महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केर - मोर्ले पाच दिवस संपर्क क्षेत्राबाहेर !

04:34 PM Aug 03, 2024 IST | अनुजा कुडतरकर
Advertisement

पर्यायी केबल जोडून टॉवर सुरु करा, ग्रामस्थांची मागणी, अन्यथा आंदोलन

Advertisement

दोडामार्ग - प्रतिनिधी
बीएसएनएलच्या भोंगळ कारभारामुळे केर - मोर्ले गाव पाच दिवस संपर्क क्षेत्राबाहेर असून असुन किती दिवस नेटवर्क सुरळीत होण्यासाठी लागतील यात शंका आहे कारण शॉर्टकट लाईन नेल्यामुळे तिलारी नदीच्या पाण्यात लाईन फॉल्टी झाली आहे.याबाबत मिळालेली माहिती अशी की, सुरुवातीचे दोन दिवस खाजगी ठेकेदार पेमेंट मिळत नसल्याने काम करण्यासाठी तयार नव्हते नंतर फॉल्ट शोधण्यास सुरुवात झाली असे समजते की तिलारीच्या नदीच्या पाण्यात केबल तुटली आहे गेल्यावर्षी याच भागात लाईन तुटली होती.  त्यामुळे ग्रामस्थांनी मदत करत आठडाभरानंतर रेंज सुरळीत झाली होती यावेळी सदर लाईन मुख्य मार्गाने नेण्याची मागणी केली होती. पण तसे न केल्याने पुन्हा लाईन तुटली त्यामुळे दोन्ही गाव कव्हरक्षेत्राबाहेर आहेत. नदीचे पाणी ओसरण्याची वाट पाहण्यापेक्षा मुख्यमार्गाने लाईन जोडून गाव कव्हरेज क्षेत्रात आणा अन्यथा आंदोलन करण्याचा इशारा दोन्ही गावातील ग्रामस्थांनी दिला आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
# tarun bharat news #dodamarg
Next Article