महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेGames मनोरंजनटेक / गॅजेट

केपे पालिकेला नगराध्यक्ष बदलाचे वेध

01:13 PM Jun 18, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

सत्ताधारी गटातूनच जोरदार हालचाली, नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर राजीनाम्याच्या तयारीत

Advertisement

वार्ताहर /केपे

Advertisement

लोकसभा निवडणुकीनंतर केपे पालिका नगराध्यक्ष बदलण्याच्या राजकीय हालचाली सुरू झाल्या असून सत्ताधारीच गट त्यासाठी सक्रिय झालेला आहे. मात्र अविश्वास ठराव आणण्यापूर्वीच केपे नगराध्यक्षा आज मंगळवारी राजीनामा देण्याची शक्यता आहे.केपे पालिकेत 13 नगरसेवक असून यावेळी नगराध्यक्षपद महिलांकरिता राखीव आहे. या 13 पैकी नऊ भाजप समर्थक नगरसेवक निवडून आले होते व भाजपाचे माजी मंत्री चंद्रकांत कवळेकर यांचे वर्चस्व पालिकेवर प्रस्थापित झाल होते. भाजप गटातून दोन महिला निवडून आल्या होत्या. त्यानंतर एका नगरसेविकेने दोन व अन्य नगरसेविकेने तीन वर्षे नगराध्यक्षपद भूषवावे, असा अलिखित समझोता झाला होता, अशी माहिती सूत्रांकडून मिळाली आहे.

मात्र नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर या तीन वर्षे नगराध्यक्षपदावर कायम असल्याने सत्ताधारी गटातीलच नगरसेवक दयेश नाईक यांनी दिपाली नाईक यांना नगराध्यक्षपदावर बसविण्याकरिता जोरदार हालचाली सुरू केल्या व सर्व सत्ताधारी नगरसेवकाना एकत्र घेऊन अविश्वास ठराव आणण्याची तयारी सुरू केली. दुसऱ्या बाजूने शिरवईकर यांनी कवळेकर यांच्याशी बोलणी करून नगराध्यक्षपदाचा राजीनामा देण्याची तयारी केली आहे. मात्र रविवारी व सोमवार सुट्टी असल्याने त्यांचा राजीनामा सादर करणे अडले. त्यामुळे त्या बहुतेक आज मंगळवारी किवा उद्या बुधवारी आपल्या पदाचा राजीनामा देण्याची शक्यता आहे. यामुळे फक्त केपे नगराध्यक्ष बदलणार असला, तरी केपे पालिकेवरील भाजपच्या चंद्रकांत कवळेकर यांचे वर्चस्व कायम राहणार आहे .

वरिष्ठ भाजप नेत्यांशी बोलूनच हालचाली : नाईक

सत्ताधारी गटातील 9 ही नगरसेवकांमध्ये बोलणी होऊन व चंद्रकांत कवळेकर यांच्याशी बोलणी करून शिरवईकर यांना दोन वर्षे व दिपाली नाईक यांना तीन वर्षे नगराध्यक्षपद भूषवू द्यावे, असा अलिखित समझोता झाला होता. मात्र शिरवईकर यांनी कवळेकर यांच्याकडे बोलणी करून आणखी सहा महिने वाढवले होते. तरीही त्या पदावरून उतरत नसल्याने आम्ही कवळेकर तसेच भाजपाच्या वरिष्ठ नेत्यांशी बोलणी करून आणि त्यांची सहमती घेऊनच नगराध्यक्षपदावरून शिरवईकर यांना खाली उतरविण्याच्या हालचाली केल्या आहेत, असे नगरसेवक दयेश नाईक यांनी सांगितले.

तर यापूर्वी अविश्वास का  आणला नाही ? : शिरवईकर

गेल्या तीन वर्षांत मला सर्व नगरसेवकांचा सदैव पाठिंबा लाभला व कोणत्याच नगरसेवकाने मला पदावरून खाली उतरा असे सांगितले नाही. दोन वर्षांचा कार्यकाळ ठरला होता, तर यापूर्वी अविश्वास ठराव का आणला नाही, असा सवाल नगराध्यक्षा सुचिता शिरवईकर यांनी केला. मी विकासकामे करताना सत्ताधारी-विरोधक असा कधीच भेदभाव केला नाही .व विकासकामांत कुठेही कमी पडले नाही. विकासकामे करताना सदैव सर्वांचा पाठिबा मिळालेला आहे. यात विशेष करून मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांच्या सहकार्यामुळे अनेक विकासकामे होऊ शकली. याकरिता मी मुख्यमंत्र्यांना धन्यवाद देते. आम्ही सर्व एकच गटात असून 30 जून रोजी पदाचा राजीनामा देणारच होते. काही कामे पूर्ण करण्याकरिता अवधी मागितला होता. तो सर्वांना मान्य नसल्याने पदाचा राजीनामा देण्याचे ठरविले आहे, असे शिरवईकर यांनी सांगितले.

Advertisement
Tags :
#tarunbharat_official#tarunbharatnews#tarunbharatSocialMedia
Next Article