For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशि भविष्य

06:01 AM Jul 31, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशि भविष्य
Advertisement

विवाह गुण मिलन चुलीत घातले...मग पुढे काय?

Advertisement

खंत एका गोष्टीची वाटते की जेव्हा मुला-मुलींची लग्ने होणे हाच मोठा प्रश्न झालेला आहे. एकमेकांकडे असलेल्या अपेक्षांचा बोजा असहनीय झालेला आहे.  ज्यांची लग्ने होत नाहीत त्यांच्या मानसिक परिस्थितीचा विचारही न करता, केवळ अष्टकूट मिलनाच्या आधारे पत्रिका जुळते की जुळत नाही हे ठरवले जाते. बाकीच्या कोणत्याही गोष्टींकडे विचारही केला जात नाही. तेव्हा ज्योतिषशास्त्राकडे लोकांची अनास्था वाढण्याचे हे कारण होऊ शकते. ज्योतिषाची जबाबदारी केवळ घटना कधी घडेल ते सांगण्याची नसून त्या घटनेचा परिणाम कसा होईल. SWOT Analysis म्हणजे स्ट्रेंथ विकनेस अपॉर्च्युनिटी आणि थ्रेट्स (विवाह केला तर चांगले काय होईल, कमकुवत गोष्टी कोणत्या, संधी काय आहेत आणि धोके काय असतील) याबद्दल चर्चा करणे आणि कौन्सिलिंग करणे हे अत्यंत गरजेचे आहे. ‘विवाह गुण मिलन चुलीत घाला’ हा मथळा वाचल्यानंतर बऱ्याच लोकांचा हा गैरसमज झाला की मी एकूणच ज्योतिषशास्त्राबद्दल नकारात्मक बोलतोय. त्यानंतरचे दोन लेख वाचल्यानंतर बराच अंशी ‘पारंपरिक’ म्हणजे आपल्याकडे जी चालते ती गुण मिलन पद्धत कशी कमकुवत आहे हे लक्षात आले. पण मुख्य प्रश्न अनुत्तरीतच राहिला की अरेंज मॅरेज म्हणजे पालकांनी ठरवलेल्या मुला-मुलीच्या लग्नामध्ये ज्योतिष शास्त्राचा काही उपयोग किंवा रोल आहे का नाही? ज्यांना असे वाटले की मी ज्योतिषशास्त्राच्या विरोधात बोलतोय त्यांना इतकेच सांगायचे आहे की ‘कट मी अँड आय विल ब्लीड एस्ट्रोलॉजी’ म्हणजे माझ्या रक्ताच्या कणाकणामध्ये ज्योतिषशास्त्र आहे. मग मी ज्योतिषशास्त्राच्या विरोधात बोलूच कसे शकेन? मला इतकेच म्हणायचे होते की तकलादू गुण मिलन पद्धती यामध्ये 36 गुणांपैकी किती गुण मिळाले हे पाहिले जाते आणि त्यावरून विवाह ठरवला जातो. या पद्धतीला चुलीत घाला. मग याला सोल्युशन काय? ज्योतिषशास्त्रावरून मुला-मुलीची कुंडली समोर असताना खालील पाच मुद्दे माझ्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचे आहेत.

मुद्दा 1 - आयुर्मर्यादा : ज्योतिषशास्त्रात साधारणत: माणसाचे आयुष्य हे तीन प्रकारे बघितले जाते, अल्पायू (वय वर्षे 30 पर्यंत), मध्यम आयू (वय वर्षे 60 पर्यंत) आणि दीर्घायू (वय वर्षे 60 च्या पुढे). (इथे आणखीन एक मुद्दा स्पष्ट करू इच्छितो की पराशर, वराह मिहिरापासून ते आत्ताच्या कोणत्याही पद्धती (के.पी., कस्पल ईन्टर लिंक, 4 स्टेप, 3.5 स्टेप.) आयूचे अचूक भाकित करण्यास असमर्थ आहेत). दोघांपैकी एक आधी जाणार हे 100 टक्के. जीवन परिपूर्ण भोगावे, एकाचे आयुष्य खूप कमी आणि दुसऱ्याचे खूप जास्त असा विवाह होऊ नये. ज्योतिषशास्त्र याबद्दल मार्गदर्शकाची भूमिका निभावते.

Advertisement

मुद्दा 2 - शारीरिक सुख : पूर्वीचा काळ अत्यंत वेगळा होता. ‘पदरी पडले आणि पवित्र झाले’ अशी मानसिकता होती. साधारणत: 40-50 वर्षांपूर्वी मुला-मुलींच्या शारीरिक गरजांचा आणि एकमेकाला त्याबाबतीत साथ देण्याच्या प्रवृत्तीचा विचार करायचा असतो हा विचार तेव्हा नव्हताच असे म्हणायला हरकत नाही. पण आज परिस्थिती खूप वेगळी आहे, कित्येक विवाह, केवळ शरीर सुखाच्या बाबतीमध्ये संतुष्टी/तृप्ती न मिळाल्याच्या कारणामुळे मोडताना आपण बघतो. घटस्फोटाचे प्रमाण यामुळे कित्येक पटीने वाढलेले आहे. कित्येक वेळेला पालकांना आपल्या मुलाच्या किंवा मुलीच्या शारीरिक सुखाच्या कल्पनेविषयी असलेल्या मान्यतांबद्दल माहीतच नसते, अशी कितीतरी उदाहरणे पाहिली आहेत की आपल्या सेक्सुअल प्रेफरेंसबद्दल पालकांपासून लपवले जाते. पालकांच्या मर्जी करता किंवा त्यांना वाईट वाटू नये म्हणून मुले ही गोष्ट त्यांच्यापासून लपवतात आणि लग्न करतात. लग्नानंतर या गोष्टी बाहेर येतात आणि यात दोन कुटुंबांची पूर्ण वाताहत होते. या प्रकरणांना थांबवण्याकरता पालकांमधील आणि मुलांमधील सुसंवाद हा अत्यंत गरजेचा आहे. पालकांनी मुलांशी आणि मुलांनी पालकांशी मोकळेपणाने बोलणे गरजेचे आहे. यातून कित्येक प्रश्न मार्गी लागू शकतात आणि एखाद्याचे आयुष्य बरबाद होण्यापासून वाचू शकते. ज्योतिषशास्त्रात सप्तम-सप्तमेश, अष्टम-अष्टमेश, शुक्र, मंगळ यावरून साधारण अंदाज घेता येतो.

मुद्दा 3 - आरोग्य : हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. विवाहापूर्वी मुलांचे किंवा मुलीचे आरोग्य कसे होते याची चौकशी करणे आजही आपल्याकडे एक दुय्यम मुद्दा म्हणून पाहिले जाते. जर कोणी सांगितलेच किंवा शंका आली तरच याबाबतीत चौकशी केली जाते. विवाहापूर्वीचे आरोग्य कसे आहे. याबद्दल नुसती चौकशी करण्यापेक्षा ज्याप्रमाणे आपण कुंडली आणि बायोडेटा पाठवतो त्याप्रमाणे ‘आरोग्य डेटा’ पाठवायला काय हरकत आहे? विवाहापूर्वी केल्या जाणाऱ्या काही वैद्यकीय चाचण्या अत्यंत गरजेच्या आहेत. जशा की आरएच पॅक्टर, रक्त चाचणी आणि रक्तगट चाचणी, अनुवांशिक चाचणी, थॅलेसेमिया चाचणी, एचबी इलेक्ट्रोफोरेसीस/एचबी टायपिंग चाचणी, हिपॅटायटीस बी व्हायरस अँटीबॉडी चाचणी, हिपॅटायटीस बी, सी, ए व्हायरस प्रतिजन चाचणी, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी, पेल्विक अल्ट्रासाऊंड, सिफिलीस चाचणी, एचआयव्ही/एड्स चाचणी, अँटी-ऊबेला चाचणी/ऊबेला सेरोलॉजी. लक्षात घ्या आज जरी तुम्हाला या सगळ्या गोष्टी अनावश्यक वाटत असल्या तरी येणाऱ्या दहा वर्षानंतर जन्म कुंडली  बरोबरच आरोग्याच्या चाचण्यांचीही आरोग्य कुंडलीही द्यावीच लागेल, यात शंका नाही.

मुद्दा 4 - संतती : पूर्वी विवाहाचा उद्देश हा पुनरुत्पादन किंवा संतती प्रजनन हा होता. आपल्या कुळाची वाढ व्हावी, आपले नाव कोणीतरी चालवावे, हा त्यामागचा उद्देश होता. पण आजकाल परिस्थिती बदललेली आहे. आजही जरी संतती हा मुद्दा असला तरी केवळ तोच मुद्दा राहिलेला नाही. कित्येक जोडपी स्वेच्छेने संतती होऊ न देण्याचे ठरवतात. असे असले तरी दोघांच्या कुंडलीवरून बीज क्षेत्र आणि स्फूट क्षेत्र यांच्यावरून संततीसाठीचे ज्योतिषशास्त्राrय नियम बघून संतती होण्याची शक्यता काढता येते. आता इथे आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आजचे वैद्यकीय शास्त्र पूर्वीपेक्षा किती तरी पुढे गेले आहे.

मग पारंपरिक गुणमिलन पद्धती म्हणून आपण काय घेऊ शकतो? ‘योनी’  ज्याच्यामुळे सेक्सुअल टेंडन्सीचा विचार केला जाऊ शकतो, अशुभ नवपंचम, अशुभ द्विद्वादश आणि मुख्य म्हणजे षडाष्टक या काही गोष्टी विचारात घेतल्या जाऊ शकतात. हे विचार मी माझ्या पद्धतीने आणि माझ्या अनुभवावरून मांडलेले आहेत. त्यातील किती घ्यायचे किती सोडायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न. बरं हा एवढा सगळा अभ्यास करून ज्योतिषाला त्याचे मानधन किती मिळायला हवे याचाही विचार समाजाने केला पाहिजे. बरोबर ना? मंडप घालण्यासाठी लाखो रुपये खर्च करणारे ज्योतिषाला आणि विवाहाचे पवित्र मंत्र म्हणून वर-वधूला जन्मभर पुरतील इतके आशीर्वाद देणाऱ्या गुरुजींना पैसे देण्यात कंजुषी करतात ही विडंबना आहे. तूर्तास तितकेच.

राशीफल 31 जुलै 2024

मेष

स्वतंत्र उद्योग धंद्यात असाल तर भरभराट संभवते. नोकरीत असाल तर आपल्या कामावर आपले वरिष्ठ खूश होऊन आपली पदोन्नती संभवते. मानमरातब मिळेल. समाजात एक श्रेष्ठ दर्जा मिळेल. वडिलांचा आशीर्वाद मिळेल. स्वतंत्र व वडिलांच्याच व्यवसायात असाल तर त्यांच्या सल्ल्यानेच निर्णय घ्या. त्यांचा अनुभव आपल्याला चांगलाच फायदेशीर होईल. एकंदरीत हा आठवडा आपल्याला छान जाईल.

उपाय : महालक्ष्मीची आराधना करा.

वृषभ

हा आठवडा तुम्ही सतत लाभात असण्याचा संभव आहे. काही समारंभाचे निमित्ताने नातेवाईकांच्या व मित्रपरिवाराच्या गाठीभेटी होण्याची शक्मयता आहे. त्यामुळे एक सात्विक आनंदाचा आपल्याला लाभ होईल. काही चांगल्या व उंची वस्तूंची खरेदी होण्याचा संभव आहे. कदाचित या वस्तू तुम्हाला भेटीदाखल पण मिळून जाण्याचीही शक्मयता आहे. आनंदात रहा, खूश रहा.

उपाय : गणपतीची उपासना करा.

मिथुन

वाहन चालवताना सांभाळून आणि रहदारीचे नियम पाळून चालवा. अजिबात दुर्लक्ष करू नका. खर्चावर नियंत्रण असू द्या. योग्य त्या ठिकाणीच पूर्ण विचारांती खर्च करा. नाहीतर अपव्यय होण्याची शक्मयता आहे. या आठवड्यात कुणाकडून उधारीवर अथवा कर्ज म्हणून सुद्धा पैसे घेऊ नका. कोर्ट कचेरीची कामे चालू असल्यास या आठवड्यात तात्पुरते स्थगित ठेवा किंवा मुदत मागून घ्या.

उपाय : मारुतीचे कुठलेही स्तोत्र दररोज वाचा.

कर्क

मन चंचल होण्याचा संभव आहे. सांभाळा. एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून मनाची चिडचिड होण्याची शक्मयता आहे. शांत राहण्याचा प्रयत्न करा. पावसा-पाण्याचे दिवस आहेत. मुलांचा लांबचा प्रवास शक्मयतो टाळा. हा आठवडा तुम्हाला सांभाळून राहण्यास सांगत आहे. आचरण शुद्ध ठेवा. प्रलोभनाला बळी पडण्याची शक्मयता आहे. मनावर ताबा ठेवून प्रलोभने दूर ठेवा.

उपाय : महादेवाची आराधना करा.              

सिंह

कुटुंबाचा सहवास मिळेल. पण पैतृक संपत्तीच्या बाबतीत काही चर्चा चालू असल्यास त्यातून तुम्हाला फायदा होण्याची शक्मयता कमी आहे. वाणीवर थोडा संयम ठेवण्याची गरज आहे. कदाचित तुमच्या ऊक्ष बोलण्यामुळे होणारे कामही होणार नाही. काही देण्या घेण्याचे अथवा खरेदी विक्रीचे व्यवहार शक्मयतो या आठवड्यात न केलेलेच बरे. हा आठवडा आपल्याला संयमाने वागण्यास सांगत आहे.

उपाय : संकटमोचन हनुमान स्तोत्र दररोज वाचा.

कन्या

या आठवड्यात काहीतरी कारणावरून भावंडांशी मतभेद होऊ शकतात. शक्यतो शांत राहण्याचा प्रयत्न करा. वादावादी होऊ देऊ नका. मित्रांशीसुद्धा मतभेद होऊ शकतात. त्यामुळे राहता येईल तितके शांत रहा. खाण्याच्या बाबतीतही थोडा संयम ठेवण्याची गरज आहे. आपली नोकरी टिकविण्यासाठी आपल्याला थोडे कष्ट तर करावेच लागतील. स्वत:ला सांभाळा.

उपाय : दत्तगुरुचे नामस्मरण करा.     

तूळ

या आठवड्यात तुम्हाला मातेचा सहवास पुरेपूर मिळणार आहे. आनंदात रहा. वाहन खरेदीचा विचार करत असाल तर अवश्य घ्या. तुम्ही घेत असलेल्या शिक्षणात तुम्हाला यश मिळण्याची शक्मयता आहे. शिक्षण पूर्ण होईल. नवीन घर बांधणे अगर जमीन घेणे या संदर्भात विचार तुमच्या मनात येण्याची शक्मयता आहे. कदाचित त्या भूमीतून तुम्हाला लाभ होण्याची पण शक्मयता आहे.

उपाय : महालक्ष्मीची आराधना करा.

वृश्चिक

मुलांच्याकडे लक्ष द्यावे लागेल असे दिसते. त्यांच्या अभ्यासाकडे, त्या बरोबरीने त्यांच्या उन्नतीकडे आणि सर्वात महत्त्वाचे त्यांच्या प्रकृतीकडे लक्ष द्यावे लागेल. पावसापाण्याचे दिवस आहेत. सगळ्याच बाबतीत सावधगिरी घेण्याची अत्यंत आवश्यकता आहे. हा आठवडा तुम्हाला सांभाळून राहण्यास सांगत आहे. सांभाळा, पण काळजी करू नका. गुऊ सर्व काही तारून नेईल हा विश्वास मनामध्ये असू द्या.

उपाय : हनुमान चालीसाचा नियमित पाठ करा.

धनु

हा आठवडा तब्येतीला सांभाळून राहण्यास सांगत आहे. कष्ट जास्त करावे लागतील. नोकर-चाकरापासून सांभाळून रहा. म्हणजे ते आपल्याला साथ देतील पण संपूर्णपणे त्यांच्यावरच विसंबून राहू नका. ‘मन चिंती ते वैरी न चिंती’ या म्हणीप्रमाणे तऱ्हेतऱ्हेचे विचार मनात येतील. पण विचारानेच माणूस अर्धमेला होतो हे लक्षात ठेवा आणि शांत रहा. सर्व काही व्यवस्थित होईल.

उपाय : अपंगाना मदत करा.

मकर

जोडीदाराबरोबर खटके उडण्याचा संभव आहे. ज्या गोष्टीमुळे मतभेद होऊ शकतात अशा गोष्टी शक्मयतो टाळण्याचा प्रयत्न करा. व्यवसायात असाल तर भागीदाराशी पंगा शक्मयतो घेऊ नका. वादावादी टाळण्याचा प्रयत्न करा. व्यवसाय इतक्मयात वाढवायला जाऊ नका. कदाचित सध्या त्यात फायदा होणार नाही. आहे तसाच चालू ठेवा. शांत राहून जैसे थे रहा.

उपाय : रोज कपाळाला केशरी गंध लावूनच बाहेर पडा.

कुंभ

लॉटरीसारख्या इतर मार्गाने पैसा मिळण्याची शक्मयता आहे. पण तो पैसा योग्य मार्गाने आहे की नाही याचा विचार करून मग स्वीकारा. अन्यथा पस्तावायची पाळी येईल. स्त्राrकडून धनलाभ संभवतो. पण त्याचाही या बाबतीत असाच पूर्ण विचार करून स्वीकारा. वाहने जपून व काळजीपूर्वक चालवा. रहदारीचे नियम काटेकोरपणे पाळा.

उपाय : दर शनिवारी शनिच्या देवळात जाऊन तेल वाहा.

मीन

धर्माचरण करण्याची इच्छा होण्याची शक्मयता आहे. मग विचार करू नका. धर्म, जप, तप, दान हे सर्व करून पुण्य कमवा, असे हा आठवडा तुम्हाला सांगत आहे. तीर्थयात्रेची संधी येण्याची शक्मयता आहे. संधीचा फायदा घ्या. आणि तीर्थयात्रेला जाऊन या. कारण तिथे आपल्याला सत्संग घडून गुऊपदेशही मिळण्याची शक्मयता आहे. आणि नक्कीच यातून काहीतरी चांगलेच घडण्याची शक्मयता आहे.

उपाय : दर सोमवारी महादेवाच्या देवळात जाऊन दर्शन घ्या.

Advertisement
Tags :

.