महाराष्ट्र | मुंबई /पुणेइतरकोकणकोल्हापूरसांगलीसातारासोलापूरअहमदनगर
कर्नाटक | बेंगळूरबेळगांवहुबळी / धारवाडकारवारविजापूरहल्याळदांडेली
भविष्यराष्ट्रीयआंतरराष्ट्रीयक्रीडासंपादकीय / अग्रलेखव्यापार / उद्योगधंदेमनोरंजनटेक / गॅजेट

केजरीवालांच्या कोठडीत 7 मेपर्यंत वाढ

06:58 AM Apr 24, 2024 IST | Tarun Bharat Portal
Advertisement

तुरुंगात देण्यात आले इन्सुलिन : कविता यांचाही तुरुंगातील मुक्काम वाढला

Advertisement

वृत्तसंस्था/ नवी दिल्ली

Advertisement

दिल्लीच्या राउज अॅव्हेन्यू न्यायालयाने मंगळवारी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी 7 मेपर्यंत वाढविली आहे. न्यायालयाच्या या आदेशानंतर केजरीवाल आता लोकसभा निवडणुकीच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या टप्प्यातील मतदानादरम्यानही तुरुंगातच राहणार आहेत. केजरीवाल यांच्यासोबत बीआरएस नेत्या के. कविता आणि अन्य एक आरोपी चरणप्रीत यांच्या कोठडीत वाढ करण्यात आली आहे. कविता यांच्या प्रकरणी 60 दिवसांत आरोपपत्र दाखल केले जाणार असल्याचे ईडीने सुनावणीवेळी सांगितले आहे.

ईडीने अबकारी धोरण घोटाळ्याप्रकरणी केजरीवाल यांना 21 मार्च रोजी अटक केली होती. तर केजरीवालांची रक्तशर्करा पातळी वाढल्यावर मंगळवारी पहिल्यांदा तुरुंगात इन्सुलिन देण्यात आले आहे. कमी डोसयुक्त इन्सुलिनच्या दोन युनिट देण्यात आल्या आहेत. रक्तशर्करा पातळी 200 पार झाल्यावर कमी डोसयुक्त इन्सुलिन देण्याची सूचना एम्सच्या टीमने केली होती, अशी माहिती तिहार प्रशासनाने दिली आहे.

केजरीवालांच्या याचिकेवर आता 7 मे रोजी पुढील सुनावणी होणार आहे. यापूर्वी 15 एप्रिल रोजी न्यायालयाने केजरीवाल यांची न्यायालयीन कोठडी 23 एप्रिलपर्यंत वाढविण्यात आली होती. तर दुसरीकडे दिल्ली उच्च न्यायालयाने मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीप्रकरणी ईडीकडून जारी समन्सला आव्हान देणाऱ्या केजरीवालांच्या याचिकेवरील सुनावणी 15 मे रोजीसाठी सूचीबद्ध केली आहे.

Advertisement
Tags :
##tarunbharat##tarunbharatnews#social media
Next Article