कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

Keshavrao Bhosale: केशवरावच्या तिसऱ्या टप्प्याची वर्क ऑर्डर 2 दिवसांत, लवकरच सुरुवात

03:42 PM Jul 31, 2025 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

8 ऑगस्ट 2024 च्या रात्री लागलेल्या भीषण आगीत नाट्यागृह जळून खाक झाले

Advertisement

कोल्हापूर : संगीतसूर्य केशवराव भोसले नाट्यागृह आगीत बेचिराख झाल्यानंतर मुख्यमंत्री, महापालिका प्रशासन, सर्वपक्षीय नेते यांनी पूर्वीच्या वैभवाला साजेशी पुनर्बांधणी करण्याची घोषणा केली. या पुनर्बांधणीच्या तिसऱ्या टप्प्यातील 11 कोटी 77 लाख रुपयांच्या कामाची वर्कऑर्डर येत्या दोन दिवसांत दिली जाणार आहे. 

Advertisement

8 ऑगस्ट 2024 च्या रात्री लागलेल्या भीषण आगीत नाट्यागृह जळून खाक झाले. त्यानंतर नाट्यागृहाच्या पुनर्बांधणीसाठी शासनाने 25 कोटी रुपयांचा निधी तातडीने मंजूर केला. या निधीतून पहिल्या टप्प्यातील कामास नोव्हेंबर 24 पासून सुरुवात झाली. एक वर्षाच्या आत केशवराव भोसले नाट्यागृहाची पुनर्बांधणी करू अशा घोषणा करण्यात आल्या होत्या मात्र सुरूवातीला निधी येण्यास झालेला विलंब, नंतर निविदा आणि वर्कऑडर यात उशीर होत गेला.

मध्यंतरी कामाचा ठेकेदार व वास्तुविशारद मुंबईत आणि काम कोल्हापूर होत असल्याने नाट्यागृहावरील छताच्या कैच्या या खाली बसवण्यात आल्या. काम आराखड्यानुसार चालू आहे की नाही. याकडे महापालिकेचे दुर्लक्ष झाल्याची शंका रसिक प्रेक्षक आणि कलाकारांना येऊ लागली होती. यात नंतर सुधारणा झाली.

नाट्यागृहाच्या पुनर्बांधणीचे काम अत्यंत संथ गतीने सुरू होते. पहिल्या टप्प्यातील कामाची मुदत संपल्यानंतरही छताचे काम पूर्ण झालेले नाही. ते अद्यापही बाकी आहे. पहिल्या टप्प्यातील ग्राऊटिंगचे काम पूर्ण झाले असून छताचे काम अपूर्णच आहे. हे काम पूर्ण झाल्याशिवाय पुढीलृ टप्प्यातील कामे गतीने होऊ शकत नाहीत. त्यामुळेच संपूर्ण काम रखडले आहे.

पहिला टप्पा पूर्ण झाल्याशिवाय तिसऱ्या टप्प्याचे काम सुरू होऊ शकणार नाही. त्यामुळे पहिल्या टप्प्याच्या छताच्या कामाल अजुन गती मिळायला हवी. अशी अपेक्षा कलाकार, नाट्यारसिक याच्याकडून होत आहे. नाट्यागृह पुन्हा आहे तसेच उभारण्यासाठी 25 कोटी 10 लाख रुपयांचा निधीही मंजूर आहे. त्यातून पहिल्या टप्प्यात 7 कोटी 35 लाख रुपयांची कामे सुरू आहेत.

या पहिल्या टप्प्यात नाट्यागृहाच्या भिंती, छत आदींचे कामे आहेत. त्यातील छताचे काम मुदत संपली तरी चालूच आहे. यात रंगमंच्यावरील छताचे काम पूर्ण झाले आहे. मात्र उर्वरीत मुख्य सभागृहावरील काम बाकी आहे. दुसऱ्या टप्प्यातील 3 कोटी 22 लाख रुपयांची कामे सुरू आहेत. या कामांची निविदाही पूर्ण झाली आहे.

यात गॅलरी, शेड आदी कामे आहेत. मात्र, अद्याप तीही कामे सुरूच आहेत. तिसऱ्या टप्प्यात 11 कोटी 77 लाख रुपयांची अंतर्गत कामे केली जाणार आहेत. याची निविदा प्रक्रीया पूर्ण झाली असुन त्या कामाची वर्कऑर्डर येत्या दोन दिवसात मुंबईच्या कंपनीला देण्यात येणार आहे. यात वातानुकूलीत यंत्रणा, अंतर्गत रचना, अग्निशमन, ध्वनी, विद्युतीकरण, सीसीटीव्ही आदीची कामे करण्यात येणार आहेत.

Advertisement
Tags :
@KOLHAPUR_NEWS#Ddevendra Fadnavis#kolhapur mahapalika#tarun_bharat_news#tarunbharat_official#tarunbharatSocialMediacultural kolhapurkeshavrao bhosale
Next Article