महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

केजरीवालांच्या याचिकेवर उद्या होणार सुनावणी

06:49 AM Apr 14, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्ली मद्य घोटाळ्यात अटक करण्यात आलेले दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या याचिकेवर सर्वोच्च न्यायालयात 15 एप्रिल रोजी सुनावणी होणार आहे. केजरीवाल यांनी आपल्या अटकेला आव्हान दिले आहे. सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती संजीव खन्ना आणि न्यायमूर्ती दीपंकर दत्ता यांच्या खंडपीठासमोर या याचिकेवर सुनावणी होणार आहे. दिल्ली उच्च न्यायालयाकडून कोणताही दिलासा न मिळाल्याने आम आदमी पक्षाने सर्वोच्च न्यायालयात धाव घेतली आहे. यापूर्वी उच्च न्यायालयाकडून केजरीवाल यांची अटक आणि रिमांडविरोधातील याचिका फेटाळून लावण्यात आली आहे.

Advertisement

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article