भविष्य खजाना
हरऽऽऽऽ हर ऽऽऽऽ महादेव!!!!!!
सनातन संस्कृतीमध्ये आपण त्रिदेवांना मानतो. ब्रह्मा जो सृष्टीचा निर्माता आहे, क्रियेटर आहे. विष्णू ज्याने संपूर्ण सृष्टीच्या संवर्धनाची, पालन पोषणाची जबाबदारी उचलली आहे आणि शिव जो डिस्ट्रॉयर आहे किंवा प्रलयंकर आहे, नाशाला- विनाशाला कारणीभूत आहे. 70-80 च्या दशकामध्ये अत्यंत प्रसिद्ध झालेल्या ओशो रजनी यांनी संपूर्ण भारतामध्ये सगळ्यात जास्त पूजला जाणारा देव हा शंकर का आहे त्याचे उत्तर दिले की, आपण मुळात मृत्युला घाबरतो आणि म्हणून गल्लोगल्ली शंकराची मंदिरे आहेत. त्यांचा हा विचार योग्य आहे की, अयोग्य हा ज्याचा त्याचा प्रश्न. पण एक अद्भुत आकर्षण असलेली देवता, करोडो भारतीयांचे श्र्रद्धास्थान, आजच्या तऊणाईला वेड लावणारे तत्त्वज्ञान, तंत्र-मंत्र-यंत्र, योग, पराविद्या, जीवन मुक्तीचे रहस्य ज्याच्या मुखार्विंदातून प्रकट झाले त्या देवांच्या देवाला तोड नाही हेही तितकेच खरे. कल्पना करा की, एक बीज जमिनीत रोवले. हे झाले ब्रह्माचे काम. ब्रह्माचे काम इथे संपते. त्या बीजातून अंकुर फुटतो. त्याला योग्य ती जमीन मिळावी, पाणी मिळावे, पोषण मिळावे हे सगळे जे काम आहे ते महाविष्णूच्या हातात आहे. ते झाड उमलते, वाढते आणि एका विशिष्ट कालावधीनंतर ते सुकून जाते किंवा मरते.
एका अर्थाने आयुष्यातल्या प्रत्येक वळणावर प्रत्येक घटनेला कारणीभूत जे तत्त्व आहे ते शिव आहे. ज्या ज्या ठिकाणी परिवर्तन आहे त्या त्या ठिकाणी शंकराचे स्थान असते. शास्त्रकारांनी प्रलय हा सुद्धा कित्येक प्रकारचा सांगितला आहे. त्यामध्ये नित्य प्रलय जो आहे तो सुद्धा भगवान शंकराच्या आधीन आहे, असे तुम्हाला वाटत नाही का? आपण ज्या वेळेला झोपतो तो एक प्रकारचा प्रलयच नाही का? दिवसभर घडलेल्या घटनांना विसरून एका अलग दुनियेमध्ये आपण जातो जिथे आपल्याला आपल्या शरीराची शुद्धही नसते, हा प्रलयच ना? मग शंकराचे अस्तित्व आपल्या प्रत्येक क्षणात आहे हे म्हणणे अतिशयोक्तीचे होणार नाही. या त्रिदेवांच्या क्रिया शक्तीला वेगवेगळी नावे आहेत. ब्राह्मी, वैष्णवी, ऊद्र आणि या त्यांच्या क्रिया शक्ती आहे. म्हणजेच पुऊष आणि प्रकृती याचा किती खोल विचार आपल्या पूर्वजांनी किंवा ऋषिमुनींनी केला आहे हे पहा. शिवस्वरोदय शास्त्राबद्दल लिहीत असताना नवीन वर्षाची गिफ्ट वाचकांना द्यावी म्हणून वेगवेगळ्या प्रकारची यंत्रे आणि जीवन सुखी करण्याचे तोडगे सांगितले. 26 फेब्रुवारीला महाशिवरात्र आहे. या महाशिवरात्रीबद्दल किंवा एकंदर शंकर या देवतेबद्दल लिहिण्याकरता त्या महादेवानेच प्रेरणा दिली असे मला वाटते. ही लेखमाला 26 तारखेपर्यंत असेल इतकेच मला माहिती आहे. या लेखमालेमध्ये कोणकोणत्या गोष्टी समाविष्ट करायच्या याबद्दल सध्या तरी मी अनभिज्ञ आहे. आपल्यापैकी जास्तीत जास्त लोक ॐ नम: शिवाय या मंत्राचा जप करतात. हा पंचाक्षरी मंत्र तारक मंत्र आहे, सगळ्या प्रकारच्या व्याधींपासून वाचवणारा मंत्र आहे. सगळ्या प्रकारच्या संकटांना दूर करणारा मंत्र आहे. या मंत्राला जास्तीत जास्त प्रभावी कसे करता येईल त्याकरता सोबत एक यंत्र दिले आहे. हे यंत्र तांब्याच्या पत्र्यावर कोरून जवळच्या कोणत्याही शंकराच्या मंदिरात जाऊन, शंकराला अभिषेक घालून, शिवलिंगाला स्पर्श करून आपल्या देव्हाऱ्यात ठेवावे. या यंत्राला हळद-कुंकू लावू नये. सफेद चंदन आणि भस्म लावावे. पंचाक्षरी मंत्राचा जमेल तितका जप करावा आणि आपल्या आयुष्याचे सार्थक करावे, असे मला वाटते. मंत्राचा अर्थ देखील समजून घेतल्यास त्याचे परिणाम अत्यंत जलद गतीने मिळतात हा अनुभव आहे. या मंत्रातील ओम हे बीजाक्षर सृष्टीच्या निर्मितीच्या वेळेला निर्माण झालेला वर आहे, असे मानले जाते. नम: हा नमस्कार आहे आणि हा नमस्कार कोणाला तर त्या महादेवाला, जो सगळ्या प्रकारे आपले मंगल करतो म्हणजे ज्या ज्या वेळेला तुम्ही ॐ नम: शिवाय म्हणाल त्या त्या वेळेला ‘त्या निर्गुण निराकार माझे आयुष्य मंगलमय करणाऱ्या शंकराला माझा नमस्कार’ असा अर्थ तुमच्या मनात असला पाहिजे. (क्रमश:)
मेष
चैनीखातर खर्च वाढता राहणार आहे. सहलीचे बेत आखले जातील. वयस्कर व्यक्तींच्या गरजांसाठी पैसा खर्च केला जाईल. कुटुंबातील वयस्कर व्यक्तींचा सल्ला व्यवसायाच्या दृष्टीने लाख मोलाचा ठरेल. प्रतिष्ठित व्यक्तीच्या ओळखीतून कामे मार्गी लागतील. एखाद्या गोष्टीबद्दल जास्त वेळ विचार करायची सवय लागल्यामुळे निर्णय घेण्यास विलंब लागेल.
उपाय : शिवलिंगाला दुधाने अभिषेक करा.
वृषभ
मोठ्या प्रमाणावर आर्थिक उलाढाली घडून येतील. विविध व्यावसायिक उपक्रम राबविण्यात यश येईल. कौशल्याला चांगला वाव मिळेल. जुन्या मैत्रीला उजाळा मिळेल. सुग्रास भोजनाचे बेत आखले जातील. मिळालेल्या संधीचा लाभ आपले भविष्य उज्वल करणारा राहील. काही अविस्मरणीय घटना घडण्याची शक्मयता आहे. आपली इच्छापूर्ती होईल.
उपाय : गणपतीला दुर्वा अर्पण करा.
मिथुन
तीव्र इच्छाशक्ती व प्रगल्भ विचारसरणी यातून आपल्या अडचणींवर सहजपणे मात कराल. सकारात्मक विचारांमुळे अनपेक्षित चांगल्या गोष्टी घडतील. कामाच्या विस्ताराचा सतत ध्यास घ्याल. वैयक्तिक उत्कर्षाच्या दृष्टीने अनुकूल घडामोडी घडतील. मनातील कल्पना आकारास घेतील. कामानिमित्त दूरचे प्रवास घडून येतील. आर्थिक व्यवहारात जामीन राहण्याचे टाळावे.
उपाय : शिव चालिसा वाचा.
कर्क
हाती घेतलेल्या प्रत्येक कामात सफलता लाभेल. प्रयत्नांती परमेश्वर या उक्तीचा प्रत्यय येईल. वयस्कर व्यक्तींच्या गरजांसाठी पैसा खर्च केला जाईल. नवीन व्यावसायिक करार घडतील. प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. शैक्षणिक क्षेत्रात परदेशातील संस्थांशी संबंध येतील. तब्येतीला मात्र सांभाळावे लागेल.
उपाय : बेलाचे पान जवळ ठेवा.
सिंह
विश्वास आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेत तर इतरांची मदतही तुम्हाला होईल. आपल्या कार्यकौशल्यामुळे कार्यक्षेत्रातून आपली प्रशंसा केली जाईल. आपल्या इच्छा, आकांक्षा कृतीत आल्यामुळे समाधान लाभेल. आपल्या अंगभूत कलागुणांना चांगला वाव मिळेल. उंची वस्त्रालंकारांची खरेदी कराल. अवाजवी खर्च करणे आणि पोकळ आत्मविश्वास घातक ठरेल.
उपाय : विष्णूसहस्त्रनामाचे पाठ करा.
कन्या
आपल्या व्यक्तिमत्त्वाचा चांगला ठसा उमटवाल. अनपेक्षित धनलाभाची शक्मयता आहे. व्यवसायात मात्र कामाच्या मानाने आपली आवक कमी राहण्याची शक्मयता आहे. विश्वास आणि प्रामाणिकपणाने प्रयत्न केलेत तर इतरांची मदतही तुम्हाला होईल. मनातील कल्पना आकार घेतील. शेजाऱ्यांचे सहकार्य लाभेल. सांस्कृतिक कार्यक्रमात सक्रीय सहभाग घ्याल. समाधान लाभेल.
उपाय : गंगाजलाने स्नान करा.
तूळ
आपले काम दुसऱ्यावर सोपवू नका. अपयश येण्याची शक्मयता जास्त आहे. बिनभरोशाच्या कोणत्याही आर्थिक गुंतवणुकीपासून दूर रहा. आपले कार्यक्षेत्र विस्तृत करण्याचा प्रयत्न कराल. जुनी येणी वसूल होतील. आपली आर्थिक बाजू बळकट करणाऱ्या घटना घडतील. सामाजिक क्षेत्रातील आपल्या आघाडीच्या नेतृत्वामुळे समाजात प्रतिष्ठा उंचावेल. इच्छापूर्ती होईल.
उपाय : देवीला कुंकुमार्चन करा.
वृश्चिक
समोरच्या व्यक्तीची बाजू ऐकून घेऊनच त्यावर आपले मत व्यक्त करा. नवीन व्यावसायिक करार घडतील. प्रगतीपथावर मार्गक्रमण करण्यासाठी सतत नवीन योजनांची आखणी कराल. महिला स्वत:च्या पद्धतीने गृह सजावट करतील. महिलांना बदलाची नितांत गरज भासेल. शैक्षणिक क्षेत्रात मोठ्या संस्थांशी संबंध येतील. जुने मित्र भेटतील.
उपाय : शिवलिंगाला मधाने अभिषेक करा.
धनू
घरातील वातावरण आनंदी, उत्साही राहील. कुटुंबात धार्मिक शुभकार्याचे आयोजन केले जाईल. मित्रपरिवाराबरोबर वेळ मजेत घालवाल. आपल्या इच्छा, अपेक्षा कृतीत आल्याने समाधान लाभेल. विद्यार्थी वर्गाला शैक्षणिक क्षेत्रात चांगली प्रगती साधता येईल. उच्चशिक्षणासाठी प्रवेश मिळेल. आपल्या सहकाऱ्यांचे सहकार्य मोलाचे ठरेल. मित्रपरिवाराबरोबर आनंद घ्याल.
उपाय : बेलाच्या झाडाला दूध घाला.
मकर
हितशत्रूंच्या कारवायांवर मोठ्या युक्तीवादाने मात कराल. पाहुण्यांची वर्दळ राहील. घरात मंगलकार्याची नांदी होईल. गृहउद्योग अथवा जोडधंद्यातून चांगले लाभ घडून येतील. नवनवीन प्रकल्प हाती घेऊन यशस्वीपणे पूर्ण कराल. रेंगाळलेली कामे विनासायास मार्गी लागतील. कामानिमित्त दूरवर प्रवास घडून येतील. जनसंपर्कातून लाभ होतील.
उपाय : शिवपंचाक्षर मंत्राचा जप करा.
कुंभ
सार्वजनिक कामातून आपला नावलौकिक वाढेल. संततीसंबंधी सुवार्ता कानी येतील. कामानिमित्त प्रवास घडून येतील. नवनवीन अनुकूल घडामोडी घडतील. दुसऱ्याकडून काम करून घेण्यात यशस्वी व्हाल. तब्येतीविषयी डॉक्टरांकडून वेळच्या वेळी तपासणी करून घ्या. बढती-बदलीसाठी नोकरीत केलेल्या प्रयत्नांना यश येईल. आपल्या इच्छा कृतीत येतील.
उपाय : गणेश स्तोत्राचे पाठ करा.
मीन
परक्या माणसाकडून अचानक मदत मिळाल्यामुळे लाभ होतील. मन प्रसन्न राहण्याकरता जाणीवपूर्वक आपल्या विचारात बदल करण्याचा प्रयत्न करावा. जगाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलावा. धाडसी निर्णय घेतले जातील. पूर्वीच्या मिळालेल्या कामातील ऑर्डर्स वाढविल्या जातील. आपल्या अधिकारकक्षेत वाढ होऊन एखादी सवलत मिळेल. व्यवसाय उद्योगासाठीची कर्ज प्रकरणे मंजूर होतील.
उपाय : तीर्थयात्रा करा.