खजाना राशिभविष्य
मेष
या आठवड्यात तुमच्यावर लक्ष्मी प्रसन्न होणार आणि दिवाळीचे लक्ष्मीपूजन फलप्रद होणार असे दिसते. सरकारी नोकरीत असाल तर पगारवाढीची व स्वतंत्र व्यवसायात असाल दैनंदिन प्राप्ती वाढण्याची शक्यता आहे. जोडीदाराचा सल्ला घेत चला, फायद्याचे ठरेल. कदाचित परदेशातून फायदा होण्याची शक्यता आहे.
उपाय : लक्ष्मीची आराधना करा.
वृषभ
अचानक धनलाभाची शक्यता आहे. पण अति लोभापायी गैरमार्गाचा अवलंब नको. वादावादी होण्याची शक्यता दिसते. म्हणून बुद्धी-युक्तीचा वापर करावा. अन्यथा अंगलट येण्याची शक्यता आहे. नशिबाने जे मिळणार आहे ते मिळतेच, त्यासाठी जास्तीचा आटापिटा नको. तब्येतीला सांभाळा. झेपेल तेवढेच काम करा.
उपाय : शंकराची आराधना करा.
मिथुन
दूरचा प्रवास किंवा तीर्थयात्रा घडण्याची शक्यता आहे. कदाचित आपल्या आईवडिलांना तुम्ही तीर्थयात्रा घडवाल. या आठवड्यात आपण आईवडिलांच्या सेवेत रमून जाल. तुमच्या हातून काही धर्म कार्य घडण्याची शक्यता आहे. संतांच्या भेटीगाठी होतील. एकूण हा आठवडा आपल्याला उत्तम जाईल.
उपाय : गुरुची आराधना करा.
कर्क
नोकरीत पदोन्नतीची शक्यता आहे. वडिलांचे आशीर्वाद, त्यांचे पाठबळ व्यवस्थित आणि लाभदायी मिळेल. मानसन्मान व प्रतिष्ठा लाभेल. आईचीही उत्तम साथ मिळेल. समाजात एक उत्तम दर्जाचे स्थान मिळण्याची शक्यता आहे. आपल्या सुप्त कलागुणांना वाव मिळण्याची शक्यता आहे.
उपाय: दर सोमवारी शंकराला बेल वाहा.
सिंह
या आठवड्यात आपल्या मित्र परिवारासोबत वेळ छान घालवाल. तुम्ही सभा समारंभात, कार्यात सहभागी होण्याची शक्यता आहे. हा आठवडा तुमचा छान जाईल. सर्व तऱ्हेचे लाभ आणि आनंद या आठवड्यात आपल्याला मिळण्याची शक्यता आहे. मस्त मजा करा पण तब्येतीकडेही लक्ष द्या.
उपाय:नित्यनेमाने हनुमान चालिसा वाचा.
कन्या
खर्चावर नियंत्रण ठेवण्याची नितांत गरज आहे. फालतू खर्च करू नका. वाहन चालवताना जपून चालवा. हे करताना आपली सगळी कागदपत्रे आपल्याबरोबर आहेत की नाहीत याची खात्री करून घ्या. या आठवड्यात आपले मन आध्यात्मिकतेकडे झुकण्याची शक्यता आहे.
उपाय: दररोज तुळशीला पाणी घाला.
तुळ
काही किरकोळ कारणावरून सुद्धा मन हळवे होत जाईल. घाबरु नका. मन खंबीर ठेवण्याचा प्रयत्न करा. कदाचित मन भरकटत जाण्याची शक्यता सुद्धा आहे. पण आपली बुद्धी स्थिर ठेवण्याचा प्रयत्न करा. ‘प्रयत्नांति परमेश्वर’ हे ब्रीद लक्षात ठेवा आणि पुढे चला.
उपाय: रोजच्या आंघोळीच्या पाण्यात एक चमचा गंगाजल मिसळा.
वृश्चिक
कौटुंबिक कार्यात, सोहळ्यात आपला वेळ या आठवड्यात छान जाईल. आपल्या कुटुंबातील व्यक्तिंचा आपल्याला प्रेमळ सहवास लाभण्याची शक्यता आहे. पैत्रुक संपत्तीबाबत काही बोलणी चालली असल्यास शांततेने चर्चा करा व आपल्या वाणीवर संयम ठेवा.
उपाय: मंदिरात जाऊन मारुतीचे दर्शन घ्या.
धनु
आपण केलेल्या कष्टाचे चीज होईल. नोकरीत आपल्या कामाचे खूपच कौतुक होईल. छोट्या बहीण भावांच्या गाठीभेटी होतील. त्यांच्या सहवासात वेळ छान जाईल. एखाद्या छोट्या सहलीला जाल. पण प्रवासात अति जोखीम उचलायला जाऊ नका.
उपाय: सद्गुरुंची आराधना करा.
मकर
आईच्या सुखासाठी धडपड कराल. तिच्या मायेचे सुख आपल्याला या आठवड्यात पुरेपूर लाभण्याची शक्यता आहे. एखादे वाहन किंवा वास्तू खरेदी करण्याच्या विचारात असाल तर त्या दृष्टीने पावले टाकण्याची शक्यता आहे. पण घेताना पूर्ण विचारांती व्यवहार करा.
उपाय: घरातून बाहेर पडतेवेळी कपाळी केशरी टिळा लावा.
कुंभ
विद्यार्थी वर्गाला अभ्यास खूप करावा लागणार आहे. कुठल्याही लोभाला बळी न पडता आपल्या अभ्यासाकडे मन पेंद्रीत करा. नोकरीत असलेल्या मंडळींनादेखील हीच सूचना आहे. प्रलोभनाला बळी पडून स्वत:चेच नुकसान करून घेऊ नका. यश मिळेल, लाभ मिळेल, पण त्यासाठी आटापिटा नको.
उपाय: पक्ष्यांना खाऊ घाला.
मीन
आपले काम प्रामाणिकपणे करत राहा. दुसऱ्याला फसवण्याचे विचार मनात येण्याची शक्यता आहे. कदाचित तुम्ही फसविले जाण्याचीदेखील शक्यता आहे. त्यामुळे तुम्हाला स्वत:ला सांभाळावे लागेल. हाताखालील नोकर, चाकर यांच्यावरसुद्धा फार विसंबून राहू नका. सांभाळा.
उपाय: रोज दशरथकृत शनिस्तोत्र म्हणा.