बाळासाहेबांवर टीका करणारे केसरकर उद्या भाजपवरही टीका करतील
केसरकर म्हणजे कामापुरती मामा; डॉ. जयेंद्र परुळेकरांनी हाणला टोला
सावंतवाडी । प्रतिनिधी
शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हुकूमशाही पद्धतीने वागत होते. त्याना लोकशाही मान्य नव्हती अशी साक्ष विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्याकडे देणारे दीपक केसरकर हे भविष्यात भाजपच्या नेतृत्वावरही टीका करताना दिसतील अशी टीका उध्दव बाळासाहेब ठाकरे सेनेचे प्रवक्ते जिल्हा डॉक्टर जयेंद्र परुळेकर यांनी आज येथे केली.
मंत्री दीपक केसरकर यांनी आजपर्यंत अनेक पक्ष बदलले त्यामुळे त्यांचा पुढचा प्रवास हा भाजपच्या दिशेने सुरू आहे. ते आगामी निवडणूक ही भाजपकडूनच लढतील त्यामुळे त्यांची ही वागणूक नेहमीच कामापुरती मामाच राहिली असल्याचा टोला देखील श्री परुळेकर यांनी यावेळी लगावला केसरकर 2014 ला शिवसेनेत आले. मात्र, त्यांच्या तीन पिढ्या शिवसेनेत असल्यासारखे शिवसेनेबाबत बोलत आहेत.बाळासाहेबांचा अस्थिकलश सावंतवाडीत आणण्यात आला होता. त्यावेळेस केसरकर अनुपस्थित होते. असेही परुळेकर म्हणाले