महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

खैराची तस्करी करणारी टोळी जेरबंद

03:55 PM Dec 24, 2024 IST | Radhika Patil
Khaira smuggling gang arrested
Advertisement

पाचगणी : 

Advertisement

जावळी तालुक्यातील पश्चिम भागातील गवडी गावातील जंगल परिसरात वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी कारवाई करत खैर लाकडाची तस्करी करणाऱ्या एका टोळीला पकडले. हा छापा 22 डिसेंबर रोजी रात्री दीड वाजता टाकण्यात आला. वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना गवडी गावच्या जंगलात खैराच्या लाकडाची तस्करी होत असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारावर तात्काळ कारवाई केली गेली.

Advertisement

या कारवाईमध्ये आरोपी सुनील ज्ञानदेव मर्ढेकर, विजय जुनघरे यांना मुद्देमालासह यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे व खैर लाकूड वनविभागाने ताब्यात घेतले आहे.

सायंकाळी सहा वाजल्यापासून वनविभागाचे कर्मचाऱ्यांनी जंगलात प्रवेश केला, तेव्हा तस्कर टोळक्याने मुख्य रस्त्यात पिकअप वाहन लावून अडवले होते, जेणेकरून वनविभागाच्या कर्मचाऱ्यांना प्रवेश होऊ नये. त्यानंतर, वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी कडाक्याच्या थंडीत जंगलात प्रवेश करत तपास सुरू केला.

तस्कर टोळीने वनविभागाच्या कर्मचाऱ्यांवर दमदाटी केली आणि मारण्याची धमकी देखील दिली. परंतु कर्मचाऱ्यांनी धैर्याने त्यांचा सामना केला. कारवाईच्या दरम्यान काही तस्कर पळून जाण्यात यशस्वी ठरले. पण वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी एक लाख रुपये किमतीचे खैर लाकूड आणि तस्करीसाठी वापरण्यात आलेले वाहन ताब्यात घेतले.

या कारवाईमुळे जावळी तालुक्यातील गवडी गावातील खैर लाकडाची तस्करी करणारी टोळी वनविभागाच्या जाळ्यात अडकली आहे. या कारवाईला सातारा जिह्यातील नागरिकांकडून तसेच पर्यावरण प्रेमींनी मोठ्या प्रमाणावर अभिनंदन आणि कौतुक व्यक्त केले आहे.

सातारा वनविभागाचे उपवन संरक्षक आदिती भारद्वाज, सहाय्यक उपवनसंरक्षक प्रदीप रौंदळ आणि जावळी तालुका वनविभागाचे कर्मचारी आरएफओ महादेव हजारे, वनपाल बामणोली निलेश रजपूत, वनरक्षक बामणोली राहुल धुमाळ, वनपाल मेढा स्वप्निल चौगुले, वनरक्षक कुडाळ विनायक लांडगे, वनरक्षक आपटे आकाश कोळी, कर्मचारी मर्ढेकर, नवनाथ महामुलकर यांचे कार्य गौरवले जात आहे. पर्यावरण प्रेमींनी देखील या कारवाईमुळे खैर लाकडाच्या तस्करीवर चाप बसण्याची अपेक्षा व्यक्त केली आहे.

Advertisement
Tags :
#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMedia
Next Article