महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

राशिभविष्य

06:06 AM Aug 07, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

विवाह गुण मिलन चुलीत घातले...मग पुढे काय?

Advertisement

मुद्दा 3 - आरोग्य : हा एक अत्यंत महत्त्वाचा मुद्दा आहे. विवाहापूर्वी मुलाचे किंवा मुलीचे आरोग्य कसे होते याची चौकशी करणे आजही आपल्याकडे एक दुय्यम मुद्दा म्हणून पाहिले जाते. जर कोणी सांगितलेच किंवा शंका आली तरच याबाबतीत चौकशी केली जाते. विवाहापूर्वीचे आरोग्य कसे आहे याबद्दल नुसती चौकशी करण्यापेक्षा ज्याप्रमाणे आपण कुंडली आणि बायोडेटा पाठवतो त्याप्रमाणे ‘आरोग्य डेटा’ पाठवायला काय हरकत आहे? विवाहापूर्वी केल्या जाणाऱ्या काही वैद्यकीय चाचण्या अत्यंत गरजेच्या आहेत. जशा की आरएच पॅक्टर, रक्त चाचणी आणि रक्तगट चाचणी, अनुवांशिक चाचणी, थॅलेसेमिया चाचणी, एचबी इलेक्ट्रोफोरेसीस/एचबी टायपिंग चाचणी, हिपॅटायटीस बी व्हायरस अँटीबॉडी चाचणी, हिपॅटायटीस बी, सी, ए व्हायरस प्रतिजन चाचणी, गर्भाशयाच्या मुखाच्या कर्करोगाची तपासणी, पेल्विक अल्ट्रासाऊंड, सिफिलीस चाचणी, एचआयव्ही/एड्स चाचणी, अँटी-ऊबेला चाचणी/ऊबेला सेरोलॉजी. लक्षात घ्या आज जरी तुम्हाला या सगळ्या गोष्टी अनावश्यक वाटत असल्या तरी येणाऱ्या दहा वर्षानंतर जन्म कुंडली  बरोबरच आरोग्याच्या चाचण्यांची ही आरोग्य कुंडली ही द्यावीच लागेल यात शंका नाही. मेडिकल एŸस्ट्रोलॉजी म्हणजे वैद्यकीय ज्योतिषशास्त्राची यात मदत होऊ शकते.

Advertisement

मुद्दा 4 - संतती : पूर्वी विवाहाचा उद्देश हा पुनऊत्पादन किंवा संतती प्रजनन हा होता. आपल्या कुळाची वाढ व्हावी आपले नाव कोणीतरी चालवावे हा त्यामागचा उद्देश होता. पण आजकाल परिस्थिती बदललेली आहे. आजही जरी संतती हा मुद्दा असला तरी केवळ तोच मुद्दा राहिलेला नाही. कित्येक जोडपी स्वेच्छेने संतती होऊ न देण्याचे ठरवतात. असे असले तरी दोघांच्या कुंडलीवरून बीज क्षेत्र आणि स्फूट क्षेत्र यांच्यावरून संततीसाठीचे ज्योतिषशास्त्राrय नियम बघून संतती होण्याची शक्मयता काढता येते. आता इथे आणखीन एक गोष्ट लक्षात घ्यायला हवी की आजचे वैद्यकीय शास्त्र पूर्वीपेक्षा किती तरी पुढे गेले आहे!

मग पारंपरिक गुण मिलन पद्धती म्हणून आपण काय घेऊ शकतो? ‘योनी’ ज्याच्यामुळे सेक्सुअल टेंडन्सीचा विचार केला जाऊ शकतो, अशुभ नवपंचम, अशुभ द्विद्वादश आणि मुख्य म्हणजे षडाष्टक या काही गोष्टी विचारात घेतल्या जाऊ शकतात. हे विचार मी माझ्या पद्धतीने आणि माझ्या अनुभवावरून मांडलेले आहेत. त्यातील किती घ्यायचे किती सोडायचे हा ज्याचा त्याचा प्रश्न. बरं हे एवढा सगळा अभ्यास करून ज्योतिषाला त्याचे मानधन किती मिळायला हवे याचाही विचार समाजाने केला पाहिजे. बरोबर ना? मंडप घालण्यासाठी लाखो ऊपये खर्च करणारे ज्योतिषाला आणि विवाहाचे पवित्र मंत्र म्हणून वर-वधूला जन्मभर पुरतील इतके आशीर्वाद देणाऱ्या गुऊजींना पैसे देण्यात कंजुसी करतात ही विडंबना आहे. तूर्तास तितकेच.

पूर्वी वधू-वर सूचक मंडळाच्या एका वेबसाईटवरती आणि अॅडवरती कुंडली जुळेलही पण मने जुळली पाहिजे असे काहीसे लिहिलेले असायचे किंवा दाखवले जायचे. सत्य परिस्थितीचा हा किती मोठा विपर्यास आहे हे तुम्हीच पहा. कुंडली मिलन हा ज्यांना केवळ गुण मिलन सारखा टेबलवर बघता येण्यासारखा सोपा विषय वाटतो त्यांच्या करता कदाचित ते लागू होते. पण मुळात कुंडली मिलन करणे म्हणजे दोन आयुष्यांच्या पुढील आलेखावरती टिप्पणी करणे इतके अवघड आहे.

गुण मिलनामध्ये वर्ण हा अध्यात्म दाखवतो, (जातींचा येथे कुठलाही संबंध नाही) वश्य म्हणजे जलचर, वनचर, कीटक, मानव आणि चतुष्पाद हे स्वभाव दर्शक आहेत. तारा गुणचक्र हे नक्षत्रावर आधारित मिलन आहे. योनी ही सेक्सुअल टेंडन्सी दाखवते. ग्रह मैत्री ज्याला पाच गुण आहेत ही राशी स्वामींची एकमेकांशी मैत्री कशी आहे हे दाखवते. गण (इथे देव, मनुष्य आणि राक्षस) या प्रवृत्ती आपल्या सगळ्यांमध्ये वेगवेगळ्या वेळेला वेगवेगळ्या स्वऊपात प्रकट होत असतात. राशी कूट जे दोन राशींमध्ये एकमेकांमध्ये किती अंतर आहे आणि जे सहा आठ  किंवा अनिष्ट एक बारा 9-5 नसावे हे सांगते. आणि शेवटी नाडी याचा उपयोग बहु संतती करता आहे. संपूर्ण भारतामध्ये या गुणांच्या आधारे वधू-वर गुण मिलन करू नये असा आधुनिक ट्रेंड असताना आपण या अष्टकूटमध्ये अडकून बसणे योग्य आहे का हे तुम्हीच ठरवा. मुळात कुंडली मिलनाचा उपयोग हा कौन्सिलिंग करता, म्हणजे वर आणि वधू यांना पुढे काय घडणार आहे आणि त्यांचे गुणदोष काय असू शकतात हे समजावण्याकरता असावा असे मला वाटते. आजच्या घडीला जेव्हा दोघेही तितकेच कमावतात, काम करतात, घरच्या जबाबदाऱ्या उचलतात, केवळ पुऊष सत्ता पद्धती जिथे आता अस्तित्वात नाही अशावेळी ज्योतिषांची जबाबदारी सुद्धा वाढते हे खरे आहे ना?

मेष :

वडिलांची साथ चांगली मिळेल. स्वतंत्र उद्योगात असाल तर वडिलांचा सल्ला घ्या, त्यांचा आशीर्वाद घ्या. नक्की यश मिळेल. उद्योगधंद्यात भरभराट होण्याची शक्मयता आहे. नोकरीत असाल तर आल्या कामावर वरिष्ठ खूश होऊन आपली पदोन्नती होण्याचा संभव आहे. मानमरातब मिळेल. समाजात प्रतिष्ठा मिळण्याचा संभव आहे. एकंदरीत हा आठवडा आपल्याला छान जाणार असे दिसते.

उपाय : महालक्ष्मीची उपासना करा.

वृषभ :

नातेवाईकांच्या भेटीगाठी होण्याचा संभव आहे. काही कारणाने अथवा समारंभाच्या निमित्ताने मित्रपरिवाराच्या गाठीभेटी होतील. त्या निमित्ताने काही खरेदी होण्याचा संभव आहे. एखादी भेटवस्तू मिळेल. वडील भावंडांची भेट होण्याची शक्मयता आहे. आणि या सगळ्यांच्या प्रोत्साहनाने आपण जे कार्य करायचे ठरवले असेल ते कार्य करण्यास आपण जास्त प्रेरित व्हाल.

उपाय : प्रत्येक श्रावण सोमवारी मंदिरात जाऊन महादेवाचे दर्शन घ्या.

मिथुन :

खर्चावर नियंत्रण ठेवण्याची गरज आहे. योग्य त्या ठिकाणीच खर्च करा. परदेशी प्रवास करण्याची शक्मयता आहे. अशा वेळी खर्च होणारच. तो होऊ द्या. पण वायफळ खर्च नको. काही दानधर्मात खर्च करण्यास हरकत नाही. थोडी आध्यात्मिक शक्ती मिळविण्याचा प्रयत्न करा. आध्यात्माकडे वळाल तर जन्माचे सार्थक करून घ्याल. या आठवड्यात कोणताही निर्णय घेताना पूर्ण विचारांती निर्णय घ्या.

उपाय : मुक्मया प्राण्यांना खाऊ घाला.

कर्क :

या आठवड्यात मनाची चंचलता वाढण्याची शक्मयता आहे. सांभाळा. थोडा संयम ठेवायला शिकलेच पाहिजे. एवढ्या तेवढ्या गोष्टीवरून चिडचिड होण्याची शक्मयता आहे. चिडचिड होऊ देऊ नका. शांततेने व विचारपूर्वक वागा. आपल्या कामाच्या बाबतीत निराशा जरी पदरी पडली तरी वाईट वाटून घेऊ नका. धैर्याने पुढे जा. एक ना एक दिवस नक्की यश मिळेल, अशी आशा मनी असू द्या.

उपाय : प्रत्येक सोमवारी शंकराला बेल वाहा.

सिंह :

कुटुंबात राहूनही आपल्याला थोडे अलिप्त राहिल्यासारखे वाटेल. आपल्या विद्वत्तेचे म्हणावे तितके कौतुक होणार नाही. त्यामुळे सध्या तरी कुणाला फुकटचा सल्ला द्यायला जाऊ नका. आपला सल्ला ऐकतीलच असे नाही. वडिलोपार्जित संपत्तीविषयी काही चर्चा सुरू असल्यास आपण स्थितप्रज्ञ राहिलेलेच बरे. नाहीतर आपल्या बोलण्याने होणारे काम सुद्धा बिघडून जाण्याची शक्मयता आहे.

उपाय : नित्यनेमाने नामस्मरण करीत रहा.

कन्या :

धाकट्या भावंडात व तुमच्यात काही कारणावरून मतभेद होण्याची शक्मयता आहे. सांभाळून घ्या. समजुतीने वागा. खाण्यापिण्याची चंगळ होईल पण सांभाळा. तब्येत बिघडण्याची देखील शक्मयता आहे. नसते साहस कुठेही करायला जाऊ नका. नाहीतर अंगलट येण्याचा संभव आहे. नोकरावर अति विश्वास टाकू नका. एकूण या आठवड्यात तुम्ही सांभाळून आणि शांत रहावे.

उपाय : महालक्ष्मीची आराधना करा.

तूळ :

नवीन वाहन खरेदीचा योग संभवतो. काही जमीन खरेदी-विक्रीचा व्यवहार करण्याचा विचार करीत असाल तर यश मिळण्याची शक्मयता आहे. विद्यार्थी मित्र मैत्रिणींनो आपल्या अभ्यासात प्रगती होण्याची शक्मयता आहे. आपल्या मेहनतीचे आपल्याला फळ नक्की मिळेल. मातेच्या सहवासात व त्यांच्या मार्गदर्शनाखाली प्रगती होऊन वेळ छान जाण्याची शक्मयता आहे. आनंदात रहा.

उपाय : अन्नपूर्णेची उपासना करा.

वृश्चिक :

मुलांची चिंता या ना त्या कारणाने सतावत राहील. पण काळजी करू नका. गुऊची पूर्ण कृपादृष्टी आहे. त्यामुळे मुले आपली कामे चोख करून धडाडीने पुढे जातील. त्यांना तुमच्या योग्य मार्गदर्शनाची आणि आशीर्वादाची गरज आहे. लॉटरी वगैरे तत्सम प्रकारातून धनलाभ होण्याची शक्मयता आहे. पण योग्य मार्गाने आलेल्या संपत्तीचाच स्वीकार करा. अन्यथा नको.

उपाय : नित्यनेमाने हनुमान चालीसाचा पाठ करा.

धनु :

कष्ट तर करावे लागणारच आहेत. पण तब्येतीला सांभाळून कष्ट करा. चोरापासून व नोकरापासून सावध रहा. गुप्त शत्रूंचा त्रास एवढा जाणवणार नाही. पण कोणतीतरी चिंता सतत सतावत राहण्याची शक्मयता आहे. ज्या ठिकाणी तुमचा मान ठेवला जाईल त्याच ठिकाणी तुम्ही जाण्याचा प्रयत्न करा. नाहीतर हात दाखवून अवलक्षण असा प्रकार होण्याची शक्मयता नाकारता येत नाही.

उपाय : दत्तगुरुची उपासना करा.

मकर :

जोडीदाराबरोबर जरा समजुतीने घ्यावे लागेल असे दिसते. त्याचे सहकार्य मिळेल, पण थोडे त्याच्या कलाने घ्यावे लागण्याचा संभव आहे. विनाकारण वादावादीत पडू नका. भागीदारीत व्यवसाय असेल तर भागीदाराच्या कलाने व्यवसाय करावा लागेल असे दिसते. आणि तसे केल्यानेच कदाचित व्यवसाय वृद्धी संभवते. काही हरवलेली वस्तू सापडण्याची शक्मयता आहे.

उपाय : दर मंगळवारी मंदिरात जाऊन मारुतीचे दर्शन घ्या.

कुंभ :

स्त्राrकडून धनलाभाची शक्मयता आहे. पण तो योग्य मार्गाने आला तरच चांगला आहे. आणि इतरही मार्गाने येण्याची शक्मयता संभवते. पण तो कुठलाही मार्ग असला तरी योग्य असला पाहिजे तरच त्याचा स्वीकार करा. अन्यथा पस्तावाची पाळी येईल. परिवारातील कोणाची तरी आरोग्याची चिंता मनाला लागून रहाण्याची शक्मयता आहे. पण काळजी करू नका.

उपाय : दर शनिवारी कोणतेही एक शनिचे स्तोत्र म्हणा.

मीन :

जप तप करण्यात हा आठवडा जाईल असे दिसते. काही धर्माची कामेही आपल्या हातून होण्याची शक्मयता आहे. होता होईल तेवढा परोपकार करा. शुध्द मनाने आणि शुध्द विचार मनात आणून दान धर्म करा. आपल्याला त्याचा फायदाच होईल. सत्संग घडेल. संतांचा आशीर्वाद आपल्याला मिळण्याची शक्मयता आहे. सध्या श्रावण चालू असल्याने आपल्या घरचे कुलधर्म कुलाचार नीट पाळा.

उपाय : दररोज देवापुढे अखंड नंदादीप लावा.

Advertisement
Tags :
##tarunbharatnews#horoscope#social media
Next Article