खजाना राशिभविष्य
बुधवार दि. 3 ते 9 डिसेंबर 2025 पर्यंत
मेष
स्वतंत्र व्यवसायात असाल तर या आठवड्यात चांगली प्राप्ती होईल, असे दिसते. व्यवसायात भागीदार असेल तर त्याचे चांगले सहकार्य लाभेल. आपल्या बुद्धीचा यथायोग्य उपयोग आपण करून घ्याल आणि आपला व्यवसाय वाढवू शकाल, अशी दाट शक्यता आहे. अधूनमधून जोडीदाराचा सल्लादेखील उपयोगी पडेल.
उपाय : शनिवारी शनिच्या देवळात काळे तीळ व उडीद दान करा.
वृषभ
अचानक धनलाभाची शक्यता आहे. कदाचित पैतृक संपत्तीच्या बाबतीत काही विचारविनिमय चालू असेल तर तिथूनही पैसा मिळण्याचा संभव आहे. पण सांभाळून. मुद्दाम त्या संदर्भात धडपड करण्यास जाऊ नका. वादावादीची शक्यता नाकारता येत नाही. सामंजस्याने प्रश्न सुटतात.
उपाय : शुक्रवारी तिन्ही सांजेला लक्ष्मीपूजन करा.
मिथुन
या आठवड्यात आपल्या वडिलांकडून काही लाभ होण्याची शक्यता आहे. काही धर्मकार्य करावे असे मनात येत असेल, तर ताबडतोब ते कृतीत आणा. त्यातून आपल्याला फायदाच होण्याचा संभव आहे. दूरचा प्रवास अगर तीर्थयात्रा घडण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे सत्संगही संभवतो.
उपाय : दत्तगुरुंचे नामस्मरण करा.
कर्क
नोकरीत असाल तर पदोन्नती आणि स्वतंत्र व्यवसायात असाल, तर प्रगती होण्याची दाट शक्यता आहे. समाजात तुमचा मान उंचावण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक वेगळीच जबाबदारी तुमच्यावर पडण्याचा संभव आहे. वडिलांचा आशीर्वाद मिळविण्याचा प्रयत्न करा.
उपाय : ॐ नम: शिवाय हा जप रोज करा.
सिंह
एखाद्या समारंभात सहभागी होण्याचा संभव आहे. भावंडांचा सहवास लाभेल. मान सन्मान मिळण्याचा, मित्र परिवाराच्या भेटीगाठी होण्याचा देखील संभव आहे. भेटवस्तुंची देवाण-घेवाण होण्याची शक्यता आहे. एकूण काय तर या आठवड्यात तुम्हाला सर्व लाभ मिळण्याची शक्यता आहे. आनंदी रहा.
उपाय : उगवत्या सूर्याला नमस्कार करा.
कन्या
खर्चावर नियंत्रण ठेवणे अत्यंत गरजेचे आहे. या आठवड्यात आपला पैसा अनाठायी खर्च होण्याची शक्यता आहे. त्यामुळे एक रुपया जरी खर्च करावयाचा असेल तर दहावेळा विचार करा. योग्य ठिकाणी खर्च करा. वाहन जपून व रहदारीचे नियम पाळून चालवा. निष्कारण अडकले जाण्याचा संभव आहे.
उपाय : शनिवारी शनिला तेल वाहा.
तूळ
मन थोडेसे अस्थिर होण्याची शक्यता आहे. शांततेने व संयमाने रहा. जोडीदाराचे चांगले सहकार्य मिळेल. काही स्वतंत्र व्यवसाय सुरू करावा, असे विचार करत असाल तर अवश्य सुरू करा. पण शांत व स्थिर मन ठेवून व्यवसायाचा व्यवस्थित आराखडा तयार करा आणि मगच कृतीत आणा.
उपाय : महादेवाची आराधना करा.
वृश्चिक
आपल्या कुटुंबात या आठवड्यात तुमचा वेळ छान जाण्याची शक्यता आहे. तुमच्या बोलण्याने आणि वागण्याने कुटुंबावर छाप पडेल. पैतृक संपत्तीचा काही भाग मिळण्याचा संभव आहे. पण आपले बोलणे, वागणे घरच्यांना आवडते म्हणून काही वेळा बोलण्यात रुक्षता येण्याचा संभव आहे, सांभाळा.
उपाय : हनुमान चालिसाचा पाठ करा.
धनु
या आठवड्यात लहान भावंडाबरोबर तुमचा वेळ खूप छान जाणार असे दिसते. छोटे प्रवास होण्याची शक्यता आहे. या आठवड्यात तुम्ही जे काम हाती घ्याल ते अतिशय सुंदर आणि छान होण्याचा संभव आहे. त्यामुळे तुमच्या कामाचे कौतुक होईल. खूश रहा, आनंदी रहा.
उपाय : कपाळी केशराचा टिळा लावा.
मकर
घर किंवा वाहन घेण्याच्या विचारात असाल, तर या आठवड्यात त्या दृष्टीने पावले उचलण्याची शक्यता आहे. कुठली तरी विद्या मिळविण्याच्या प्रयत्नात असाल, तर ती सुद्धा मिळण्याची शक्यता आहे. विद्यार्थ्यांना परीक्षेत यश नक्की मिळेल आणि या सर्व कामी मातेचे आशीर्वाद मिळतील.
उपाय : मुक्या जनावरांना खाऊ घाला.
कुंभ
मुलांच्या अभ्यासाकडे लक्ष देण्याची गरज आहे. आजकाल मुलांनाच नाही, तर मोठ्यांनादेखील अनेक प्रलोभनापासून स्वत:ला दूर ठेवण्याची गरज आहे. यापासून दूर रहा. प्रामाणिक प्रयत्नाने आणि आपल्या वाणीवर संयम ठेवल्याने बरीच कामे होतात. सांभाळा. कुणाशी पंगा घेऊ नका.
उपाय : पक्ष्यांना चारापाणी द्या.
मीन
नोकरांचे सहकार्य मिळेल. पण त्यांच्यावर पूर्णपणे विसंबून राहू नका. काही गोष्टीत फसले जाण्याचा संभव आहे. कर्ज मिळण्याच्या प्रयत्नात असाल तर निराश होऊ नका. पण थोड्या उशिराने मिळेल. नोकरीच्या ठिकाणी कामाचा ताण वाढण्याची शक्यता आहे. शांत राहण्याचा प्रयत्न करा.
उपाय : रोज दशरथकृत शनिस्तोत्र वाचा.