For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य

06:10 AM Oct 09, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य
Advertisement

बुधवार दि. 9 ते मंगळवार दि. 15 ऑक्टोबर 2024 पर्यंत

Advertisement

कुपुत्रो जायेत क्वचिदपि कुमाता न भवति

दसरा अगदी तोंडावर आलेला आहे. अनेक वाचकांनी फोन वरून संपर्क साधून दसऱ्याला किंवा नवरात्रीत करायच्या तोडग्यांबद्दल विचारणा केली. त्यांच्या विनंतीला मान देऊन काही तोडगे सुचवत आहे. माझा कायम प्रयत्न असतो की, वाचकांना सोप्यातले सोपे आणि सहज करता येतील, असे तोडगे सांगावे. कुठलाही मंत्र सांगण्यावर माझा भर नसतो, कारण मंत्रांचे उच्चार हे ‘रेझोनन्स इफेक्ट’ वर काम करतात आणि त्यामुळे रिझल्ट मिळतो. चुकीच्या उच्चारामुळे अर्थाचा अनर्थ होऊ शकतो. मागे एकदा अमेरिकेत राहणाऱ्या एन. आर. आय. माणसाने संपर्क साधला होता. दोन पत्नींच्या निधनानंतर तिसरा विवाह करू का असा प्रश्न होता. त्याने हेही सांगितले की, दुर्गा सप्तशतीचा तो पाठ करत होता. मला वेगळ्याच प्रकारची शंका आली आणि त्याच्याकडून पाठ म्हणून घेतला. त्यामध्ये एका श्लोकात त्याने इतकी मोठी चूक केली होती की सांगता सोय नाही. ‘भार्यां रक्षतु भैरवी’ असे म्हणण्याऐवजी तो ‘भार्यां भक्षतु भैरवी’ असे म्हणत होता! म्हणून अर्थाचा अनर्थ होण्यापेक्षा मंत्र न सांगितलेले बरे. काही उपाय देत आहे करून पहा. दुसरा एक मुद्दा असा, आपण काहीही कर्म करतो ते आपण त्या देवतेच्या चरणी अर्पण करावे. उदाहरणार्थ समजा माऊतीच्या मंदिरात आपण गेलो, आपण काय अर्पण करू शकतो? सगळे काही त्याने दिलेले आहे. मग माऊतीला अत्यंत प्रिय असल्याने रामनामाला आपण त्याला अर्पण का करू नये? मंदिरात शांत चित्ताने बसावे जमेल तितका राम नामाचा जप करावा, आणि तो माऊतीकडे सुपूर्द करावा, प्रार्थना करावी की, हे रामभक्त हनुमंता, तुला प्रिय असलेल्या रामनामाला तुलाच अर्पण करत आहे. कुठल्याही पूजेनंतर आपण श्रीकृष्णार्पणमस्तू असे म्हणतो, असे का तर आपल्या बुद्धीपेक्षा त्या भगवंताच्या दृष्टीवर आपला जास्त विश्वास आहे. आपण केलेल्या कर्माचा कधी आणि केव्हा परतावा द्यायचा ते आपल्यापेक्षा त्याला जास्त कळते, बरोबर ना? दसऱ्याला शमीच्या झाडाचा महिमा खूप जास्त आहे. ओरबाडून पाने तोडण्यापेक्षा, झाडाला इजा करण्यापेक्षा झाडाचे पूजन करून चार मुखी दिवा झाडाजवळ लावावा. घटस्थापना केलेल्या मातीला पिवळ्या आणि पांढऱ्या (गुऊ आणि चंद्र) कपड्यात बांधून तिजोरीमध्ये ठेवावे. दसऱ्याच्या दिवशी हनुमान चालीसाचे शंभर पाठ करणाऱ्याची इच्छा पूर्ण होते यात शंका नाही. या दिवशी झाडू दान करण्याला अत्यंत महत्त्व आहे. पण हे दान सत्पात्री असावे. दान देताना आपली नजर दान घेणाऱ्याच्या पायाकडे असावी. दान दिल्यानंतर दक्षिणा देणे अत्यंत गरजेचे असते. दसऱ्याला निळा किंवा काळा रंग शक्मयतो वापरू नये. ज्यांची मुले बिघडली आहेत त्यांनी मुलावरून लाल पिवळा धागा ओवाळून आपट्याच्या झाडाला बांधावा. ज्यांचे कर्ज जास्त झाले आहे त्यांनी पिंपळाला दूध, पाणी आणि साखर अर्पण करावी. या दिवशी शक्मयतो कोणीही दिलेले काहीही खाऊ नये. आपल्या घराच्या नैर्त्रुत्य दिशेला तेलाचा दिवा लावून ठेवणे शुभ असते. विद्यार्थ्यांनी या दिवशी पावणे बारा ते सव्वा बाराच्या दरम्यान नवीन विषय शिकायला प्रारंभ करावा.

Advertisement

हा लेख लिहायचे अगोदर दै. तऊण भारत वाचला आणि मन अत्यंत विषण्ण झाले. आपण जे वाचले आणि जे आपल्याला कळले हे तसेच लिहिले आहे का? आपण वाचताना काही चूक तरी नाही ना केली त्याची वारंवार खात्री करून घेतली. बातमी अशी होती की महाराष्ट्रात एका मुलाने (?) आपल्या आईचा गळा दाबून खून केला, इतकेच नव्हे तर चाकूने तिचे पोट फाडून तिथे अवयव भाजून खाल्ले आणि हे सगळे का तर दारू प्यायला पैसे दिले नाहीत म्हणून. अशा घटना आपल्या आसपास घडत असताना परम मातृ सत्तेबद्दल लिहिण्याकरता माझ्याकडे शब्द तरी राहतील का? ऱूग्दहत् ण्rग्स Rाम्दे् ँल्rाaल् (ऱ्ण्Rँ) ने अधिकृतरित्या प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार 2022 मध्ये 31,000 बलात्काराच्या घटना घडल्या म्हणजे दिवसाला 86. यत्र नार्यस्तु पूज्यन्ते रमन्ते तत्र देवता: । यत्रैतास्तु न पूज्यन्ते सर्वास्तत्राफला: क्रिया: (मनुस्मृति 3/56) असे म्हणणारा आपला समाज! समाज म्हणून घ्यायच्या लायकीचे तरी आपण आहोत का याचा विचार करण्याची आज गरज आहे. केवळ अपराधी बुद्धी असलेल्या जनावरांचा समूह असे आपल्याला म्हटले तरी गैर ठरणार नाही असे वाटते. वर दिलेल्या श्लोकामध्ये असे म्हटले आहे की जिथे नारीची म्हणजे स्त्राrची पूजा होते तिथे देवता वास करतात आणि जिथे पूजा होत नाही, नारीला सन्मान दिला जात नाही तिथे कुठलेही सुकर्म केले तरी ते निष्फळ असते. मला माहिती आहे की, लेख हा ज्योतिषीय असला पाहिजे. माझ्या वाचकांना मी तोडगे दिले पाहिजे ज्यातून त्यांचे भले होईल. पण देवीच्याबद्दल बोलत असताना, सगळ्या सृष्टीच्या आईबद्दल बोलत असताना अशा सगळ्या बातम्या जेव्हा कामावर पडतात तेव्हा मी कुठल्या तोंडाने तुम्हाला भगवतीला प्रसन्न करण्याचे मार्ग सुचवू? शोचन्ती जामयो यत्र विनश्यत्याशु तत्कुलम् । न शोचन्ती तु यत्रैता वर्धते तद्धि सर्वदा ।। (मनुस्मृति 3/57 ।।) ज्या कुटुंबात स्त्रिया (जसे की आई, पत्नी, बहीण, मुलगी.) दु:खाने भरलेल्या असतात त्या कुटुंबाचा लवकरच नाश होतो. ज्या कुटुंबात स्त्रिया शोक करत नाहीत ते कुटुंब नेहमीच समृद्ध असते.

मेष

या आठवड्यात तुम्हाला काही वरिष्ठ लोकांशी संवाद साधण्याची संधी मिळेल, जे खूप सकारात्मक असेल. जवळच्या नातेवाईकांकडून चांगला प्रस्ताव आल्याने आनंदी वातावरण राहील. काही समस्या वेळोवेळी उद्भवू शकतात. परंतु त्यावर उपायही सापडतील. अनोळखी आणि अपरिचित लोकांशी व्यवहार करताना काळजी घ्या, तुमची फसवणूक होऊ शकते.

उपाय : देवीला कुंकुमार्चन करा.

वृषभ

यावेळी खूप संयम बाळगणे गरजेचे आहे. नातेवाईकांशी मतभेद झाल्यास, संभाषणामुळे संबंध सुधारतील. तुमच्या कोणत्याही समस्या मित्रांच्या मदतीने दूर होतील. घरात आणि बाहेर सन्मानजनक परिस्थिती असेल. विद्यार्थी आणि तऊणांना त्यांच्या अभ्यासासोबत इतर क्षेत्रातील माहिती मिळवण्यात रस राहील. व्यस्त असूनही तुम्हाला तुमच्या वैयक्तिक कामासाठी वेळ मिळेल.

उपाय : गायीला गोड चपाती घाला.

मिथुन

तुमच्या मेहनतीनुसार तुम्हाला कामाच्या ठिकाणी योग्य फळ मिळेल. आर्थिक स्थितीही सुधारेल, परंतु विरोधकांच्या कारवायांवर लक्ष ठेवणेदेखील आवश्यक आहे. सरकारी नोकरीत कोणत्याही प्रकारच्या अनुचित कामात रस घेऊ नका. काही चौकशी वगैरे होऊ शकते. सध्याच्या वातावरणामुळे निष्काळजी राहणे योग्य नाही. पद्धतशीर दिनचर्या ठेवावी.

उपाय : लिमलेटच्या गोळ्या वाटा.

कर्क

तुमच्या योजना गोपनीय पद्धतीने राबवा. थोडे सावध राहिल्यास तुमच्या योजना आणि कार्य यशस्वी होतील. वरिष्ठ आणि हितचिंतक यांचे सहकार्यही तुमच्यासाठी उपयुक्त ठरेल. छोट्या-छोट्या गोष्टींवर राग आल्याने सुरू असलेले काम बिघडू शकते. तथापि, आत्ताच मेहनत केल्याप्रमाणे फळ मिळणार नाही. पण तुमचे प्रयत्न अजिबात कमी करू नका. मुलांशी संबंधित काही अपेक्षा पूर्ण न झाल्याने मन अस्वस्थ राहील.

उपाय : गायीला पालक घाला.

सिंह

व्यवसायात सुरू असलेले अडथळे दूर होतील. हॉटेल आणि रेस्टॉरंटमध्ये काम करणाऱ्यांना चांगला नफा होणार आहे. तुमच्या कामात कर्मचाऱ्यांचे योग्य सहकार्य मिळेल. कोणतेही काम करताना कायदेशीर नियमांचे पालन करणे आवश्यक आहे, अन्यथा तुम्ही अडचणीत येऊ शकता. आरोग्य चांगले राहील. परंतु समस्यांमुळे डोकेदुखी आणि मायग्रेनचा त्रास होऊ शकतो.

उपाय : लाल कपडा दान करा.

कन्या

प्रत्येक काम व्यवस्थित आणि पद्धतशीरपणे केल्याने तुम्ही लवकरच ध्येय गाठाल. ज्यामुळे तुम्हाला तुमच्यात ऊर्जा आणि आत्मविश्वास भरलेला जाणवेल. कुटुंबासोबत खरेदी इत्यादीमध्येही वेळ जाईल. इतरांकडून दिशाभूल होऊ शकते. नातेसंबंध बिघडतील आणि तुमची दिनचर्याही विस्कळीत होईल. रागावर नियंत्रण ठेवा. ईर्षेमुळे, कोणीतरी तुमच्या मागे नकारात्मक अफवा पसरवू शकते.

उपाय : लहान मुलीचा आशीर्वाद घ्या.

तूळ

व्यवसायाला पुढे नेण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांमध्ये मोठ्या प्रमाणात यश मिळेल. कोणताही महत्त्वाचा निर्णय घेण्यापूर्वी अनुभवी व्यक्तीचा सल्ला आणि मार्गदर्शन घ्या. सरकारी नोकरीत असलेल्या लोकांनी सार्वजनिक व्यवहार करताना विशेष काळजी घ्यावी. काही विरोधक सक्रिय होऊ शकतात. वैवाहिक जीवन आनंदी राहील. कुटुंबात सुख-शांतीचे वातावरण राहील.

उपाय : शुक्रवारी पेढे वाटा.

वृश्चिक

कोणाशीही व्यवहार करताना सावधगिरी बाळगा. मार्केटमध्ये अडकलेल्या पेमेंटचा काही भाग वसूल करता येईल. नोकरीत खूप व्यस्तता राहील. पती-पत्नीमधील गैरसमज दूर होतील. आणि कुटुंबात आनंदी वातावरण राहील. अनावश्यक खर्च वाढतील, परंतु सध्या ते कमी करणे कठीण होईल. मुलांबाबत काही काळजी राहील. समस्या शांततेने सोडवा. पण कोणताही महत्त्वाचा निर्णय घेऊ नका.

उपाय : जलचरांना खाणे घाला.

धनु

कठोर परिश्र्रम करण्याची परिस्थिती असेल, परंतु त्याचे उत्कृष्ट परिणामदेखील मिळतील. तुमच्या आर्थिक योजनांची अंमलबजावणी करण्यासाठी योग्य वेळ द्या. तुम्ही महत्त्वाची कामगिरी करू शकता. पद्धतशीर दिनचर्या केल्याने तुम्ही ताजे आणि तणावमुक्त राहाल. कामाच्या ठिकाणी चालू घडामोडींवर लक्ष केंद्रित करा. परिश्र्रम अधिक आणि परिणाम कमी अशी परिस्थिती आहे.

उपाय : काळे फूल गटारीत टाका.

मकर

आरोग्य चांगले राहील. परंतु महिलांना किरकोळ समस्या असली तरी त्यांनी डॉक्टरांचा सल्ला घेण्यास उशीर करू नये. काही नवीन उपलब्धी तुमची वाट पहात आहेत. या अद्भुत वेळेचा योग्य वापर करा. सामाजिक स्तरावरही एखाद्या अनुभवी व्यक्तीच्या मदतीने तुम्हाला नवी ओळख मिळणार आहे. यावेळी, तुमचे विरोधकही तुमच्या व्यक्तिमत्त्वापुढे शरण जातील.

उपाय : खिशात देवीचा फोटो ठेवा.

कुंभ

आर्थिक पैलूंबाबत काही चिंता असू शकतात, यावेळी योग्य बजेटचे नियोजन करण्याचा प्रयत्न करा. तुमची योजना पूर्ण खात्री झाल्यावरच अमलात आणा. घर सुरळीत ठेवण्यासाठी आपले योगदान देणे खूप महत्त्वाचे आहे असे वाटेल. व्यवसायात तुम्ही तुमच्या कामाची पद्धत वेळोवेळी बदलल्यास तुमचे दैनंदिन उत्पन्न पूर्वीपेक्षा चांगले होईल. कार्यालयाशी संबंधित कोणत्याही बदलाची माहिती मिळू शकते. सध्या कामाचा ताण जास्त असेल.

उपाय : जलदान करा.

मीन

कौटुंबिक कार्यात तुमचे सहकार्य आणि योगदान यामुळे वातावरण आनंददायी होईल. हवामानातील बदलामुळे घशातील संसर्ग आणि खोकला-सर्दीची समस्या उद्भवू शकते. अजिबात बेफिकीर राहू नका. योग्य उपचार घ्या. इतरांची जबाबदारी घेऊ नका. तुमची प्रगती पाहून काही लोकांमध्ये मत्सराची भावना निर्माण होऊ शकते. तुम्ही या सर्व गोष्टींकडे दुर्लक्ष करून तुमच्या स्वभावात सहजता ठेवावी.

उपाय : बत्तासे दान द्या.

Advertisement
Tags :

.