उत्पादन शुल्क विभागाने जिल्ह्यात जमविला 378.23 कोटींचा महसूल
कोल्हापूर :
कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क अधीक्षक कार्यालयाने वर्षभरामध्ये अवैध दारुची निर्मीती, वाहतुक आणि विक्री विरोधी 2 हजार 87 गुन्हे दाखल करुन, एकुण 1 हजार 998 संशयीत आरोपीना अटक करण्यात आली आहे. तर 129 इतकी वाहणे जप्त केली करीत, 4 कोटी 77 लाख 24 हजार 51 ऊपयांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तसेच जिह्यामध्ये 1 एप्रिल ते 30 नोव्हेंबर पर्यंत 378.23 कोटी ऊपयांचा महसुल जमा केलेला आहे, अशी माहिती कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षिका स्नेहलता नरवणे यांनी दिली.
कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षिका नरवणे म्हणाल्या, जिह्यामध्ये 1 एप्रिल ते 30 नोव्हेंबर पर्यंत देशी दाऊ 68 लाख 4 हजार 232 बल्क लिटर आणि विदेशी दाऊ 66 लाख 30 हजार 266 बल्क लिटर व बियर 46 लाख 33 हजार 584 बल्क लिटर याप्रमाणे मद्यविक्री झाली आहे. तर नाताळ आणि नववर्षानिमित्त 24 व 25 डिसेंबर आणि 31 डिसेंबर रोजी राज्यातील विविध विशिष्ट अशा दाऊ विक्री दुकानदारांना त्यांच्या निर्धारित वेळे नंतर रात्री उशीरापर्यंत दाऊची दुकाने, क्लब उघडे ठेवण्यास राज्य सरकारने मंजूरी देण्यात आल्याचे सांगितले.
त्यांनी अवैध दाऊची निर्माती, वाहतुक व विक्रीबाबत कोणालाही माहिती मिळाली. तर त्यांनी राज्य उत्पादन शुल्क विभागाचे टोल फ्री क्रमांक 18002339999 या क्रमांकावर माहिती द्यावी. माहिती देणाऱ्या व्यक्तीचे नाव गोपनिय ठेवण्यात येईल, असे अधीक्षक नरवणे यांनी आवाहन केले आहे.
जिह्यात नऊ विशेष भरारी पथके
ख्रिसमस व नववर्षाच्या अनुषंगाने कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क, अधीक्षक कार्यालयाने अवैध दाऊची निर्मिती आणि वाहतुक व विक्री रोखण्यासाठी जिह्यामध्ये नऊ विशेष भरारी पथके निर्माण केली आहे. या पथकाव्दारे विशेष करुन, गोवा राज्यातुन होणारी अवैध मद्याची वाहतुक तसेच परवानगी न घेता आयोजित करण्यात येणाऱ्या मनोरंजनात्मक कार्यक्रम व पाटर्या यावर लक्ष केंद्रीत करण्यात येणार आहे. आक्षेपार्ह आढळुन आल्यास संबंधीताविरोधी तात्काळ कारवाई करण्यात येणार आहे, अशी माहिती कोल्हापूर राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या अधीक्षिका स्नेहलता नरवणे यांनी दिली.