For the best experience, open
https://m.tarunbharat.com
on your mobile browser.

Satara Crime News: शंकास्पद दरोड्यातील टोळी जेरबंद, 20 लाखांसह मुद्देमाल जप्त

06:16 PM Jul 20, 2025 IST | Tarun Bharat Portal
satara crime news  शंकास्पद दरोड्यातील टोळी जेरबंद  20 लाखांसह मुद्देमाल जप्त
Advertisement

स्थानिक गुन्हे शाखा व भुईंज पोलीस ठाण्याची कारवाई 

Advertisement

सातारा:  भुईज पोलीस स्टेशन हद्दीतील महामार्गावर शनिवार ( दि. 12)  रोजी वेळे (ता. वाई) नजिक दरोडा टाकून 20 लाख रुपये लुटणाऱ्या केरळ राज्यातील दरोडेखोरांच्या टोळीस अटक करण्यात आलीये.

टोळीतील एक आरोपी एका तासात सांगली येथे जेरबंद करण्यात आला. इतर आरोपी  राजन राधाकृष्ण (वय 30), नंदकुमार नारायणस्वामी (वय 32), अजिथ कुमार (वय 27), सुरेश केसावन (वय 47), विष्णु क्रिशनंकुट्टी (वय 29), जिनु राघवन, (वय 31), कलाधरण श्रीधरण (वय 33) असे सात आरोपी अटक करण्यात आले असुन इतर सहा आरोपी फरार आहेत.

दरोडेखोर केरळ येथून जेरबंद करण्यात आले. त्यांच्याकडून चोरीस गेलेली रक्कम, गुन्ह्यात वापरलेली वाहने, मोबाईल हॅन्डसेट असा एकुण 35 लाख 26 हजार 995 रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला आहे.

 कराड शहर पोलीस ठाण्याकडील सहायक पोलीस निरीक्षक बिराजदार, पोलीस उपनिरीक्षक सतिश आंदेलवार व स्थानिक गुन्हे शाखेकडील पथकाने केरळ येथे जावून गुन्ह्यात वापरलेली इनोव्हा कार ही ताब्यात घेतली.

वरिष्ठांच्या मार्गदर्शनाखाली या गुन्ह्याचा तपास सहायक पोलीस निरीक्षक रमेश गर्जे हे करीत असून त्यांनी गुन्ह्याच्या तपासा दरम्यान गुन्ह्यातील मुख्य आरोपी विनीथ उर्फ राजन राधाकृष्ण याच्याकडून गुन्ह्यात चोरीस गेलेली 20 लाख रुपये रोख रक्कम, गुन्ह्यात वापरलेली हत्यारे जप्त केली.

Advertisement

Advertisement
Tags :

.