खजाना राशिभविष्य
लक्ष्मीपूजनाचे गॉड पार्टिकल्स!!!
गॉड पार्टिकल म्हणजे जे अतिसूक्ष्म आहेत पण ज्यांच्यामुळेच सारे अस्तित्व टिकून आहे! ज्योतिषशास्त्राचा एक उपयोग म्हणजे कुठले काम कधी करावे याचे मार्गदर्शन. आपली हाव काही संपत नाही हे सत्य आहे आणि केवळ हेच सत्य आहे. अमुक एक वाजता पूजा केली तर जास्तीत जास्त फायदा होईल, भरपूर संपत्ती मिळेल, धंद्यामध्ये बरकत येईल (पैसा, पैसा, पैसा..!!) या आशेमुळे आपण लक्ष्मीपूजनाला थोड्याफार प्रमाणात विचित्र (विकृत?) स्वरूप दिले आहे. (बघा ना, ज्या देवीची पूजा आपण करतो त्या वेळेलाच लक्ष्मी बॉम्ब फोडतो. निसर्ग दूषित करतो!!) ज्या आईच्या अंगाखांद्यावर आपण खेळतो, जी आपल्याला भरवते, जिच्यामुळे आपले जीवन चालते तिच्या कुशीत जायला मुहूर्ताची गरज असते का हो? कुठल्याही प्रकारचे पूजन ही एक प्रकारची कृतज्ञता व्यक्त करण्याची मानवी पद्धत आहे. त्या भगवतीने आपल्याला सूर्य, चंद्र दिले म्हणून आपण निरांजन ओवाळतो, तिने आपल्याला शब्द दिले त्या शब्दांची आपण आरती गातो, तिने आपल्याला फुले दिली, तिला आपण सुगंध अर्पण करतो. काही लोक जे म्हणतात की बिल गेट्स, झुकरबर्ग यांनी लक्ष्मीपूजन कुठे केले? मग त्यांच्याकडे अमाप संपत्ती कशी आहे? त्यांना एक गोष्ट सांगावीशी वाटते की, लक्ष्मी या संकल्पनेला तुम्ही समजलेले नाही आहात. लक्ष्मी या शब्दातील ‘लक्ष’ म्हणजे फोकस आणि ‘लक्ष’ म्हणजे ध्येय किंवा aग्स् सुद्धा!!! श्र्रमलक्ष्मी, ज्ञानलक्ष्मी, विज्ञानलक्ष्मी, ध्येयलक्ष्मी ही सगळी लक्ष्मीचीच रूपे नाहीत का?
यावर्षी लक्ष्मीपूजनाच्या बाबतीत बराच भ्रम आहे. सगळ्या मतांचा योग्य आदर करून माझे मत मांडतो. 31 ऑक्टोबरला तुम्ही जेव्हा सकाळी उठाल तेव्हा अजूनही चतुर्दशी चालू असेल. साधारण दुपारी 3.30 पर्यंत चतुर्दशी तिथीच असेल. नंतर अमावास्या सुरू होईल. आपल्या सनातन धर्मात 5 मुख्य रात्री सांगितलेल्या आहेत. कृष्ण जन्माष्टमीची रात्र, होलिकादहनाची रात्र, नरक चतुर्दशी, दिवाळी आणि महाशिवरात्र. निशिथ काळ म्हणजे साधारण रात्री बारा ते दोनचा काळ. सामान्य दिवशी निशिथ काळी काळ्या शक्ती जागृत होतात. पण या महा-रात्रीमध्ये निशिथकाळी अतिशय शुभ लहरी जागृत होतात. या अति शुद्ध पवित्र लहरींना मी गॉड पार्टिकल म्हटले. ज्यांना हा निशीथ काळ साधायचा आहे त्यांनी 31 तारखेला रात्री 11.38 ते पहाटे 2 पर्यंत पूजन करावे. प्रदोषकाळ 31 ला 5.58 ते रात्री 8.05 पर्यंत. दिवाळी साजरी करायची ती 01/11/2024 ला. त्या दिवशी सूर्यास्तानंतर 2 तास 24 मिनिटांपर्यंत पूजन करावे. काहीजण कार्तिक पौर्णिमेला लक्ष्मीपूजन करतात, त्या दिवशीसुद्धा सूर्यास्तानंतर 2 तास 24 मिनिटांपर्यत पूजन करावे. या सगळ्यामध्ये 2 गोष्ट विसरू नका. अलक्ष्मीला (लक्ष्मीची मोठी बहीण-दरिद्रता) बाहेर काढणे. तोडगा-रात्री सात धान्यपीठाचा एक रोट, लोणचे, वाळलेल्या खोबऱ्याच्या वाटीत गूळ हे सगळे गावा बाहेरच्या पिंपळाजवळ ठेवणे आणि दुर्भाग्याला निरोप देणे व कचरा, नको त्या वस्तू, अडगळ, जात-पात, फेकून देणे आणि लक्ष्मीपूजन झाल्यावर उत्तरपूजा करताना आरती म्हणून निरोप न देता ‘इथेच कायम वास्तव्य कर’ असे म्हणणे! हे झाले कर्म कांडाकरताचे मुहूर्त. माझे मत दोन्हीही मुहूर्त हे पूजनाचेच आहेत ना? वर्षभर आपण जे कमावतो, ज्या शक्तीमुळे आपले घर चालते त्या शक्तीला धन्यवाद देण्याचे साधन म्हणजे पूजा! मग ती उद्या केली काय किंवा परवा केली काय? पण कर्मकांड हा विषय ज्योतिषशास्त्रात इतका घुसला आहे की काही विचारू नका. त्यात व्हॉट्सअॅप आणि इतर सोशल मीडियावर चालणारे हजारो प्रोग्रॅम मनात फक्त संभ्रम निर्माण करतात. सोप्या भाषेत अमावास्या, प्रदोष आणि राहूचे स्वाती नक्षत्र (मोत्याचा संबंध - समुद्र-लक्ष्मी) याचा मेळ म्हणजे दिवाळी. तिथी कधी सुरू होते आणि कधी संपते हे सूर्योदय आणि सूर्यास्तावर अवलंबून नाही. आपल्या भारतामध्ये उत्तरेकडचे पंचांग, पूर्वेकडचे पंचांग, पश्चिमेचे पंचांग आणि दक्षिणेकडचे पंचांग या सगळ्या पंचांगांचे मत वेगवेगळे असल्यामुळे थोडासा घोळ होतो. (लवकरच धर्मपीठ एक भारत-एक पंचांग आणेल!) उदाहरणार्थ उत्तरेकडे पौर्णिमेला मास संपतो आणि प्रतिपदेला नवीन महिन्याची सुऊवात धरतात. आपल्याकडे अमावास्येला महिना संपतो आणि अमावास्येनंतरच्या प्रतिपदेला नवीन महिना चालू होतो. आता या वेळेला लक्ष्मीपूजन कधी करावे त्या करता बरेचसे मत मतांतर झाले. भारताच्या पश्चिम भागाकडील शहरांमध्ये सूर्यास्त साधारण सहा वाजून पंधरा मिनिटांच्या आसपास होत आहे आणि तेच बघितले तर पूर्वेकडील भागामध्ये सूर्यास्त हा दुपारी साडेचारच्या सुमाराला होत आहे म्हणजे गुजरात राजस्थान याकडील प्रदेशांमध्ये एक नोव्हेंबरला प्रदोष काळ 24 मिनिटापेक्षा कमी मिळत आहे आणि पूर्वेकडे प्रदोष काळ 24 मिनिटापेक्षा जास्त मिळत आहे म्हणजे आपल्याकडच्या भागांमध्ये म्हणजे कोल्हापूर, सांगली, गोवा, बेळगाव इत्यादी. लक्ष्मीपूजनामध्ये महत्त्वाचे म्हणजे स्थिर लग्न आणि निशिथ काल, प्रदोष काल. पण अगोदरच म्हणालो त्याप्रमाणे, वर्षभर जिच्या कृपेमुळे आपले घर चालते तिला धन्यवाद देण्याचा हा काळ असेल तर मग मुहूर्त वगैरे हे दुय्यम नाही का? ‘तुका म्हणे हरीच्या दासा शुभकाळ दाही दिशा’ जेव्हा जगद्गुऊंंनीच सांगितले आहे, तिथे म्या बापड्याने काय बोलावे?
मेष
कुठे पैसे उधार दिले असतील तर ते आज परत मिळण्याची शक्मयता आहे. वादग्रस्त प्रकरणे सामंजस्याने सोडवण्याची हीच योग्य वेळ आहे. घरी नातेवाईकांचे आगमन होईल. तुम्हाला व्यक्तिगत कामांसाठीही वेळ मिळेल. कोणतीही जोखीमपूर्ण कार्य करण्यापासून दूर रहा. बेफिकीर राहून नियमांचे उल्लंघन करू नका. राग आल्याने तुमचे काम बिघडू शकते.
उपाय : भिकाऱ्याला वस्त्र दान द्या.
वृषभ
राजनैतिक बाबींमध्ये ढवळाढवळ करू नका. तुमच्या व्यवसायाशी संबंधित कामे थोड्या प्रयत्नाने सुटतील. नवीन ऑर्डर किंवा डील निश्चित होऊ शकते. पण तुमची कोणतीही महत्त्वाची योजना इतरांसोबत शेअर करू नका, अन्यथा तुमच्या कामाचा फायदा कोणीतरी घेईल. नोकरीत काही बदल अपेक्षित आहेत. वैवाहिक नात्यात गोडवा राहील.
उपाय : गरजूला पैसे द्या.
मिथुन
गैरसमजामुळे नातेसंबंधात दुरावा येऊ शकतो. अकारण थकवा आल्यासारखा वाटेल. त्याचा तुमच्या कामाच्या क्षमतेवरही परिणाम होईल. आरोग्य चांगले राहील. जिद्द सोडून काम करा. तरच इतरांचा दृष्टिकोन समजून घेणे शक्मय होईल. कठीण काळात स्वत:ला प्रेरित ठेवणे तुमच्यासाठी आवश्यक असेल. कलाक्षेत्राशी संबंधित लोकांसाठी दिवस महत्त्वपूर्ण ठरेल.
उपाय : निळे फूल गटारीत टाका.
कर्क
कामाचा अतिरेक होईल. जुन्या चुका अडथळा ठरू शकतात. वडिलांसोबत तणाव असू शकतो. मोठ्या कामाचे नियोजन होईल. अतिरिक्त खर्च होऊ शकतो. व्यवसायात अनेक अडथळे येऊ शकतात. नोकरीत तणाव राहील. आपल्या जोडीदाराच्या प्रत्येक गोष्टीवर टिप्पणी केल्याने परस्पर नाराजी होऊ शकते.
उपाय : वाहत्या पाण्यात दूध टाका.
सिंह
प्रलंबित कामे पूर्ण होण्याची दाट शक्मयता आहे. पण तुमच्या वैयक्तिक बाबी उघड करू नका. तुमचा आत्मविश्वास आणि मनोबल मजबूत ठेवून तुम्ही कोणत्याही नकारात्मक परिस्थितीवर उपाय शोधू शकाल. काहीवेळा तुम्हाला जास्त कामाच्या ओझ्यामुळे थकवा आणि तणाव जाणवू शकतो. तुमच्या काही बोलण्यामुळे किंवा हट्टीपणामुळे घरातील वातावरण बिघडू शकते.
उपाय : मंदिरात कुंकू द्या.
कन्या
तुमच्या जबाबदाऱ्या इतर लोकांसोबत शेअर करणे आता सोयीचे होईल. कुटुंबासाठीही थोडा वेळ काढा. यावेळी व्यवसायातील चालू घडामोडींवर लक्ष केंद्रित करा. कर्मचाऱ्यांचे पूर्ण सहकार्य मिळेल आणि जवळच्या व्यावसायिकांशी सुरू असलेल्या स्पर्धेत तुमचा विजय निश्चित आहे. नको त्या माणसाची भेट घ्यावी लागल्याने मूड खराब होऊ शकतो.
उपाय : हिरवी गोटी जवळ ठेवा.
तूळ
नोकरीत नवीन प्रोजेक्ट मिळाल्यास तुमची स्थितीही चांगली होईल. तुमच्या स्वभावात गांभीर्य आणा आणि आरोग्याप्रती तुमची जबाबदारी समजून घ्या. नकारात्मक गोष्टींकडे दुर्लक्ष करायला शिका. अनावश्यक ताण आणि चिडचिडेपणामुळे झोप न लागण्याच्या तक्रारी राहतील. कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीशी संबंधित चिंता दूर होऊ शकतात.
उपाय : सफेद मिठाई दान करा.
वृश्चिक
उत्पन्नात सुधारणा होईल. तुम्हाला तुमच्या मुलांकडून सहकार्य आणि चांगले कामाचे प्रस्ताव मिळतील. भरपूर कामांसोबतच नशीबही तुम्हाला साथ देईल. योजना व्यवस्थित चालतील आणि कोंडी संपेल. नवीन कामात जावेसे वाटेल. पित्ताचा त्रास होण्याची शक्मयता आहे. घराकरता खर्च करताना थोडी काळजी वाटू शकते.
उपाय : विष्णुला तुळस आणि मिठाई अर्पण करा.
धनू
तुमची काही स्वप्ने पूर्ण होणार आहेत. एखादी चांगली बातमी मिळाल्याने तुम्हाला आत्मविश्वास आणि नवीन ऊर्जा मिळेल. मित्र किंवा नातेवाईकांसोबत होणारे कोणतेही गैरसमज दूर होतील आणि नात्यात गोडवा येईल. तऊणांनी विशेषत: लक्षात ठेवावे की, काही कार्यामुळे समाजात बदनामीसारखी परिस्थिती उद्भवू शकते. आपल्या इमेजबद्दल सतर्क रहा.
उपाय : दूध दान द्या.
मकर
शेजाऱ्यांशी संबंध खराब करू नका किंवा आपले लक्ष निरूपयोगी क्रियाकलापांकडे देऊ नका. यावेळी कोणत्याही प्रकारचे व्यवहार करणे योग्य नाही. व्यवसायात आर्थिक स्थिती सुधारण्यासाठी प्रयत्न वाढवावे लागतील. यात-निर्यात संबंधित व्यवसायात लाभाची आशा आहे. सरकारी नोकरदारांना महत्त्वाचे अधिकार मिळू शकतात. कुटुंबीयांसोबत मनोरंजनाचे कार्यक्रम होतील.
उपाय : अन्नदान करा.
कुंभ
जुने वाद मिटवून प्रत्येक नातेसंबंध सुधारणे तुम्हाला शक्मय होईल. ज्या प्रकारे लोक तुम्हाला मदत करत आहेत, तुम्हालाही त्याच प्रकारे मदत करावी लागेल आणि मेहनत करावी लागेल. सध्याच्या परिस्थितीत सर्व काही सोपे वाटेल. मज्जातंतूचा ताण आणि वेदना यापासून मुक्त होण्यासाठी उपचारासोबत योग आणि व्यायामाकडे लक्ष द्या.
उपाय : हळदीचे दूध पिंपळाला घाला.
मीन
दूरदृष्टी ठेवून भविष्याशी संबंधित योजना बनवणे शक्मय होईल. कामाशी संबंधित महत्त्वाचे निर्णय योग्य पद्धतीने घेण्याचा प्रयत्न करा. तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे तुमच्यासाठी महत्त्वाचे आहे. तुमच्या जोडीदाराकडून मिळणाऱ्या सूचनांमुळे तुम्हाला आनंद वाटेल आणि त्याचा फायदाही होईल. कामाच्या ठिकाणी वरिष्ठांच्या सूचनांकडे दुर्लक्ष करू नका.
उपाय : नदीत नाणे टाका.