महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

राशिभविष्य

06:06 AM Aug 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तेरे नाम.....!!!!

Advertisement

बुधवार दि. 14 ते मंगळवार दि. 20 ऑगस्टपर्यंत

Advertisement

या लेखातून काय मिळेल? बाळाचे नाव कसे ठेवावे, नावाचा अर्थ किती महत्त्वाचा आहे,  आजकाल  जो टेंड चाललेला आहे,  विचित्र नाव ठेवण्याचा  त्याचे दुष्परिणाम काय होतात,   पूर्वीच्या काळात जी नावे ठेवली गेली  त्यामागे काय हेतू होता  हे तुम्हाला कळेल.   लेखाला सुऊवात करण्यापूर्वी  आपल्याकडे जी एक कन्सेप्ट आहे,  नावरस नाव  किंवा ज्याला जन्माक्षरावरून ठेवलेले नाव  असे म्हणतात  ते काय आहे  आणि ते कसे फालतू आहे हे सांगतो. बाळ जेव्हा जन्माला येते  तेव्हा  जन्मवेळेच्या अनुसार  चंद्र ज्या नक्षत्रात  असतो  आणि ज्या चरणात असतो त्या चरणाक्षराला  पहिले अक्षर मानून  बाळाचे नाव ठेवायची पद्धत आहे  आणि ही पद्धत पूर्वापार  चालत आलेली आहे. काही वेळेला अक्षर  य,टा,ठा,नि,खो यासारखे विचित्र आलेले असते  आणि मग  विचारायला आलेल्या व्यक्तीला  सो कॉल्ड  ज्योतिषी म्हणा, भटजी म्हणा, ‘यरमाई’ ‘तामदेव’  यासारखी विचित्र नावे देतो आणि हे तुझे नावरस नाव आहे असे सांगतो. या नावाचा प्रयोग कोणीतरी आपल्या व्यवहारात करेल का? मग या नावाचा उपयोग काय  तर  ज्योतिषाकडे गेल्यानंतर आपले नावरस नाव सांगायचे आणि त्यावरून तो आपले भविष्य सांगतो  अशी काहीशी समजूत  आपल्याकडे आहे.   थोडी कल्पना करा पाचशे हजार वर्षांपूर्वी कोणीतरी लढाईला जात आहे  आणि  त्यावेळी  तो ज्योतिषाला विचारतो  की या लढाईत काय होणार? मग ज्योतिषी त्याला त्याचे नाव रस नाव विचारतो,  या नावावरून त्याला त्याचे  जन्म नक्षत्र आणि चरण कळते,  यावरून  गोचरित  म्हणजे सध्याची गृह स्थिती त्याचा अंदाज घेऊन  ज्योतिषी  पुढे  पुढे काय घडणार आहे त्याचे भाकित करतो. नावरस नावाचा उपयोग इतकाच. कोणी मूर्ख या नावरस नावाच्या व्हायब्र्रेशनमुळे  जातकाचे चांगले होते  असे सांगत असेल  तर त्याच्या अज्ञानाला  सलाम ठोकायला हरकत नाही. जे नाव व्यवहारात वापरले जात नाही, ज्या नावाचा  उच्चारही होत नाही ते नाव कसे काय काम करेल? असो. हा लेख पाश्चात्य प्रोनोलोजी आणि अंकशास्त्र  भारतीय नावांवर प्रयोग केल्यास काय होते यावर आहे. जास्त खोलात जाण्यापेक्षा अनुभव काय येतात हे पहा ही विनंती. आपण उच्चारलेले शब्द महत्त्वाचे आहेत कारण त्यात ध्वनी ऊर्जा असते. आपण इतरांना त्यांच्या नावाने हाक मारतो आणि नावांनाही आवाज असतो. नावामागील या ध्वनी ऊर्जेचे विश्लेषण प्रोनोलॉजीमध्ये केले जाते जेणेकरून नाव एखाद्या व्यक्तीच्या जीवनावर कसा परिणाम करत आहे. अंकशास्त्र हे नावाच्या संख्यात्मक मूल्यावर अवलंबून असते, तर प्रोनोलॉजी नावातील ध्वनी कंपनांवर अवलंबून असते. जेव्हा एखाद्या नावात वाईट स्पंदने असतात, तेव्हा त्या व्यक्तीला त्याच्या जीवनात अपयश दिसून येते. प्रोनोलॉजी आणि न्यूमेरॉलॉजीनुसार एखाद्या व्यक्तीच्या नावाचे स्पेलिंग सुधारून आपण त्या व्यक्तीला सर्वोच्च यश मिळवून देऊ शकतो. देवाने ज्योतिष, हस्तरेषा, अंकशास्त्र, वास्तू इत्यादी विविध विषय दिले आहेत जे मानवाला जीवनाच्या सर्व क्षेत्रात समृद्धी प्राप्त करण्यासाठी मार्गदर्शन करतात. जेव्हा या विषयांचा योग्य वापर केला जातो, तेव्हा कोणत्याही व्यक्तीला त्याचे भविष्य समजू शकते आणि अपयश कमी करण्यासाठी पावले उचलता येतात. प्रोनोलॉजी हा देखील अशा शक्तिशाली विषयांपैकी एक आहे जो आपल्याला आपल्या नावांचे लपलेले अर्थ समजण्यास मदत करतो. प्रोनोलॉजी हे नावातील ध्वनी कंपनांचे विश्लेषण करण्याचे शास्त्र आहे. अंकशास्त्र हे नावाच्या संख्यात्मक मूल्यावर अवलंबून असते, तर प्रोनोलॉजी नावातील ध्वनी कंपनांवर अवलंबून असते. जेव्हा आपल्याला आपल्या नावातील ध्वनींचा अर्थ कळतो तेव्हा आपल्याला आपले भाग्य काय आहे याची कल्पना येईल. जेव्हा आपल्या नावाचा ध्वनी चांगला नसतो तेव्हा आपल्या आयुष्यात वाईट परिस्थिती येण्याची शक्मयता असते. हे ज्ञान आपल्याला त्रास कमी करण्यासाठी आणि चांगले यश मिळविण्यासाठी आपले नाव सुधारण्यास देखील मदत करते. नावाचे ध्वनी जाणून घेण्यासाठी, आपण नावाचे परीक्षण केले पाहिजे आणि एका वेळी दोन किंवा तीन अक्षरांवर लक्ष केंद्रित करून नावामध्ये लपलेले ध्वनी आणि शब्द शोधून काढले पाहिजे. उदाहरणार्थ, प्रसाद ‘`PRASAD'  हे नाव घ्या आणि ते प्र, प्रा, रस, सद् (SAD)  इ. असे हळूवारपणे वाचा. या शब्दांपैकी अर्थपूर्ण शब्द म्हणजे SAD-  दु:ख. हे एकाकी व्यक्तीचे प्रतिनिधित्व करते ज्याला त्याचे सहकारी आणि मित्रांकडून सहकार्य मिळू शकत नाही. तो सहजासहजी कोणावरही विश्वास ठेवणार नाही आणि स्वत:ला किंवा त्याच्या कुटुंबातील एखाद्या सदस्याला आरोग्याचा त्रास होईल ज्यामुळे तो दु:खी होईल. तो असेल एक आणि दाखवेल वेगळे!! इथे इंग्रजी शब्दांचा आपल्या नावामध्ये उपयोग केला गेला आहे. आहे ना  गंमत?

 

मेष:-

नोकरीत असाल तर तुमच्या कामावर खुश होऊन वरिष्ठ तुमच्या कामाची दखल घेण्याची शक्मयता आहे आणि त्याचा परिणाम म्हणून तुमची पदोन्नती होण्याचा अगर नोकरीतून काहीतरी फायदा होण्याचा संभव आहे. स्वतंत्र व्यवसायात असाल तर व्यवसायात भरभराट होण्याची शक्मयता आहे. जर आपला उद्योग वडिलार्जित परंपरेने आलेला असेल तर वडिलांच्या सल्ल्यानुसारच निर्णय घ्या.प् ाढायदा होईल.

उपाय: महालक्ष्मीची आराधना करा.

वृषभ:-

या आठवड्यात आपल्याला लाभच लाभ होण्याची शक्मयता आहे. काही सणा-समारंभाच्या निमित्ताने आपल्या काही आप्तेष्टांच्या भेटी होण्याचा संभव आहे. मित्रपरिवाराच्या भेटी होतील. काही भेट वस्तू दिल्या घेतल्या जाण्याचा संभव नाकारता येत नाही. काही दागिने/वस्त्रांची खरेदीची पण शक्मयता आहे. एकंदरीत हा आठवडा आपल्याला आनंदात जाणार असे दिसते.

उपाय: अखंड नामस्मरण करा.

मिथुन:-

खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज भासण्याची शक्मयता आहे. सणासुदीचे दिवस आहेत. अर्थात काही खर्च हा होणारच. पण अनाठायी खर्च नको याची काळजी घ्या. हा आठवडा तरी तुमचा पूजा अर्चा यातच जाणार असे वाटते. हरकत नाही. चांगलीच गोष्ट आहे. देवाच्या सान्निध्यात राहिल्याने आपल्याला एक प्रकारचे समाधान मिळेल आणि दिवस छान जाईल. आनंदात रहा.

उपाय: महादेवाची आराधना करा.

कर्क:-

मन चंचल होण्याचा संभव आहे. मनाला ताब्यात ठेवा. एवढ्या तेवढ्या गोष्टीसाठी चिडचिड कऊ नका. वेळच्या वेळी सगळे होत असते. आपण चिडचिड करून कोणतीही गोष्ट वेळेच्या आधीही होत नाही आणि त्या वेळेनंतरही होत नाही. जोडीदाराचे सहकार्य चांगले मिळेल. पण त्यांना तुम्ही समजून घेण्याची गरज आहे. सांभाळून राहण्यास हा आठवडा तुम्हाला सांगत आहे.

उपाय: रामनामाचा जप करा.

सिंह:-

हा आठवडा आपल्या कुटुंब परिवारासोबत छान जाण्याची शक्मयता आहे. आपल्या परिवारातील व्यक्तींवर आपल्या वागणुकीची छाप पडेल असे दिसते. सर्वाना छान समजुतीने घ्या, त्यांच्याबरोबर प्रेमाने वागा. वडिलोपार्जित संपत्तीसाठी काही चर्चा चालू असल्यास थोडे स्थितप्रज्ञ राहिलेलेच बरे. या आठवड्यात शक्यतो  देण्या-घेण्याचे व्यवहार करण्यास जाऊ नका. फायद्याची शक्मयता कमी वाटते.

उपाय: अन्नदान करा.

कन्या:-

या आठवड्यात आपल्याला आपल्या आप्त-परिवाराच्या गाठीभेटी होण्याची शक्मयता आहे. त्यांच्याबरोबर छोटासा प्रवासही घडण्याचा संभव आहे. प्रवासात मात्र नसते साहस कऊ नका. त्याचा आनंद लुटा. नोकरीत असाल तर आपल्या कामावर, कामाच्या पद्धतीवर वरिष्ठ खुश होतील. आपल्या मित्रपरिवाराच्या गाठीभेटीत हा आठवडा आनंदात जाण्याची शक्मयता आहे.

उपाय: महादेवाची उपासना करा.

तूळ:-

आपण या आठवड्यात नवीन वाहन खरेदी करण्याची शक्मयता आहे. काही नवीन शिकत असाल तर त्या विद्येत प्राविण्य मिळण्याची शक्मयता आहे.  नवीन घर बांधण्याचा विचार असेल अगर नवीन घर घेण्याचा विचार करत असाल तर अवश्य तो विचार अमलात आणण्याचा प्रयत्न करा. फायदा होण्याचा संभव आहे.

उपाय: घरातून बाहेर पडताना कपाळावर गंध लावा.

वृश्चिक:-

मुलांच्या अभ्यासाकडे थोडे लक्ष द्यावे लागण्याची शक्मयता आहे. त्यांना तुमच्या मार्गदर्शनाची गरज भासण्याची शक्मयता आहे. अचानक धनलाभ म्हणजे लॉटरी वगैरे तत्सम प्रकारातून होण्याची शक्मयता आहे. कोणत्यातरी यंत्राचा वापर अथवा उपयोग करावा लागण्याची शक्मयता आहे. तुमच्या हातून काही लिखाण होण्याचा संभव आहे. प्रयत्न करण्यास हरकत नाही.

उपाय: हनुमान चालीसाचा दररोज पाठ करा.

धनु:-

या आठवड्यात आपल्या कष्टाचे चीज झाले असे वाटण्याची शक्मयता आहे. आपण केलेल्या कामातून आपल्याला काही फायदा होण्याची शक्मयता आहे. पण घरातील मौल्यवान वस्तूचा सांभाळ करावा लागण्याची शक्मयता आहे. गुप्त शत्रु व नोकरवर्गापासून सावध राहण्याची गरज आहे. कोणतीतरी चिंता आपल्याला भेडसावीत राहील असे वाटते. पण चिंता कऊ नका. त्याने तब्येत खराब होते बाकी काही नाही.

उपाय: सद्गुऊची आराधना करा.

मकर:-

जोडीदाराचे सहकार्य मिळेल. आपण काही स्वतंत्र व्यवसायात असाल तर थोडे जास्त कष्ट करावे लागण्याची शक्मयता आहे. भागीदारीत व्यवसाय असेल तर भागीदाराशी या आठवड्यात थोडे जमवून घ्यावे लागेल. निष्कारण वादावादीत पडू नका आणि स्वत:चे नुकसान करून घेऊ नका. कोणतीतरी विसरलेली किंवा हरवलेली किंवा चोरीस गेलेली वस्तू मिळण्याची शक्मयता आहे.

उपाय: दररोज मंदिरात जाऊन देवाचे दर्शन घ्यावे.

कुंभ:-

वाहने जपून चालवा. रहदारीचे नियम पाळा असे हा आठवडा आपल्याला सांगतो आहे. एखाद्या स्त्रीकडून आपल्याला धनलाभ होण्याची शक्मयता आहे. कदाचित इतरही मार्गाने धनलाभ होईल. पण ते धन स्वीकारताना नीट विचार करा. ते धन योग्य मार्गाने आले असल्यासच त्याचा स्वीकार करा. अन्यथा पस्तावायची पाळी येईल. सांभाळा. मोहास बळी पडू नका.

उपाय: दर शनिवारी शनी मंदिरात जाऊन शनीला तेल वाहा.

मीन:-

श्रावण महिना सुऊ आहे. जप तप करण्यात वेळ घालवाल तर शांततेत व आनंदात दिवस जाण्याची शक्मयता आहे. आपले भाग्य उजळण्याची शक्मयता आहे. आपल्याला दूरचा प्रवास कदाचित तीर्थयात्रा घडण्याची शक्मयता आहे. वडील धारी मंडळींचे आशीर्वाद मिळण्याची शक्मयता आहे. सत्संगाचा लाभ होण्याची शक्मयता आहे. एकंदरीत हा आठवडा आपल्याला खूप सुखासमाधानाचा जाण्यची शक्यता आहे.

उपाय: रोज शनीचे कुठलेही एक स्तोत्र पठण करा.

Advertisement
Tags :
#astro#horoscope
Next Article