच्या समस्येवरचा उपाय नाही.

उपाय : तुळशीला दूध मिश्रित पाणी घाला.

वृषभ

कोणत्याही प्रकारचा प्रवास सध्या टाळलेला बरा. नुकसान होऊ शकते. भूतकाळातील नकारात्मक गोष्टी तुमचा आज ही खराब करू शकतात. व्यवसायात आपल्या प्रतिस्पर्ध्यांच्या क्रियाकलापांकडे दुर्लक्ष करू नका. यावेळी, कामाच्या ठिकाणी तुमची पूर्ण उपस्थिती ठेवा आणि कोणतीही जोखीम घेणे टाळा. नोकरदार लोक एखादे विशिष्ट ध्येय साध्य करण्यात यशस्वी होतील.

उपाय : दीपदान करा.

मिथुन

जुने नातेवाईक भेटतील. तब्येतीच्या तक्रारी दूर होतील. जुने प्रकरण पुन्हा डोके वर काढू शकते. आपली गुपिते कुणालाही सांगू नका, विश्वासघात होऊ शकतो.  व्यवसायाशी संबंधित प्रलंबित प्रकरणे निकाली काढण्यासाठी वेळ अनुकूल आहे, परंतु कपड्यांशी संबंधित कामासाठी दिवस थोडासा निराशाजनक असेल. भागीदारी संबंधित व्यवसायातील जुने मतभेद संपतील.

उपाय :गरजूला आर्थिक मदत करा.

कर्क 

कोणत्याही प्रकारच्या भागीदारीसाठी वेळ अनुकूल आहे. वैवाहिक जीवनात बाहेरील व्यक्तींना हस्तक्षेप करू देऊ नका. प्रेमसंबंधांमध्ये एकमेकांच्या भावनांचा आदर केल्याने नाते अधिक जवळ येईल. आरोग्य काहीसे कमजोर राहील. मात्र औषधांबरोबरच योगाभ्यास आणि जीवनशैलीत बदल करून आरोग्य चांगले ठेवा. घरच्यांचा सल्ला ऐकल्यास फायदा होईल.

उपाय : छायादान करा.

सिंह

जास्त ताणामुळे धावपळ करण्याची परिस्थिती राहील. इतरांच्या बाबतीत जास्त ढवळाढवळ करू नका. मुलांच्या कंपनीवर आणि क्रियाकलापांवर लक्ष ठेवणे आवश्यक आहे. जर तुम्ही कोणत्याही योजनेत पैसे गुंतवण्याचा विचार करत असाल तर अगोदर अनुभवी व्यक्तीचा सल्ला घेणे आवश्यक आहे. तुमच्या कामामध्ये इतरांची मदत घेणे आवश्यक असेल.

उपाय : सुगंधी स्नान करा.

कन्या

नोकरीत किंवा व्यवसायात स्वत:ला सिद्ध करण्यासाठी हा उत्तम काळ आहे. तुमची कागदपत्रे आणि फाइल्स व्यवस्थित ठेवा. वाहतूक व्यवसायात काही अडचणी येऊ शकतात. नोकरी करणाऱ्या व्यक्तीने आपल्या वरिष्ठांशी कोणत्याही प्रकारच्या वादात पडू नये. आणि तुमची कामे वेळेवर पूर्ण करा. जोडीदारासोबत कोणत्याही प्रकारचे मतभेद होऊ देऊ नका.

उपाय : सूर्याला अर्ध्य द्या.

तूळ

खर्चावर नियंत्रण ठेवायलाच पाहिजे. कारण याचा परिणाम घराच्या सुव्यवस्थेवर होईल. प्रेमसंबंधांमध्ये अधिक जवळीकता येईल. विद्यार्थ्यांचे अभ्यासापासून लक्ष विचलित होऊ शकते. यावेळी, त्यांचे लक्ष मोबाईल आणि मजा यावर असेल. काही लोक तुम्हाला भावनिकदृष्ट्या कमकुवत करण्यासाठी अफवा पसरवतील. अशा लोकांपासून सावध राहणे गरजेचे आहे.

उपाय : वाहत्या पाण्यात 6 वेलदोडे सोडा.

वृश्चिक

आरोग्याबाबत जागऊक रहा. आरोग्याशी संबंधित काही दीर्घकालीन समस्या असतील तर त्रास होऊ शकतो. नवीन कामे येऊ शकतात. उत्पन्नाची स्थिती सुधारेल, परंतु कागदोपत्री निष्काळजीपणामुळे नुकसान होऊ शकते. कामाचा दर्जा सुधारा. आयात-निर्यात व्यवसायात असलेल्यांना चांगला फायदा होईल. तुम्ही सध्या एखादी मालमत्ता किंवा वाहन खरेदी करण्याचा प्रयत्न कराल.

उपाय : गायीची सेवा करा.

धनू 

अनपेक्षित लाभाची परिस्थिती निर्माण होत आहे. बऱ्याच काळापासून सुरू असलेल्या कोणत्याही तणाव आणि चिंतापासून तुम्हाला आराम मिळेल. संपत्तीशी संबंधित रखडलेली प्रकरणे पूर्ण होण्याच्या दिशेने वाटचाल करू शकतात. मनोरंजन किंवा धार्मिक प्रवासाचा कार्यक्रमही केला जाईल. एखाद्या नातेवाईकांच्या कामासाठी चौकटी बाहेर जाऊन काम करावे लागेल.

उपाय : काळ्या वस्तू टाळा.

मकर

सध्याच्या व्यवसायात सुरू असलेल्या कामावर खूप मेहनत करावी लागेल. सरकारी नोकरीत असलेले लोक अतिरिक्त कामासाठी जबाबदार असू शकतात. कामाचा ताण राहील. तुम्हाला नको असलेल्या ठिकाणी काम करावे लागू शकते. जोडीदाराच्या तब्येतीची काळजी घ्या, घराच्या देखभालीसाठी हातभार लावा. प्रेमसंबंधांमध्ये भावनिक जवळीक वाढेल.

उपाय : शनिची उपासना करा.

कुंभ

जवळच्या नातेवाईकांच्या वैयक्तिक जीवनात सुरू असलेल्या समस्यांमुळे तुम्ही चिंतेत असाल, परंतु तुमचा हस्तक्षेप आणि सूचनादेखील योग्य तोडगा देऊ शकतात. नकारात्मक विचार तुमच्या कामात अडथळा आणू शकतात. विद्यार्थ्यांनी त्यांच्या शैक्षणिक कार्यात अधिक मेहनत घेण्याची गरज आहे. कौटुंबिक समस्येवर उपाय मिळाल्याने तुम्हाला आराम मिळेल.

उपाय : सूर्यास्तानंतर दूध टाळा.

मीन 

तुमच्या वैयक्तिक कामावर योग्य लक्ष केंद्रित करू शकाल. थकव्यामुळे पाय दुखणे, अपचन यासारख्या तक्रारी जाणवू शकतात. बेफिकीर न राहता लगेच औषध घ्या. सहकारी आणि कर्मचाऱ्यांचा पॉझिटिव्ह दृष्टिकोनही तुम्हाला आरामात ठेवेल. पण भागीदारीशी संबंधित कामात परस्पर मतभेद होऊ शकतात. नोकरदार लोकांना अतिरिक्त जबाबदारी मिळू शकते.

उपाय : हळदीची गाठ जवळ ठेवा.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article