महाराष्ट्र | मुंबईकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरकोकण
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

केरळ काँग्रेसने मागितली माफी

06:47 AM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

पोप यांच्यासंबंधीच आक्षेपार्ह टिप्पणी

Advertisement

वृत्तसंस्था/ तिरुअनंतपुरम

Advertisement

केरळ काँग्रेसने पोप फ्रान्सिस आणि पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या भेटीसंबंधी उपहासात्मक टिप्पणी केली होती. या टिप्पणीमुळे संतापाचे वातावरण निर्माण झाल्यावर अखेर काँग्रेसने पोप फ्रान्सिस यांची माफी मागितली आहे. याप्रकरणी भाजपने काँग्रेसच्या टिप्पणीवर आक्षेप घेत जोरदार टीका केली होती. जी-7 शिखर परिषदेसाठी इटलीत पोहोचलेल्या पंतप्रधान मोदींनी पोप फ्रान्सिस यांची भेट घेतली होती. या भेटीचे छायाचित्र सोशल मीडियावर शेअर करत काँग्रेसने ‘अखेर पोपला देवाची भेट घेण्याची संधी मिळाली’ असे म्हटले होते. अलिकडेच झालेल्या लोकसभा निवडणुकीच्या प्रचारात बोलताना मोदींनी देवानेच एका महान कार्यासाटी मला या पृथ्वीतलावर पाठविल्याचा विश्वास असल्याचे वक्तव्य केले होते. याचाच संदर्भ देत काँग्रेसने ही टिप्पणी केली होती.

कुठल्याही धर्माचा तिरस्कार करणे आमची परंपरा नसल्याचे म्हणत काँग्रेसने आता माफी मागितली आहे. तत्पूर्वी काँग्रेसच्या टिप्पणीवर भाजप नेत्यांनी आक्षेप घेतला होता. हिंदूंची थट्टा करणे आणि त्यांच्या श्रद्धेला कमी लेखल्यावर काँग्रेसमधील इस्लामिक-मार्क्सवादी आघाडी आता ख्रिश्चनांचा अपमान करत आहे. काँग्रेसच्या दीर्घकाळ अध्यक्ष राहिलेल्या सोनिया गांधी स्वत: कॅथोलिक असताना हा प्रकार घडला असल्याची टीका भाजप नेते अमित मालवीय यांनी केली होती.

काँग्रेसला भाजप नेते अनिल अँटोनी, केंद्रीय मंत्री जॉर्ज कुरियन यांनीही फटकारले होते. काँग्रेसने अत्यंत खालची पातळी गाठली असल्याची टीका कुरियन यांनी केली. तर चहुबाजूने टीका सुरू झाल्यावर अखेर केरळ काँग्रेसने माफी मागितली आहे.

कुठलाही धर्म, धार्मिक पुजारी आणि मूर्तींच अपमान आणि तिरस्कार करणे काँग्रेसची परंपरा नाही हे पूर्ण देशाची जनता जाणून आहे. काँग्रेस सर्व धर्म आणि श्रद्धांना एकजूट करणारा आणि मैत्रिपूर्ण वातावरणात लोकांना पुढे जाण्यास प्रोत्साहन देणारा पक्ष आहे. कुठलाही काँग्रेस कार्यकर्ता पोप फ्रान्सिस यांचा अपमान करण्याचा विचारही करू शकत नाही असा दावा काँग्रेसने केला आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article