For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य

06:15 AM Aug 28, 2024 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य
Advertisement

तेरे नाम ......!

Advertisement

बुधवार दि. 28 ऑगस्ट ते मंगळवार दि. 3 सप्टेंबर 2024 पर्यंत

आता सनातन धर्मात नावाबद्दल काय सांगितले आहे ते पाहू : धर्मशास्त्रात नवजात शिशूचे नाव ठेवण्याचे 4 प्रकार सांगितले आहेत. देवता, मास, नक्षत्र आणि व्यवहार यासंबंधी असे हे 4 प्रकार आहेत. त्यांची माहिती पुढे दिली आहे. 1 अ) देवतेसंबंधी नाव, 1 आ) मासासंबंधी नाव : ज्या चांद्रमासात (मराठी मासात) शिशूचा जन्म होतो, त्या मासाशी संबंधित नाव ठेवले जाते. 1) नक्षत्रासंबंधी नाव : उदा. कृत्तिकावरून कार्तिक, रोहिणीवरून रौहिण इत्यादी. कन्येचे नक्षत्रनाम ठेवताना नक्षत्राचे जसे नाव आहे तसेच ठेवतात. उदा. कृत्तिका, रोहिणी इत्यादी. 2) नक्षत्राच्या चरणाक्षरावरून नाव ठेवणे : प्रत्येक नक्षत्राचे 4 पाद म्हणजे 4 चरण आहेत. नक्षत्राच्या प्रत्येक चरणाला विशिष्ट अक्षर दिलेले आहे, उदा. अश्विनी नक्षत्राच्या 4 चरणांना अनुक्रमे ‘चू, चे, चो, ला’ ही अक्षरे आहेत. बाळाचा जन्म नक्षत्रातील ज्या चरणात झाला असेल, त्या चरणाच्या अक्षरावरून नक्षत्रनाम ठेवले जाते. उदा. अश्विनी नक्षत्राच्या प्रथम चरणावर जन्म असल्यास ‘चू’ अक्षरावरून ‘चूडेश्वर’ इत्यादी नाव ठेवले जाते. 1 ई) व्यवहारासंबंधी नाव : हे नाव व्यवहारात वापरण्यासाठी ठेवले जाते. यासंबंधी शास्त्राने पुढील नियम सांगितले आहेत, ‘व्यावहारिक नावात कवर्ग, चवर्ग, टवर्ग, तवर्ग आणि पवर्ग यांच्यातील तिसरा, चौथा अन् पाचवा वर्ण (ग, घ, ङ, ज, झ, ञ, ड, ढ, ण, द, ध, न, ब, भ, म) आणि ‘ह’ यापैकी कोणताही वर्ण नावाच्या आरंभी असावा. नावाच्या मध्यभागी अंतस्थ वर्ण (य, र, ल किंवा व) असावा. पुत्राच्या नावातील अक्षरांची संख्या सम (2, 4 इत्यादी) असावी आणि नाव अकारान्त असावे, उदा. जय, नीलकंठ, देवव्रत, भालचंद्र, गिरीधर इत्यादी. कन्येच्या नावातील अक्षरांची संख्या विषम (3, 5 इत्यादी) असावी आणि नाव आकारान्त किंवा ईकारान्त असावे, उदा. गायत्री, नलिनी, जान्हवी, देवश्री इत्यादी. (संदर्भ : ‘धर्मसिंधु’) 1 ई 1) व्यवहारासंबंधी नाव ठेवण्यासाठी सांगितलेल्या नियमांमागील शास्त्र : ‘कवर्ग, चवर्ग, टवर्ग, तवर्ग आणि पवर्ग यांच्यातील पहिला अन् दुसरा वर्ण (क, ख, च, छ, ट, ठ, त, थ, प, फ) हे पृथ्वी तसेच आप तत्त्वप्रधान असल्याने तमोगुणी आहेत. त्यामुळे हे वर्ण नावाच्या आरंभी असू नयेत. पुत्राचे नाव सम आणि कन्येचे नाव विषम अक्षरसंख्येचे असावे, कारण सम संख्या शिवप्रधान आणि विषम संख्या शक्तीप्रधान आहे. 2) नाव अर्थपूर्ण आणि सात्त्विक असावे. आधीच्या चर्चेत रमणीचे निरीक्षण करा ज्यात RAश् आहे. हा आवाज बकरीचे प्रतिनिधित्व करतो. ही व्यक्ती स्वभावाने हट्टी आणि स्वार्थी असेल. अशी व्यक्ती आपले निर्णय बदलणार नाही. इतर उदाहरणांची नावे रमेश आणि रामराव आहेत. माला, मालती, कमला, विमला, निर्मला इत्यादी नावांमध्ये ध्वनी पुरुष असतो आणि म्हणून ते पुरुषाप्रमाणे वागत असतात. ते त्यांच्या पतींवर वर्चस्व गाजवण्याचा प्रयत्न करतात आणि अशा प्रकारे त्यांचे वैवाहिक जीवन खराब करतात. सुरेश, महेश, उमेश ही सर्व नावे ‘श’ या आवाजाने संपतात ज्याचा अर्थ शांतता आहे. त्यांना सामान्यत:आरोग्याच्या समस्या असतील आणि त्यांच्या आयुष्याच्या शेवटी ते एकाकी आणि शांत होतील. वृद्धापकाळात त्यांना अडचणींचा सामना करावा लागेल. त्यामुळे त्यांनी त्यांच्या गुंतवणुकीचे योग्य नियोजन करावे. काही नावांमध्ये आपण दद (दुहेरी द) दोन शून्य दर्शवितो. उदाहरणार्थ, पौर्णिमा, भूमिका, भूपथी अशी नावे सुरुवातीला यशस्वी वाटत असली तरीही अपयश दर्शवतात. त्याचप्रमाणे, जेव्हा आपण अब्राहम लिंकन या नावाचे परीक्षण करतो तेव्हा त्यात हम आणि लिंक (लिंक) हे शब्द आहेत. लिंक हा शब्द अमेरिकेतील विविध प्रदेशांना जोडणारा आणि सर्व राज्यांचे ऐक्य मिळवून देणारा आहे. हम हा शब्द त्यागाचे प्रतीक आहे. अमेरिकेच्या कल्याणासाठी त्यांनी आपल्या प्राणांची आहुती दिली. हा शब्ददेखील त्याच्या हत्येला सूचित करतो. जेव्हा आपण एडोल्फ हिटलर या नावाचे विश्लेषण करतो तेव्हा आपण हिट हा शब्द पाहू शकतो, जो इतरांविरुद्ध युद्ध करण्यात त्याची आवड दर्शवतो. युनिव्हर्स हा शब्द डीकोड करू. युनि (एक) आणि श्लोक (ध्वनी) हे शब्द दर्शवतात की संपूर्ण विश्वाची उत्पत्ती एकाच पवित्र ध्वनीतून झाली आहे. हा वेदात उल्लेखिलेला ओम नाद आहे. शेवटचा शब्द प्रोनोलॉजीनुसार तुमच्या नावात वाईट कंपने असतील तर अंकशास्त्रज्ञाची मदत घ्या आणि अंकशास्त्रानुसार तुमचे नाव दुरुस्त करा. अंकशास्त्रज्ञ तुमच्या नावातील चांगली अक्षरे जोडतील किंवा वाईट अक्षरे काढून टाकतील आणि सकारात्मक कंपनांनी भरतील. जेव्हा तुमच्या नावावर सर्वोत्कृष्ट क्रमांक लावले जातात, तेव्हा ध्वनीद्वारे दर्शविलेले त्रास लक्षणीयरीत्या कमी होतील आणि तुमच्या यशाची शक्यता वाढेल. त्यामुळे, तुमच्या नावातील प्रोनॉलॉजी चांगली नसली तरीही अंकशास्त्र तुम्हाला यशाकडे नेईल.

Advertisement

मेष

आठवडा दगदगीचा असणार आहे. त्यामुळे मानसिक आणि शारीरिक तयारी ठेवावी. धार्मिक कार्यक्रमांमध्ये भाग घेण्याची संधी मिळेल. भावा-बहिणीमध्ये छोट्याशा कारणावरून भांडणाची वेळ येऊ शकते. वैवाहिक आयुष्यात चढ-उतार राहील. विद्यार्थ्यांनी कसून मेहनत घेण्याची आवश्यकता आहे. तब्येतीकडे दुर्लक्ष करू नका.

उपाय : मुक्या प्राण्यांची सेवा करावी.

वृषभ

भावनांवर नियंत्रण ठेवले तर बऱ्याच गोष्टी सोप्या होतील. व्यापारी वर्गाला बऱ्याच संधी प्राप्त होण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गाने वरिष्ठांच्या मर्जीने काम करावे. तब्येतीच्या बाबतीत बेपर्वा राहू नका. संततीकडून शुभ समाचार प्राप्त होईल. जे सिंगल आहेत त्यांना नवीन नात्याबद्दल आशा करायला हरकत नाही.

उपाय : तेल दान द्यावे.

मिथुन

मनातल्या इच्छा पूर्ण होतील. मित्रांसोबत पिकनिक प्लॅन करू शकता. कामाच्या ठिकाणी इतर लोकांचे सहकार्य प्राप्त झाल्याने बरीचशी कामे पूर्ण होतील. कुटुंबातील व्यक्तींचे सहकार्य प्राप्त होईल. या आठवड्यात रिस्क असलेले कुठलेही काम हाती घेऊ नका नुकसान होण्याची शक्यता आहे. प्रेम संबंध दृढ होतील.

उपाय : हळदीचा टिळा लावावा.

कर्क

काळ उत्तम आहे. मित्र-मैत्रिणींसोबत किंवा कुटुंबीयांसोबत आनंदाचे क्षण उपभोगाल. नवीन कपडे किंवा दागिन्यांची खरेदी कराल. विद्यार्थ्यांचा आत्मविश्वास वाढेल. धर्माने अध्यात्माकडे ऊची वाढेल. एखाद्या तीर्थयात्रेला जाण्याचा विचार कराल. मंगल कार्यात भाग घेऊ शकता.

उपाय : दिव्यांग व्यक्तीला विनयपूर्वक अन्नदान करा.

सिंह

उत्तम फलदायी असा आठवडा असणार आहे. आरोग्याच्या दृष्टीने अनुकूल फळ आहे. जुने रोग किंवा जुनी दुखणी बरी होतील. मानसिक ताकत वाढल्याने अनेक निर्णय योग्य पद्धतीने घ्याल. पैतृक संपत्तीचा लाभ होण्याची शक्यता आहे. घरात सुख समृद्धी येईल. नात्यांमध्ये गोडवा कायम असेल. कामानिमित्त प्रवास होऊ शकतो. वैवाहिक जीवनामध्ये थोडी कटुता येण्याची शक्यता आहे.

उपाय : सात प्रकारची धान्ये दान द्यावीत.

कन्या

बरीच कामे पूर्ण होतील पण अपेक्षित रिझल्ट मिळतीलच असे नाही. आर्थिक दृष्टीने सुद्धा आठवडा सर्वसाधारण असेल. पुढे येणाऱ्या चांगल्या काळासाठी तयारी आत्ताच केलेली बरी. विद्यार्थ्यांसाठी अनुकूल काळ आहे. स्पर्धा परीक्षांमध्ये यश प्राप्त होईल. तब्येतीच्या दृष्टीने काळजी करावी असे काही नाही. वैवाहिक जोडीदाराबरोबर बोलत असताना शब्दांचा योग्य वापर करावा.

उपाय : धार्मिक स्थळी अत्तराचे दान द्यावे.

तूळ 

या आठवड्यामध्ये तुम्ही मंगल कार्यात गुंतलेले असणार. मन प्रसन्न असेल. टेक्नॉलॉजीशी निगडित असलेल्या लोकांना अनेक संधी प्राप्त होतील. व्यापारी वर्गाला मानसन्मानाची प्राप्ती होईल. कुटुंबासोबत छोट्या पिकनिकला जाऊ शकता. कामानिमित्त केलेल्या प्रवासामध्ये फायदा होईल. वैवाहिक जीवनातला आनंद कायम राखण्यासाठी तडजोड करावी लागेल.

उपाय : तुळशीची पाच पाने जवळ ठेवावी.

वृश्चिक

घरी पाहुण्यांचे आणि मित्रांचे आवागमन जास्त असेल. आरोग्याच्या दृष्टीनेदेखील हा आठवडा चांगला आहे. जुने एखादे दुखणे बरे होईल. वैवाहिक जीवनात सर्वसामान्य घटना घडतील. विद्यार्थ्यांनीदेखील चांगली मेहनत घेतली तर सुयश प्राप्त होईल. व्यापारी वर्गाला हा आठवडा मध्यम फलदायी असेल. प्रेमसंबंधात मधुरता येईल.

उपाय : अंघोळीच्या पाण्यात चिमूटभर मीठ घालावे.

धनु

अपेक्षा नसताना काही कामे पूर्ण होतील तर जी कामे नक्की होणार असे वाटते त्यामध्ये अडथळे येतील. शारीरिक व्याधी दूर होण्याच्या मार्गावर असतील. मानसिक समाधान प्राप्त होईल. नोकरदार वर्गाला कामामध्ये थोड्या अडचणींचा सामना करावा लागू शकतो. व्यापारी वर्गाला मध्यम स्वऊपाचा काळ आहे. प्रेम संबंधांमध्ये मात्र कटूता येण्याची शक्यता आहे.

उपाय : गरजूला वस्त्र दान करा.

मकर

नवीन प्रोजेक्ट किंवा नवीन व्यवसाय सुरू करण्याकरता अनुकूल काळ आहे. मनोरंजनाच्या उद्देशाने यात्रा करू शकाल. कामाच्या ठिकाणी इतर लोकांचे सहकार्य प्राप्त होईल. संततीकडून शुभ समाचार प्राप्त होण्याची शक्यता आहे. नोकरदार वर्गाला अडलेली कामे पूर्ण होत आहेत, असा अनुभव येईल. घरी धार्मिक कार्य घडू शकते.

उपाय : मोहरीच्या तेलाचे दान द्यावे.

कुंभ

या काळात कोणतेही महत्त्वाचे निर्णय घेण्यापासून दूर रहा. विशेषत: रागावर  नियंत्रण ठेवावे लागेल. काही कामे न झाल्याने चिडचिड होऊ शकते. आरोग्याच्या दृष्टीने हा काळ चांगला आहे. आर्थिक गुंतवणूक करताना सावध राहण्याची गरज आहे, नाहीतर नुकसान होऊ शकते. नोकरदार वर्गाला अनुकूल काळ आहे. दांपत्यजीवन चांगले असेल. एन्जॉयमेंटकरता यात्रा कराल.

उपाय : पक्ष्यांना दाणे घाला.

मीन

आत्मविश्वासात वाढ झाल्याने निर्णय घेण्यामध्ये अचूकता येईल. ज्यांना थोडेफार अपयश येईल असे वाटते त्यांना हार न मानण्याची आणि प्रयत्न करण्याची गरज आहे. पारिवारिक सुख समृद्धीमध्ये वाढ होईल. आर्थिक यश प्राप्त करण्याकरता विशेष प्रयत्न करण्याची गरज आहे. नोकरदार वर्गाला कामानिमित्त प्रवास करावा लागू शकतो.

उपाय : चंदनाचा टिळा लावावा.

Advertisement
Tags :

.