For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

राशिभविष्य खजाना

06:01 AM Dec 10, 2025 IST | Tarun Bharat Portal
राशिभविष्य खजाना
Advertisement

मेष

Advertisement

नोकरी व्यवसायात सहकार्य मिळेल. परदेशातून  फायदा होण्याची शक्यता आहे. नोकरवर्गाकडून अपेक्षित सहकार्य मिळेल. गुप्तशत्रुंचा त्रास कमी होईल. पण तिकडे दुर्लक्ष करूनही चालणार  नाही. आपल्या कामात प्रामाणिकपणा ठेवा. आईला छोटा प्रवास घडवाल. एकंदरीत हा आठवडा आपल्याला छान जाईल.

उपाय: गायीला चपाती गूळ खायला द्या.

Advertisement

वृषभ

जोडीदाराचे सहाय्य चांगले मिळेल. पण थोडे त्याच्या कलाने घ्यावे लागेल. त्याच्या सल्ल्याचा आपल्याला चांगलाच उपयोग होईल. विवाहेच्छुकांचे विवाह ठरतील. मनासारखा जोडीदार मिळेल. आपला काही व्यवसाय असेल तर त्या व्यवसायात आपल्या भागीदाराच्या सल्ल्याने प्रगती होण्याची शक्यता आहे.

उपाय: सूर्योदयाला सूर्याला अर्ध्य द्या.

मिथुन

या आठवड्यात आपले काम नेटाने पुढे न्यावे लागेल. कामात अनेक अडचणींना तोंड द्यावे लागणार असे दिसते. पण खचून जाऊ नका. प्रामाणिकपणे काम करीत रहा. भूलथापांना मात्र बळी पडू नका. सारासर विचार करून निर्णय घ्या. अन्यथा नुकसान होण्याची शक्यता आहे.

उपाय: ॐ नम: शिवायचा जप करा.

कर्क

या आठवड्यात आपल्या हातून काही धर्मकार्य घडण्याची शक्यता आहे. काही दानधर्म करण्यास अथवा परोपकार करण्यास मागे हटू नका. पण त्याचा गर्व मात्र करू नका. आपण काहीतरी वेगळे करतो या भावनेने काही अपशब्द कोणाला बोलू नका. संतसंगती घडण्याचा अथवा यात्रेला जाण्याचा संभव आहे.

उपाय: गणपतीची उपासना करा

सिंह

आपली या आठवड्यात काहीशी स्थितप्रज्ञासारखी अवस्था  होण्याची शक्यता आहे. काही लाभही होतील आणि काहीसे नुकसानही होण्याची शक्यता आहे. आपले काम प्रामाणिकपणे करीत रहा. नोकरी किंवा उद्योगात ना नफा ना तोटा असेही होण्याची शक्यता आहे. हा आठवडा ठीक जाईल.

उपाय: मंगळवारी गणेश संकटनाशन स्तोत्राची पारायणे करा.

कन्या

या आठवड्यात काही सभा-समारंभात भाग घेण्याची संधी मिळेल. थोरामोठ्यांच्या भेटीगाठी होतील.  त्यातून आपल्याला काही लाभ होण्याची शक्यता आहे. आपल्या वडिलांचा छोटा प्रवास घडण्याचीही शक्यता आहे. एकंदरीत हा आठवडा आपल्याला लाभदायक भेटीगाठींचा होण्याची शक्यता आहे.

उपाय: पक्ष्यांना खाऊ घाला.

तुळ

अवास्तव खर्च टाळा. बचतीचे महत्त्व समजून घ्या. तब्येतीला सांभाळा. या आठवड्यात आध्यात्मिक मार्गाकडे वळण्याची शक्यता आहे. संत सहवासाचा लाभ घ्यावा, असा केवळ विचार करीत बसू नका. तो लाभ मिळविण्याचा प्रयत्न करा. त्याने तुम्हाला कदाचित फायदाच होईल.

उपाय: सोमवारी शंकराला निरश्या दुधाचा अभिषेक करा.

वृश्चिक

या आठवड्यात आपण जो निर्णय कोणत्याही बाबतीत घ्यायचा असेल तर बुद्धी चातुर्याने घ्या. भावनेच्या आहारी जाऊन किंवा प्रलोभनाला भुलून निर्णय घ्याल तर तो चुकीचा ठरण्याची शक्यता आहे आणि सारासार विचार करून निर्णय घेतलात तर आपण यशापर्यंत लवकर पोहोचू शकाल.

उपाय: शुक्रवारी संध्याकाळी महालक्ष्मीची पूजा करा.

धनु

कुटुंबातील व्यक्तीकडून आपल्याला काही सडेतोड उत्तर मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे बोलताना वाणीवर संयम असू द्यावा. नाहीतर स्वत:चेच शब्द केव्हा बूमरँग होऊन उलटून येतील हे सांगता यायचे नाही. बाकी घरात खेळीमेळीचे वातावरण राहील. बोलण्यावर संयम ठेवा.

उपाय: मुंग्यांना साखर घाला.

मकर

आपण केलेल्या कष्टाचे चीज होईल, असे दिसते. आपल्या कामात आपण मन लावून काम केल्याने ते चोखच होईल आणि त्यामुळे आपल्या कामाची प्रसंशा केली जाईल. या आठवड्यात कदाचित आपल्याकडून काही लेखन कार्यही घडण्याची  शक्यता आहे. त्यामध्ये विशेष करून आपले हस्ताक्षर प्रसंशापात्र ठरेल.

उपाय: कपाळावर केशरी गंध लावा.

कुंभ

मातेच्या तब्येतीची काळजी घ्यावी लागेल. तिचे मन दुखावेल असे काहीही करू नका आणि वागूही नका. आई खूश व समाधानी राहिल्याने आपल्याला बराच फायदा होण्याची शक्यता आहे. काही जमीन अगर वाहन खरेदीच्या विचारात असाल तर कागदपत्रांची  पूर्ण तपासणी केल्याशिवाय पुढे पाऊल टाकू नका.

उपाय: शंकराची उपासना करा.

मीन

आपल्या अंगच्या कलागुणांना या आठवड्यात काहीसा वाव मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे आपल्यातील कलागुण ओळखा आणि त्यांना प्रोत्साहित करा. एखादी कला शिकण्यास प्रारंभ करायला हरकत नाही. प्रामाणिकपणे प्रयत्न केल्यास आत्मसात नक्कीच होईल. हा आठवडा छान जाईल.

उपाय: दशरथ रचित शनैश्चरस्तोत्र म्हणा.

Advertisement
Tags :

.