खजाना राशीभविष्य
तिलोत्तमा 6
तीळ नंबर 6 :
उजव्या भुवयांच्या वरती कपाळावर तीळ नंबर एक आणि पाच यांच्या मध्यभागी तीळ असेल तर त्याच्या समान तीळ उजव्या छातीच्या ठीक खालच्या भागात असतो. असा तीळ असलेला पुऊष तीव्र, उत्तम बुद्धिमान, खूप परिश्र्रमी आणि चतुराईने धन संपादन करणारा असतो आणि आपल्या सिद्धांतानुसार शेअर मार्केटमध्ये नफा-तोटा न पाहता गुंतवणूक करणारा, बडबड्या असतो. ठीक त्याच जागी स्त्राr जातकांना असा तीळ असेल तर ती तीव्र बुद्धिमान, धनवान व दीर्घायू असते. पण लग्नानंतर अशा स्त्रियांनी स्वार्थी, चतुर, चालबाज स्त्रियांशी आणि खोट्या आरोपांपासून सावधान राहणे गरजेचे असते. अशी स्त्राr वंश परंपरागत व्याधी (genetic disorders) होण्याच्या भयाने दु:खी असेल पण तिला ती व्याधी होणार नाही. ऑक्टोबर महिना सोडला तर तिला प्रत्येक महिन्यात कुठलेही काम करताना सावधान राहिले पाहिजे. अशा जातकांवर बुध व गुऊ ग्रहांचा प्रभाव जास्त असतो.
तीळ नंबर 7 : उजव्या भुवईच्या मध्यभागी थोड्या वरच्या बाजूला व सहा नंबर तिळाच्या ठीक खाली तीळ असेल तर त्याच्यासारखा जुळा तीळ हा उजव्या बरगडीच्या ठीक खाली असतो. हा तीळ ज्या पुऊषांच्या या भागावर असतो ते व्यापारातून धन कमवतात. म्हणजे नोकरीपेक्षा व्यापार त्यांना जास्त मानवतो. त्यांच्या वयाच्या 35 व्या वर्षाच्या आसपास दूरच्या प्रवासात त्यांना अधिक धन प्राप्ती होते. वाहन दुर्घटना, विजेचा धक्का यांच्यापासून त्यांना धोका पहावयास मिळतो. अती चांगुलपणामुळे गरीब परिस्थितीला सामोरे जावे लागते. असे लोक गरज नसताना लोकोपकार करताना दिसतात. जर हा तीळ स्त्राr जातकांच्या चेहऱ्यावर असेल तर अशी स्त्राr स्वप्नात जगणारी असते. दिवसा स्वप्नांचे मनोरे बांधणे हा त्यांचा आवडता छंद असतो. ज्या पुऊषाशी यांचा संबंध येईल त्या पुऊषांवर यांचा सहज प्रभाव पडतो. अशा स्त्रियांचा विवाह प्रवास करून धन कमवणाऱ्या, थोडा घमेंडी, हाजी हाजी करणाऱ्या आणि तिच्या घरापासून दूर अशा पुऊषांबरोबर होतो पण हे एकमेकापासून लांब राहतील. तो पत्नीव्रता असेल. दोन मुले असतील. एका मुलाला लहानपणी तब्येतीचा त्रास असू शकतो. अशा स्त्राr-पुऊषांवर गुऊ व मंगळाचा प्रभाव असेल.
तीळ नंबर 8 : कपाळाच्या वरती डाव्या बाजूला तीळ नंबर तीनच्या थोड्या अंतरावर तीळ असेल तर समान तीळ उजव्या खांद्यावर असतो. असा तीळ ज्या पुऊषांच्या त्या स्थानावर असेल तर त्यांच्या जन्मावेळी दुष्ट ग्रहांच्या युतीचा योग असेल आणि त्यामुळे तो आपल्या कर्मामध्ये हीन दशा भोगत असेल आणि कदाचित एखाद्या विश्वासघातकी व्यक्तीमुळे शिक्षा भोगावी लागेल. हा योग आपल्या जवळच्या धनवान किंवा सशस्त्र कार्य करणाऱ्या नात्यातील व्यक्तीच्या मदतीने टाळता येतो. जर हा तीळ स्त्राr जातकांच्या चेहऱ्यावर त्या जागी असेल तर अशी स्त्राr विदेशात राहणारी, दोन विवाहांचा योग असणारी, खूप कष्ट भोगणारी, दुष्ट स्वभावाची व विश्वासघातकी असेल. अशा व्यक्तींच्या जीवनावर गुऊ व बुधाचा प्रभाव जास्त असतो.
तीळ नंबर 9 : कपाळाच्या मध्यभागापासून डाव्या बाजूला आठ नंबर तिळाच्या खाली आणि तीळ नंबर एकच्या डाव्या बाजूला थोड्या अंतरावर तीळ असेल तर त्यासमान तीळ डाव्या बाजूच्या खालच्या बरगडीच्या खाली असतो. असाच तीळ ज्या पुऊषांच्या या स्थानावर असतो तो पुरुष आराम पसंद, फालतू खर्च करणारा, विषय वासनासक्त, हट्टी, आपल्या इच्छापूर्तीसाठी काहीही करणारा पण समजदार व सर्वांशी मिळून मिसळून राहणारा, चाळीशीच्या जवळ फिट येणे, डोकेदुखी अशा रोगाने त्रस्त असू शकतो. स्त्रियांसाठी, आपल्याच हाताने संपत्तीचा नाश करणारी, बेधडक स्वभावाची, विषयातूर, आपल्या इच्छेने वागणारी वयाच्या तिसाव्या वर्षानंतर द्वेष भाव जास्त वाढल्यामुळे स्वभाव इतका भयानक होतो की, यांना सहन करणे जवळ जवळ अशक्मय होते. अशा व्यक्तींवर शुक्र व मंगळाचा प्रभाव जास्त असतो.
मेष
तब्येतीला सांभाळावेच लागेल. दवाखान्याला पैसे खर्च होण्याची शक्यता आहे. नोकरीत प्रगतीचे योग असून वरिष्ठांचा पाठिंबा मिळेल. व्यवसायात नवे करार होतील, पण संयम राखावा लागेल. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. कुटुंबात आनंदाचे वातावरण राहील. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. विवाहितांना जोडीदाराचे सहकार्य लाभेल. प्रवासाचे योग उत्तम.
उपाय : मंगळवारी हनुमान मंदिरात लाल फुले अर्पण करा.
वृषभ
आहे त्यात समाधान माना, जास्तीची हाव धोकादायक असेल. नोकरीत सृजनशीलतेमुळे नवे कामगिरीचे पल्ले गाठाल. व्यवसायात भागीदारांशी सहकार्य वाढेल. आर्थिक उत्पन्न वाढेल. घरात सुख-शांती राहील. प्रेमसंबंध आनंददायी राहतील. विवाहितांनी जोडीदाराबरोबर वेळ घालवावा. प्रवास आनंददायी ठरेल. आरोग्य चांगले असले तरी अपथ्य टाळा. मित्रांचा आधार मिळेल.
उपाय : शुक्रवारी लक्ष्मीला तांदळाच्या खिरीचा नैवेद्य द्या.
मिथुन
बुधाची स्थिती या आठवड्यात तुमच्यासाठी काही बदल घेऊन येईल. नोकरीत नवा प्रकल्प हाताशी येईल. व्यवसायात अचानक लाभाचे योग आहेत. आर्थिकदृष्ट्या परिस्थिती सुधारेल. घरात संवाद व समजूतदारपणा वाढेल. प्रेमसंबंधात लहान गैरसमज दूर होऊन नात्यात गोडवा वाढेल. विवाहितांना नात्यात स्थैर्य मिळेल. प्रवासातून नवे अनुभव मिळतील. आरोग्यात सुधारणा होईल.
उपाय : बुधवारी गणपतीला दुर्वा अर्पण करा.
कर्क
जास्त भावनिक होऊ नका, त्रास होईल. नोकरीत परिश्र्रम केल्यास फळ नक्कीच मिळेल. व्यवसायात काही अडथळे येतील पण धैर्याने त्यावर मात कराल. आर्थिक स्थितीत स्थैर्य राहील. कुटुंबात सौख्याचे वातावरण. प्रेमसंबंधात गोडवा वाढेल. विवाहितांनी संयम व विश्वास ठेवावा. प्रवासाच्या योजनांमध्ये अडथळे येऊ शकतात. विद्यार्थ्यांनी कष्ट वाढवावेत. आरोग्यात मानसिक थकवा जाणवू शकतो.
उपाय : सोमवारी शिवलिंगावर दूध अर्पण करा.
सिंह
नोकरीत बढती किंवा सन्मान मिळण्याचे योग आहेत. व्यवसायात प्रगती होईल. आर्थिक लाभ मिळेल. तब्येतीच्या बाबतीत बेफिकीर राहू नका. विवाहितांना नात्यात सुखद अनुभव मिळेल. प्रवास यशस्वी होईल. विद्यार्थ्यांना चांगले निकाल मिळतील. घरात नवी बातमी मिळेल. जुने प्रश्न सुटतील. आध्यात्मिक कार्यात सहभाग वाढेल. हा काळ तुम्हाला यश व समाधान देणारा आहे.
उपाय : रविवारी सूर्याला गव्हाचे दाणे अर्पण करा.
कन्या
बुधाच्या प्रभावामुळे विचारपूर्वक निर्णय घेण्याची गरज आहे. कार्यक्षेत्रात स्थैर्य राहील. आर्थिक योजनांची नीट तपासणी करा. प्रेमसंबंधात प्रामाणिक रहा. विवाहितांसाठी संयम महत्त्वाचा. पचनसंस्थेशी निगडित समस्या होऊ शकतात. विद्यार्थ्यांनी एकाग्रता वाढवावी. मित्रांचा आधार मिळेल. घरात शांततेचे वातावरण राहील. वडीलधाऱ्यांचा सल्ला उपयुक्त ठरेल.
उपाय : बुधवारी विष्णूला तुळशीपत्र अर्पण करा.
तूळ
नोकरीत चांगली संधी मिळेल. व्यवसायात प्रगतीचे योग. आर्थिक लाभ निश्चित. आरोग्य उत्तम राहील. विद्यार्थ्यांना चांगले निकाल मिळतील. प्रवास उपयुक्त. मित्रांचा आधार लाभेल. घरात आनंदी वातावरण. समाजात प्रतिष्ठा वाढेल. सौंदर्य क्षेत्रातील लोकांना यश. धार्मिक कार्यात सहभाग वाढेल. आत्मिक विकास होईल. आत्मविश्वास वाढेल.
उपाय : शुक्रवारी गरिबांना गोडधोड द्या.
वृश्चिक
ऊर्जा, आत्मविश्वास आणि धैर्य यांची वाढ होईल. नोकरी करणाऱ्यांना कामगिरीच्या आधारे वरिष्ठांकडून कौतुक मिळेल पण सोबत काम करणाऱ्यापासून सावध रहा. व्यवसायात नवे व्यवहार यशस्वी होतील. आर्थिक स्थिती सुधारेल, परंतु अनावश्यक खर्च टाळा. आरोग्यात सुधारणा होईल पण रक्तदाब व थकव्यापासून सावध रहा. कुटुंबातील मोठ्या व्यक्तींचे आशीर्वाद लाभतील.
उपाय : हनुमान मंदिरात लाल वस्त्र द्या.
धनु
नोकरीत पदोन्नती किंवा विशेष यशाची शक्मयता आहे. व्यावसायिकांना परप्रांतातून लाभ. आर्थिकदृष्ट्या नफा होईल. घरात शुभकार्य ठरेल. विवाहितांनी जोडीदारासोबत सहलीचा आनंद घ्यावा. आरोग्य नाजूक राहील, पचनसंस्थेची काळजी घ्या. मित्रांचा आधार लाभेल. समाजात प्रतिष्ठा वाढेल. परदेशात संधी मिळतील. निर्णय फायदेशीर ठरतील.
उपाय : गुरुवारी गरिबांना हरभरा डाळ द्या.
मकर
काही अडथळे जाणवतील. नोकरीत तणाव वाढेल, परंतु संयम ठेवा. व्यवसायात निर्णय घेताना विलंब होईल. आर्थिक स्थिती थोडी अस्थिर राहील, कर्ज टाळा. घरगुती वाद उद्भवू शकतात. प्रेमसंबंधात गैरसमज होऊ शकतात, संयम आवश्यक. विवाहितांनी जोडीदाराच्या मतांचा आदर करावा. आरोग्याच्या दृष्टीने सांधेदुखी व मानसिक तणाव जाणवेल.
उपाय : शनिवारी काळे उडद, तीळ व तेल दान करा.
कुंभ
शनी-गुऊची स्थिती तुमच्यासाठी स्थैर्य आणि यशाचे द्योतक आहे. नोकरीत प्रगती होईल व वरिष्ठांचे कौतुक मिळेल. व्यावसायिकांना नफा होईल, विशेषत: भागीदारीत काम करणाऱ्यांना चांगले परिणाम मिळतील. आर्थिक स्थितीत सुधारणा होईल. घरात शांतता आणि ऐक्मय वाढेल. जोडीदाराची साथ मिळेल. आरोग्य सुधारेल, विशेषत: जुन्या तक्रारीतून दिलासा मिळेल.
उपाय : शनिवारी वृद्धांना वस्त्र दान करा.
मीन
नोकरीत वाद टाळा. व्यावसायिकांसाठी लाभ होईल. जुने कर्जफेडीचे मार्ग सुकर होतील. कौटुंबिक जीवनात ऐक्मय वाढेल व घरात आनंददायी वातावरण राहील. आरोग्य ठीक असेल, मात्र पोटदुखी वा पचनाशी संबंधित समस्या त्रासदायक ठरू शकते. प्रवासाचे योग शुभ असून ते आर्थिक लाभदायी ठरतील. मित्रांकडून आधार मिळेल आणि सामाजिक जीवनात प्रतिष्ठा वाढेल.
उपाय : गुरुवारी विष्णूला पिवळी फुले अर्पण करा.