For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

खादरवाडीच्या महिलेचा तलावात बुडून मृत्यू

06:11 AM Aug 15, 2024 IST | Tarun Bharat Portal
खादरवाडीच्या महिलेचा तलावात बुडून मृत्यू
Advertisement

प्रतिनिधी/ बेळगाव

Advertisement

कपडे धुण्यासाठी गेलेल्या महिलेचा तलावात बुडून मृत्यू झाला. बुधवारी सकाळी खादरवाडी (ता. बेळगाव) येथे ही घटना घडली आहे. बेळगाव ग्रामीण पोलीस स्थानकात घटनेची नोंद झाली आहे. अनिता ऊर्फ सुनीता सोमनाथ पाटील (वय 50) रा. खादरवाडी असे त्या दुर्दैवी महिलेचे नाव आहे. गेल्या 18 ते 20 वर्षांपासून त्यांना मानसिक त्रास होता. त्यांच्यावर मानसोपचार तज्ञांकडे उपचार करण्यात येत होते. बुधवार दि. 14 ऑगस्ट रोजी सकाळी 10 वा. कपडे धुण्यासाठी म्हणून त्या खादरवाडी गावातील तलावावर गेल्या. कपडे धुताना पाय घसरून तलावात बुडून त्यांचा मृत्यू झाला आहे. सिव्हिल हॉस्पिटलमधील शवागारात उत्तरीय तपासणी करून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आला. बेळगाव ग्रामीण पोलीस पुढील तपास करीत आहेत.

Advertisement
Advertisement
Tags :

.