खजाना राशिभविष्य
नववर्षाचे गिफ्ट-3 उपयुक्त यंत्र प्रयोग
वाईट स्वप्न नाशक यंत्र
हं सं षं फं
चं दं धं जं
चं पं मं दं
चं यं जं दं
झोपताना उशी खाली ठेवावे.
मुलांचे संरक्षण करणारे यंत्र
2 4 2 7
6 3 6 5
8 3 8 1
4 5 4 3
गळ्यात बांधावे.
सर्व कार्य सिद्धी यंत्र
18 8 1 24 17
16 14 7 5 23
22 20 13 6 4
9 2 15 18 11
जवळ ठेवावे.
नित्य लक्ष्मी दाता यंत्र
25 20 27
26 24 25
21 28 23
जवळ ठेवावे.
बुद्धी प्राप्ती यंत्र
7 74 9 59
6 6 17 37
47 86 8 9
8 5 39 57
शुक्ल चतुर्दशीला रात्री उजव्या हातावर बांधावे.
नजर दोष दूर करणारे यंत्र
7 18 20 15
1 34 7 18
35 10 18 15
11 7 25 10
मंगळवारी गळ्यात बांधावे.
सर्वजण आकर्षण यंत्र
28 5 31 36
35 32 8 25
30 37 27 6
जवळ ठेवावे.
व्यापार वृद्धी यंत्र
45 36 50 39
42 47 37 44
35 46 40 49
48 41 43 38
जवळ ठेवावे.
भोजपत्र हे झाडाचे साल आहे जे काष्टौषधीच्या दुकानात मिळते. केशर व अष्टगंध यांच्या शाईने भोजपत्रावर ही यंत्रे काढावीत. सगळ्यात लहान नंबरपासून सुरू करावे व मोठ्या नंबरपर्यंत लिहावे. साधी पूजा करून मग यंत्र वापरावे.
मेष
मनाप्रमाणे घटना घडतील. मैत्री वाढेल. अरेरावी केल्याने तणाव होईल. धंद्यावर लक्ष ठेवा. कोणताही निर्णय विचारपूर्वक घ्या. कुटुंबात आर्थिक समस्या निर्माण होईल. कामगार नाराज होऊ शकतात. संसारात वृद्ध व्यक्तीची चिंता वाटेल. कोर्टकेस किचकट होईल. संयम ठेवा. कमी बोला. गैरसमज वाढू देऊ नका. कला-क्रीडा क्षेत्रात अपयशाने खचू नका. प्रगती होईल.
उपाय : नोकरीत कायदा पाळा.
वृषभ
रविवारी तुमच्या पद्धतीने पार्टी कराल. सामाजिक कार्याचा विस्तार करता येईल. धंदा वाढेल. कामाच्या क्षेत्रात महत्त्वाची भेट घेता येईल. सप्ताहाच्या शेवटी गैरसमज झाल्याने संसारात तणाव होईल. जीवनसाथीबरोबर मतभेद होईल. मोठे आश्वासन मिळेल. कोर्टकेसमध्ये समजूतदारपणे चर्चा करा. योग्य सल्ला घ्या. विद्यार्थ्यांनी खाण्याची काळजी घ्यावी.
उपाय : दूध दान करा.
मिथुन
व्यवसायात चांगले कार्य करता येईल. सामाजिक प्रतिष्ठा वाढेल. लोकप्रियता मिळेल. राजकीय क्षेत्रात पदाधिकार आत्ताच मिळू शकतो. प्रयत्न करा. धंद्यात मोठे कंत्राट मिळवाल. संसारात आनंदी बातमी मिळेल. परदेशात जाण्याचा योग येईल. नवीन नोकरी मिळेल. घर, वाहन, जमीन खरेदी करू शकाल. वरिष्ठांची मदत घेता येईल. मैत्रीत वाढ होईल. प्रेमाला चालना मिळेल.
उपाय : जेवणासाठी शिधा द्या.
कर्क
कोणतेही धाडस करताना सावधगिरी ठेवा. वाद वाढवू नका. दुखापत संभवते. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे विचार सर्वांना पटवून देता येईल. संयमाने वागा. लोकप्रियता मिळवा. मैत्रीतून मोठे काम मिळेल. संसारात प्रेमाचे वातावरण राहील. प्रेमाला चालना मिळेल. कला, क्रीडा क्षेत्रात चमकाल. नवीन ओळख वाढेल. जुने मित्र भेटतील. कोर्टकेसमध्ये यश मिळेल. नम्रता ठेवा.
उपाय : अन्नदान करा.
सिंह
विशेष कल्पना सुचेल. विचारांना चालना मिळेल. सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. सप्ताहाच्या मध्यावर गुप्त कारवायांचा त्रास होईल. थकवा वाढेल. प्रवासात सावध राहा. मागील येणे वसूल करा. घरात शुभ घटनांची चर्चा होईल. उत्साह वाढेल. मोठ्या लोकांची मदत होईल. नोकरदार व्यक्तींना स्त्राr वर्गामुळे त्रास होण्याची शक्यता आहे. घरातील वाद सामोपचाराने मिटवा.
उपाय : खोटे बोलू नका.
कन्या
घरात वाद होऊ शकतो. कोणत्याही समस्या वाढवू नका. दादागिरीची भाषा त्रासदायक ठरेल. या काळात कोणताही निर्णय घेता येईल. परंतु कोणालाही दुखवू नका. वागण्यात नम्रता ठेवा. वरिष्ठांचा सल्ला घ्या. जवळचे लोक मदत करतील, असे समजू नका. धंदा वाढेल, फायदा होईल. तुमच्या स्वभावाचा फायदा घेण्याचा प्रयत्न होईल. शेजारील त्रास करण्याची शक्यता आहे.
उपाय : चिमण्यांना दाणे टाका.
तुळ
कठीण प्रसंगावर मात करू शकाल. कामाच्या ठिकाणी उतावळेपणाने शब्द देऊ नका. खर्च वाढेल, कामगारांची समस्या तुम्हाला सतावेल. कौटुंबिक कार्यात सोमवार, मंगळवार अडचणी येतील. रागावर नियंत्रण ठेवा. प्रवासात सावध राहा. दुखापत संभावते. संसारात किरकोळ नाराजी होऊ शकते. थोरा-मोठ्यांचे सहकार्य मिळेलच असे कधीही समजू नका.
उपाय : घरात गंगाजल ठेवा.
वृश्चिक
आनंदी राहाल. किरकोळ वाद वाढवू नका. मैत्रीत नाराजी होऊ शकते. गुरुवारी महत्त्वाची कामे करा. राजकीय-सामाजिक कार्यात अडचणी येऊ शकतात. विरोधक तुमच्या विरोधात जातील. तक्रार करणारी जनता वाढेल. आळस करू नका. जिद्द ठेवा. कोर्टकेसमध्ये अडचणी येऊ शकतात. विद्यार्थी वर्गाने आळस न करता अभ्यास करावा तरच यश मिळेल.
उपाय : मिठाचे प्रमाण कमी करा.
धनु
कार्याला दिशा मिळेल. गुप्त कारवायांना आळा घालता येईल. धंद्यात सुधारणा होईल. गुंता सोडवता येईल. संसारात शुभ घटना घडेल. मुलांची प्रगती होईल. राजकीय-सामाजिक कार्यातील चूक सुधारता येईल. आरोप दूर करा. तुमची लोकप्रियता वाढेल. परदेशात जाण्याचा योग आहे. थकबाकी वसूल करा. नवीन ओळखी वाढतील. विद्यार्थी वर्गाला मोठे यश मिळवता येईल.
उपाय : पांढऱ्या गाईची सेवा करा.
मकर
कार्य व्यवस्थितपणे पूर्ण करता येईल. प्रत्येक दिवस प्रयत्नांना यश देणारा ठरू शकतो. धंद्यात सुधारणा होईल. वाद मिटवता येईल. गुंतवणूकदार स्वत:हून येतील. राजकीय-सामाजिक कार्यात तुमचे महत्त्व वाढेल. लोकांचा विश्वास संपादन करता येईल. सणांचे महत्त्व आपणच वाढवावे लागेल. तुमच्या सुप्त इच्छा पूर्ण करण्यासाठी इतरांची मदत घ्यावी लागेल.
उपाय : तांब्याच्या भांड्यातून पाणी प्या.
कुंभ
महत्त्वाच्या वस्तू सांभाळा. तुमचे विचार योग्य असतील. परंतु त्यात विरोध होण्याची शक्यता आहे. तुमच्या बोलण्यातून गैर अर्थ काढला जाईल. व्यवसायात चुकीमुळे समस्या येऊ शकते. कुटुंबाला शेजारी त्रस्त करण्याचा प्रयत्न करेल. मुलांचे सहकार्य मिळेल. प्रगती होईल. कोर्टकेसमध्ये किरकोळ वाद वाढेल. रागावर नियंत्रण ठेवा. शब्द जपून वापरा.
उपाय : वटवृक्षाला पाणी घाला.
मीन
नोकरीत दडपण वाढेल. सोमवार-मंगळवारी चूक करू नका. थट्टा-मस्करी करणे अंगाशी येऊ शकते. कामाच्या ठिकाणी स्त्रियांची चेष्टा करणे महागात पडेल. तुमच्याकडे अतिमहत्त्वाचे काम सोपवले जाईल. पथ्य न पाळून पैसे खर्चून आजारपण ओढावून आपण घेतो. नोकरीतील तणाव कमी होईल. मित्रांची समजूत काढावी लागेल. नकार द्यायला शिका. फायदा होईल.
उपाय : दुर्गा पूजा करा.