महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खजाना भविष्य

06:10 AM Sep 11, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

बुधवार दि. 11 ते मंगळवार दि. 17 सप्टेंबर 2024 पर्यंत

Advertisement

ऋणानुबंधाच्या गाठी... ..पितृऋण, पितृदोष आणि बरंच काही...

Advertisement

नमस्कार कित्येकदा असे होते की, एखाद्या व्यक्तीला आपण बघतो आणि बघता क्षणी ती व्यक्ती आपल्याला आवडायला लागते. अगोदर ओळख नाही, पाळख नाही पण असे वाटते की, आपले जन्मोजन्मीचे संबंध आहेत आणि याविऊद्ध असेही होते की, दोन सख्खी भावंडे, एकाच घरात वाढलेली, एकमेकांचे तोंडही बघण्याचे टाळतात. बाकी सगळ्यांबरोबर त्यांचे संबंध चांगले असतात. पण एकमेकांशी वैरत्व! हेच अगदी वडिलांच्या आणि मुलांच्या बाबतीतही होते. काहीही कारण नाही पण मुलाने बापाबद्दल सूड भावना बाळगल्याची अनेक उदाहरणे आहेत. हे असे का? काय कारण असावे? शास्त्र म्हणते की, आपल्या घरामध्ये जन्माला येतात त्यांचे काही ऋणानुबंध असू शकतात. पूर्वजन्मीचा वैरीदेखील पोटचा मुलगा म्हणून जन्माला येऊ शकतो! म्हणजेच या सगळ्या ऋणानुबंधाच्या गाठी आहेत!!! असो, विषयाची थोड्या वेगळ्या पद्धतीने मांडणी केली. माणसाच्या आयुष्यामध्ये कित्येक वेळेला अनेक संकटे एकदम येतात. व्यवस्थित चालत असलेली नोकरी जाते. व्यवसाय बंद पडतो. नातेवाईकांशी भांडणे होतात. संतती होण्यास विलंब होतो किंवा संतती होत नाही. अशा वेळेला जेव्हा व्यावहारिकदृष्ट्या काहीही कारण सापडत नाही तेव्हा साहजिकच माणूस ज्योतिष शास्त्राकडे वळतो. बऱ्याच वेळा, पत्रिका घेऊन गेल्यानंतर ज्योतिषी सांगतात की, तुम्हाला पितृदोष आहे. त्र्यंबकेश्वरला त्रिपिंडी आणि नारायण नागबळी करावा लागेल. अर्थात कित्येक ज्योतिषी पत्रिकेचे नीट अवलोकन न करताच तुम्हाला पितृदोष, सर्पदोष आहे. अमूक तिकडे जाऊन ही शांती करा वगैरे सांगतात तो भाग वेगळा. बरे इतके करूनसुद्धा हा पितृदोष कुंडलीतून नाहीसा होतो का? समजा संतती होत नाही आहे म्हणून एका व्यक्तीने अमुक ठिकाणी जाऊन त्रिपिंडी श्राद्ध, नारायण नागबलीसारखे विधी केले आणि नंतर त्या व्यक्तीला संतती झाली. याचा अर्थ पितृदोष गेला असे व्हायला पाहिजे आणि त्या संततीच्या कुंडलीमध्ये पितृदोष निर्माण झाला नसायला पाहिजे. पण असे होते का? कित्येक वेळेला दोन भावंडांमध्ये एकाच्या कुंडलीमध्ये पितृदोष आहे आणि दुसऱ्याच्या कुंडलीमध्ये पितृदोष नाही असे होते. दोघांचेही पितर एकच असताना असे का होते? पितृदोष आणि पितृऋण यात फरक काय आहे? किती प्रकारचे पितृदोष असतात? हा फक्त पितृ म्हणजे पित्याकडून असतो का? की आईकडून, बहिणीकडून, मामाकडून वगैरे असू शकतो? या सगळ्याबद्दल चर्चा करण्याकरता हा लेख आहे.

पक्ष पंधरवडा किंवा महाळ महिना येत आहे. आपल्या संस्कृतीमध्ये या 15 दिवसात आपल्या घरातील मृत व्यक्तींकरता श्राद्ध कर्म करण्याचा नियम आहे. सगळ्यात मोठी चूक म्हणजे इंग्रजी तारखेप्रमाणे श्राद्ध करणे. मृत पावलेली व्यक्ती हिंदू पंचांगानुसार कोणत्या तिथीला गेली आहे. त्याप्रमाणे त्या तिथीला श्राद्ध करावे. काही घरांमध्ये शिधा देण्याची पद्धत आहे, पण ही शिधा योग्य ब्राम्हणाला दक्षिणेसह श्राद्ध कर्म करून दिली पाहिजे. मागे एकदा याबद्दल मी सविस्तर लिहिले आहे. पितृदोष नाहीसा व्हावा म्हणून एक छोटासा मंत्र देत आहे तो याप्रमाणे...

ॐ श्री सर्व पितृदोष निवारण क्लेशं हन सुखं फट स्वाहा।

‘ओम श्रीम सर्व पितृदोष निवारणय क्लेशम् हन सुख शांतिम् देही फट स्वाहा’

पुढे जे स्तोत्र दिलेले आहे ते रोज एकदा दुपारी साडेबारा वाजता म्हणावे...

पितृअष्टक :-

जयांच्या कृपेने या कुळी जन्म झाला पुढे वारसा हा सदा वाढविला अशा नम्र स्मरतो त्या पितरांना...

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ।। 1 ।।

इथे मान सन्मान सारा मिळाला पुढे मार्ग तो सदा दाखविला कृपा हीच सारी केली त्यांना...

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ।। 2 ।।

मिळो सद्गती मज पितरांना विनंती हीच माझी त्रिदेवतांना कृती कर्म माझ्या मिळो मोक्ष त्यांना...

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ।। 3 ।।

जोडून कर हे विनंती त्यांना अग्नि, वरूण, वायू आदी देवतांना सदा साह्य देवोनी उद्धरी पितरांना...

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ।। 4 ।।

वसुरूद्रदित्य स्वरूप पितरांना सप्तगोत्रे एकोत्तरशतादी कुलांना मुक्तीमार्ग द्यावा उद्धरून त्यांना...

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ।। 5 ।।

करूनी सिद्धता भोजनाची त्यांना पक्वान्ने आवडीनें बनवून नाना सदा तृप्ती होवो जोडी करांना...

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ।। 6 ।।

मनोभावे पुजूनी तिला, यवाने विप्रास देऊन दक्षिणा त्वरेने आशिष द्याहो आम्हा सकलांना...

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ।। 7 ।।

सदा स्मृती राहो आपुलीच आम्हा न्यून काही राहाता माफी कराना गोड मानुनी घ्यावे सेवा व्रतांना...

नमस्कार साष्टांग त्या पूर्वजांना ।। 8 ।।

मेष

स्वतंत्र उद्योगात असाल तर प्रगती संभवते. भरभराट होण्याची शक्मयता आहे. हा तुमचा उद्योग जर वडिलोपार्जित असेल तर वडिलांच्या सल्ल्याने उद्योगातील निर्णय घेतलेत तर आणखी जास्त फायदा होण्याचा संभव आहे. नोकरीत असाल तर आपल्या कामावर वरिष्ठ खूश होऊन आपली पदोन्नती होण्याची शक्मयता आहे. मानमरातब मिळेल. वडिलांचे आशीर्वाद, मार्गदर्शन मिळेल.

उपाय : महालक्ष्मीची आराधना करा.

वृषभ

‘पांचो उंगलिया घी में’ अशी काहीशी अवस्था होण्याची शक्मयता आहे. नातेवाईक, मित्रपरिवार यांच्या सहवासात आपला हा आठवडा कसा जाईल हे तुमचे तुम्हालाच कळणार नाही. चांगल्या उंची वस्तूंची खरेदी होईल अथवा भेटीदाखल आपल्याला मिळण्याची शक्मयता आहे. काही समारंभ होतील. समाजात एक प्रकारचा मान सन्मान मिळेल. एकूण हा आठवडा आर्थिक व मानसिक समाधान देऊन जाईल.

उपाय: सद्गुरुची सेवा करा.

मिथुन

हात जरा आखडता घेऊन खर्च करा. रहदारीचे नियम पाळून वाहन सांभाळून चालवा. आपण कितीही शिस्तबद्ध असलो तरी आपली एक छोटीशी चूक आपल्या शत्रूच्या लगेच लक्षात येऊन तो त्याचा फायदा उठवतो. हे लक्षात ठेवून हा आठवडा काळजी घ्या. खर्चावर नियंत्रण तर ठेवाच त्याच बरोबर कुणाकडून उसने पैसे अगर कर्ज सध्या घेऊ नका. अंगाशी येण्याचा संभव आहे.

उपाय : गणपतीची आराधना करा.

कर्क

हा आठवडा आपला छान आनंदात जाण्याची शक्मयता आहे. मन प्रसन्न राहील. या आठवड्यात आपण आपल्या मनात जे ठरवाल ते करून दाखवण्याची शक्मयता आहे. आपले आरोग्यही छान असेल. आपल्या मुलांच्या प्रगतीमुळे आनंदी असाल. त्यांचे प्रवासाला जाण्याचे बेत ते करत असतील, तर खुशाल जाऊ द्या. आपण पालक म्हणून ज्या सूचना द्यायच्या त्या द्या. एकंदरीत हा आठवडा छान जाण्याची शक्मयता आहे.

उपाय : दर सोमवारी शंकराला बेल वाहा.

सिंह

या आठवड्यात आपल्याला आपल्या कुटुंबासोबत वेळ घालवता येण्याची शक्मयता आहे. पण थोडे अलिप्त राहण्याचा प्रयत्न करा, म्हणजे स्थितप्रज्ञ. तरच तुम्हाला कुटुंबासोबत राहण्याचा आनंद मिळण्याची शक्मयता आहे. तुम्हाला कोणी विचारला तरच सल्ला द्या. आपल्या बोलण्याने कुणाला फारसा फरक पडण्याची शक्मयता कमी आहे. वाणीवर संयम ठेवा. वडिलोपार्जित इस्टेटीचा या आठवड्यात तरी विचार करू नका.

उपाय : दररोज मारुतीचे कुठलेही स्तोत्र म्हणा.

कन्या

आपल्या कष्टाचे फळ या आठवड्यात मिळण्याची शक्यता आहे. काही कामाच्या निमित्ताने अगर इतर कोणत्याही कारणामुळे भावंडांच्या, मित्रपरिवाराच्या गाठीभेटी होण्याची शक्यता आहे. कदाचित त्यांच्याबरोबर छोट्याशा सहलीचेदेखील आयोजन होईल. इच्छा तृप्तीचे खाणे मिळण्याची पण शक्यता आहे. एकंदरीत हा आठवडा आपल्या परिवारात आनंदात जाण्याचा संभव आहे.

उपाय : सरस्वतीची आराधना करा.

तूळ

या आठवड्यात आपली इच्छा पूर्ण होता होता कदाचित अपूर्ण राहण्याचा संभव आहे. वाहन खरेदीचा विचार करीत असाल तर या ना त्या कारणाने तो बेत पुढे ढकलला जाण्याचा संभव आहे. काही देवघेवीचे व्यवहार असतील तर तेही लांबणीवर पडतील. नवीन घर, स्थावर मालमत्ता घेण्याचा विचार तूर्तास पुढे ढकलला तरच फायद्याचे होईल असे वाटते. सध्या शांत रहा.

उपाय : अखंड आपल्या इष्टदेवतेचे नामस्मरण करा.

वृश्चिक

आपल्या मुलांच्या प्रगतीमुळे आपण आनंदित असाल. आपण घेत असलेल्या विद्येतही आपल्याला यश मिळण्याची शक्मयता आहे. लॉटरीसारख्या प्रकारातून अचानक धनलाभ होण्याची शक्मयता आहे. पण तो धनलाभ योग्य मार्गाने होतो का ते मात्र पारखून घ्या. नंतर पश्चात्ताप नको. काही कारणामुळे आपल्या विचारांना चालना मिळेल आणि त्यामुळे आपले कार्य यशस्वीरित्या पारही पडेल.

उपाय : हनुमान चालिसाचे दररोज पठण करा.

धनु

तब्येतीला जरा सांभाळून राहण्याची गरज आहे. गुप्त शत्रूंच्या कारवायामुळे काही त्रास वाटेल. पण काही काळजी करू नका. आपला गुऊ यातून आपल्याला तारून नेईल. घरातील महत्त्वाच्या वस्तूंचा नीट सांभाळ करा. आपल्या घराण्याकडून आपल्याला चांगली साथ मिळेल. एकंदरीत हा आठवडा आपण संपूर्ण खबरदारी घेतलीत तर समाधानात जाण्याचा संभव आहे.

उपाय : दत्तगुऊंची उपासना करा.

मकर

जोडीदाराचे सहकार्य म्हणावे तसे मिळण्याची शक्मयता कमी आहे. काही आपल्या मनाविऊद्ध घटना घडण्याचा संभव आहे. आपला काही स्वतंत्र उद्योगधंदा असेल तर सध्या त्याच्यामध्ये गुंतवणूक करू नका. आहे तसे चालवायचा प्रयत्न करा. आणि भागीदारीत असेल तर मुळीच करू नका. सध्या त्यात फायद्याची शक्मयता कमी दिसते. नसत्या वादावादीच्या भानगडीत मात्र पडू नका.

उपाय : मंगळवारी माऊतीला पिंपळाच्या पानांचा हार अर्पण करा.

कुंभ

वाहन चालवताना जपून आणि रहदारीचे सर्व नियम पाळून चालवा. कोणत्या तरी स्त्राrकडून द्रव्यलाभ संभवतो. पण ते द्रव्य कोणत्या मार्गाने आलेले आहे, जबरदस्तीने तरी येत नाही ना याचा पूर्ण विचार करून ते स्वीकारा. अन्यथा ते द्रव्य आपल्याला लाभण्याची शक्मयता कमी असते. आपल्याला या आठवड्यात कोणती तरी चिंता सतावत राहण्याची शक्मयता आहे. शांत रहा.

उपाय : शनिच्या स्तोत्रांचे रोज पठण करा.

मीन

वडीलधाऱ्या मंडळींचे आशीर्वाद व सहवास या आठवड्यात आपल्याला मिळण्याची शक्मयता आहे. आपल्या हातून काही चांगले कार्य घडेल असे वाटते. आपल्याला काही परोपकार करण्याची इच्छा झाल्यास फार विचार करत बसू नका. ती इच्छा अमलात आणा. त्याचा आपल्याला खूप फायदाच होईल. काही दानधर्म, पुण्यकर्म करण्यासाठी विचार करू नका. ताबडतोब करा, आशीर्वाद मिळतील.

उपाय :  शनिवारी शनिच्या देवळात जाऊन शनिला तेल वाहा.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article